Vitthal Abhang Lyrics | विठ्ठलाचे अभंग (मराठी )
🌸🌸🙏राम कृष्ण हरी🙏🌸🌸
देव भुलला | अभंग लिरिक्स
देव भुलला भावासी । सांडोनियां वैकुंठासी ॥१॥
उघडा आला पंढरपुरा । तो परात्पर सोइरा ॥२॥
पाहूनियां पुंडलिका । भुलला तयाच्या कौतुका ॥३॥
उभा राहिला विटेवरी । एका जनार्दनीं हरी ॥४॥
* * * *
देह जावो हेचि घडी
देह जावो हेचि घडी । पाय हरिचे न सोडी ॥
क्लेश होत नानापरी । वाचे रामकृष्ण हरी ॥
नाचू वैष्णवांचे मेळी । हांक विठ्ठल आरोळी ॥
नामा म्हणे विठोबासी । जें ते घडो या देहासी ॥
* * * *
धन्य आजी दिन | अभंग लिरिक्स
धन्य आजी दिन संत दर्शनाचा । आनंत जन्मी चा क्षीण गेला ॥१॥
मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे । कदा न सोडावे चरण त्यांचे ॥2॥
त्रिविध तापाची झाली बोळवण । देखिले चरण वैष्णवांचे ॥३॥
एका जनार्धानी घडो त्यांचा संग । न व्हावा वियोग जन्मोजन्मी ॥४॥
* * * *
अजि सोनियाचा दिनु
अजि सोनियाचा दिनु । वर्षे अमृताचा घनु ॥१॥
हरि पाहिला रे हरि पाहिला रे । सबाह्याभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी ॥२॥
दृढ विटे मन मुळी । विराजित वनमाळी ॥३॥
बरवा संतसमागमु । प्रगटला आत्मारामु ॥४॥
कृपासिंधु करुणाकरू । बाप रखमादेविवरू ॥५॥
* * * *
देह शुद्ध करुनी अभंग लिरिक्स
देह शुद्ध करुनी भजनी भजावे। आणिकाचे नाठवावे दोष गुण।। धृ ।।
साधने समाधि नको पां उपाधी। सर्व समबुध्दी करी मन।। 1 ।।
म्हणे जनार्दन घेई अनुताप। सांडी पा संकल्प एकनाथा।। 2 ।।
* * * *
नाम फुकाचें फुकाचें | अभंग लिरिक्स
नाम फुकाचें फुकाचें । देवा पंढरीरायाचें ॥ १ ॥
नाम अमृत हें सार । ह्रदयीं जपा निरंतर ॥ २ ॥
नाम संतांचें माहेर । प्रेम सुखाचें आगर ॥ ३ ॥
नाम सर्वांमध्यें सार । नरहरी जपे निरंतर ॥ ४ ॥
* * * *
भक्ती वाचून मुक्तीची | अभंग लिरिक्स
भक्ती वाचून मुक्तीचीमज जडली रे व्याधी
विठ्ठल मीच खरा अपराधी || धृ ||
ज्ञानेशाचे अमृत अनुभव, अनुकम्पेचे नेत्री आसव
स्वप्न तरल ते नकळ शैषव, विले त्यांत कधी विठ्ठला || १ ||
संत तुक्याची अभंगवाणी, इंद्रायणीचे निर्मळ पाणी
मीच बुडविला दृष्ट यौवनी, करुणेचा हा निधी विठ्ठला || २ ||
सरले शिश्नाव स्वच्छंदीपण, नुरले यौवन उरले मी पण
परी न रंगले प्रमप्त हे मन, तुझ्या चिंतनी कधी विठ्ठला || ३ ||
* * * *
हरिनें माझें हरिलें चित्त अभंग लिरिक्स
हरिनें माझें हरिलें चित्त । भार वित्त विसरलें ॥१॥
आतां कैसी जाऊं घरा । नव्हे बरा लौकिक ॥ध्रु.॥
पारखियांसी सांगतां गोटी । घरची कुटी खातील ॥२॥
तुका म्हणे निवांत राहीं । पाहिलें पाहीं धणीवरि ॥३॥
* * * *
कोटी कोटी रुपे तुझी
कोटी कोटी रुपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे
कुठे कुठे शोधु तुला, तुझे अनंत देव्हारे
बीज अंकुरे ज्या ठायी, तिथे तुझा वास
तुझा स्पर्ष आणुन देतो, फुलाला सुवास
चराचरा रंगवीशी, रंग तुझा कोणता रे
कधी दाह ग्रीष्माचा तू, कधी मेघ ओला
जनी निर्जनीही तूझा, पाय रोवलेला
तुझी खूण नाही ऐसा गाव तरी कोणता रे
खरे रूप देवा तूझे, कोणते कळेना
तूच विटेवरी, तूच वैकुंठीचा राणा
तुला आळवाया घ्यावा शब्द तरी कोणता रे
* * * *
घेता नाम विठोबाचे
घेता नाम विठोबाचे | पर्वत जळती पापांचे ||
ऐसा नामाचा महिमा | वेद शिणला झाली सीमा ||
नामे तारिले अपार | महापापी दुराचारी ||
वाल्या कोळी ब्राम्हहात्यारी | नामे तारिला निर्धार ||
सेना बैसला निवांत | विठ्ठल नाम उच्चारित ||
* * * *
नाम तुझे रे नारायणा
नाम तुझे रे नाम तुझे रे
नाम तुझे रे नारायणा
फोड़ी पाषाणाला पान्हानाम तुझे रे नारायणा।। धृ ।।
नाम तुझे रे नारायणा
नाम जपले वाल्मिकाने, फुटले दोन त्याला पाने ।। 1 ।।
नाम तुझे रे नारायणा
आला मेला पापरासी, तोही गेला देवा वैकुंठाशी।। 2 ।।
नाम तुझे रे नारायणा
ऎसा नामाचा महिमा, तुका म्हणे झाली सीमा ।। ३ ।।
नाम तुझे रे नारायणा
* * * *
कशी जाऊ मी वृंदावना
कशी जाऊ मी वृंदावना
मूरली वाजवितो कान्हा
पैलतिरी हरी, वाजवी मूरली
नदी भरली भरली जमूना
कासे पितांबर कस्तूरी टिळक
कूंडल शोभे काना
कशी जाऊ मी वृंदावना
काय करू बाई, कूणाला सांगू
हरीनामाची सांगड आणा
नंदाच्या हरीने कौतूक केले
जाणे अंतरीच्या खूणा....
कशी जाऊ मी वृंदावना
एका जनार्दनी मनी म्हणा
देव महात्मे ना कळे कोणा
कशी जाऊ मी वृंदावना
मूरली वाजवितो कान्हा
* * * *
सुखाचे हे नाम आवडीने
सुखाचे हे नाम आवडीने गावे
वाचे आळवावे विठोबासी
संसार सुखाचा होईल निर्धार
नामाचा गजर सर्वकाळ
सुखाचे हे नाम आवडीने गावे
वाचे आळवावे विठोबासी
सुखाचे हे नाम आवडीने गावे
कामक्रोधांचें न चलेचि काही
आशा मनशा पाही दूर होती
सुखाचे हे नाम आवडीने गावे
वाचे आळवावे विठोबासी
सुखाचे हे नाम आवडीने गावे
आवडी धरोनी वाचें म्हणे हरिहरि
म्हणतसे महरी चोखियाची
सुखाचे हे नाम आवडीने गावे
वाचे आळवावे विठोबासी
* * * *
तुझे रूप चित्ती राहो
तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम
देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम
देहधारी जो-जो त्यासी विहीत नित्यकर्म
सदाचार नीतीहुनी आगळा ना धर्म
तुला आठवावे, गावे, हाच एक नेम
तुझे नाम पांडुरंगा सर्व ताप नाशी
वाट प्रवासासी देती स्वये पाप राशी
दिसो लागली तू डोळा अरुपी अनाम
तुझ्या पदी वाहिला मी देहभाव सारा
उडे अंतराळी आत्मा, सोडुनि पसारा
नाम तुझे घेतो गोरा, म्हणूनी आठयावं
* * * *
- Sant Dnyaneshwar Abhang In Marathi
- Vitthal Aarti Lyrics In Marathi
- एकनाथ महाराजांचा अभंग संग्रह
- गुरुपरंपरेचे अभंग
- संत तुकाराम महाराजांचे अभंग
- संत जनाबाईचे अभंग
- Hartalika Bhajan Marathi Lyrics
तर मित्रानो , या पोस्ट मध्ये आपण , Vitthal Abhang Lyrics बघितले . अजुन भक्ति सम्बंधित पोस्ट साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट जरूर दया .
धन्यवाद !!!!!!!!!
Post a Comment