Hartalika Bhajan Marathi Lyrics | हरतालिका भजन (मराठी )
नमस्कार, या पोस्टमध्ये तुम्हाला Hartalika Bhajan Marathi Lyrics वाचायला मिळतील. हरतालिकेच्या वेळी म्हणण्यासाठीची ही भजने आहेत.
हे पण नक्की वाचा 👇👇👇👇
तर या पोस्टमध्ये आपण Hartalika Bhajan Marathi Lyrics बघितले. अधिक भक्ती संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.
ही पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Hartalika Bhajan Marathi Lyrics
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
भजन - १
महेशा लागला तुझा रे छंद मला
सांग ना ... बोल ना ...
महेशा लागला तुझा रे छंद मला
नंदीवर बसून येशील का ? मजला दर्शन देशील का ?
नंदीवर बसून येशील का ? मजला दर्शन देशील का ?
सांग ना ... बोल ना ...
महेशा लागला तुझा रे छंद मला
महेशा लागला तुझा रे छंद मला
संकटी धाव तू घेशील का ? मदतीचा हात मज देशील का ?
संकटी धाव तू घेशील का ? मदतीचा हात मज देशील का ?
सांग ना ... बोल ना ...
महेशा लागला तुझा रे छंद मला
महेशा लागला तुझा रे छंद मला
गरिबा घरी तू येशील का ? चटणी भाकर खाशील का ?
गरिबा घरी तू येशील का ? चटणी भाकर खाशील का ?
सांग ना ... बोल ना ...
महेशा लागला तुझा रे छंद मला
महेशा लागला तुझा रे छंद मला
भक्तावर कृपा तू करशील का ? झोळी माझी तू भरशील का ?
भक्तावर कृपा तू करशील का ? झोळी माझी तू भरशील का ?
सांग ना ... बोल ना ...
महेशा लागला तुझा रे छंद मला
महेशा लागला तुझा रे छंद मला
❖❖❖❖❖❖❖
भजन - २
बेल दवणा वाहीन तुमच्या चरणाला,
सुखी ठेव शंभू कुंकवाच्या धन्याला
बारा लिंगाच्या तीर्थाला जाईल |
तुझ्या नावाचा जप मी करीन ||
बेल दवणा वाहीन तुमच्या चरणाला,
सुखी ठेव शंभू कुंकवाच्या धन्याला
बेल दवणा वाहीन तुमच्या चरणाला,
सुखी ठेव शंभू कुंकवाच्या धन्याला
दह्या दुधाने अंघोळ घालीन |
अभिषेकाची पूजा करीन ||
बेल दवणा वाहीन तुमच्या चरणाला,
सुखी ठेव शंभू कुंकवाच्या धन्याला
बेल दवणा वाहीन तुमच्या चरणाला,
सुखी ठेव शंभू कुंकवाच्या धन्याला
सोळा सोमवार उपवास करीन |
शिवलिंगामृताचे पाठ मी करीन ||
बेल दवणा वाहीन तुमच्या चरणाला,
सुखी ठेव शंभू कुंकवाच्या धन्याला
बेल दवणा वाहीन तुमच्या चरणाला,
सुखी ठेव शंभू कुंकवाच्या धन्याला
देव्हाऱ्यात तुला मी पूजीन |
चंद्रमौळी रूप मी पाहिन ||
बेल दवणा वाहीन तुमच्या चरणाला,
सुखी ठेव शंभू कुंकवाच्या धन्याला
बेल दवणा वाहीन तुमच्या चरणाला,
सुखी ठेव शंभू कुंकवाच्या धन्याला
रुद्राक्षाच्या माळा मी घालीन |
भाळी तुझ्या भस्म मी लावीन ||
बेल दवणा वाहीन तुमच्या चरणाला,
सुखी ठेव शंभू कुंकवाच्या धन्याला
बेल दवणा वाहीन तुमच्या चरणाला,
सुखी ठेव शंभू कुंकवाच्या धन्याला
सुखी ठेव तू कुंकवाच्या धन्याला
सुखी ठेव शंभू कुंकवाच्या धन्याला
सुखी ठेव शंभू कुंकवाच्या धन्याला
कुंकवाच्या धन्याला .... कुंकवाच्या धन्याला ....
❖❖❖❖❖❖❖
भजन - ३
भाग्याचे कुंकू लावून कपाळी
ओवाळीते शंकराला सांज सकाळी
सौभाग्याचे कुंकू लावून कपाळी
ओवाळीते शंकराला सांज सकाळी
धन नको , दौलत नको, नको मला काही ...
सौभाग्याचे कुंकू देवा जन्मभर देई ...
धन नको , दौलत नको, नको मला काही ...
सौभाग्याचे कुंकू देवा जन्मभर देई ...
सौभाग्याचे कुंकू लावून कपाळी
ओवाळीते शंकराला सांज सकाळी
तुझ्याविन शंकरा मला नाही कोणी
रावणाला आत्मलिंग दिले तू काढूनी
तुझ्याविन शंकरा मला नाही कोणी
रावणाला आत्मलिंग दिले तू काढूनी
सौभाग्याचे कुंकू लावून कपाळी
ओवाळीते शंकराला सांज सकाळी
हार नको पाटल्या नको नको बंगला गाडी
सौभाग्याचे कुंकू देवा जन्मभर देई
हार नको पाटल्या नको नको बंगला गाडी
सौभाग्याचे कुंकू देवा जन्मभर देई
सौभाग्याचे कुंकू लावून कपाळी
ओवाळीते शंकराला सांज सकाळी
दैन्य दुःख सारे देवा तू निवारी
वाहते मी शंकराला बेल त्रिदळी
दैन्य दुःख सारे देवा तू निवारी
वाहते मी शंकराला बेल त्रिदळी
सौभाग्याचे कुंकू लावून कपाळी
ओवाळीते शंकराला सांज सकाळी
सांज सकाळी.... सांज सकाळी ...
|| भोलेनाथ भगवान की जय ||
❖❖❖❖❖❖❖
भजन - ४
अशी लाजुन बावरी झाली ग...
अशी लाजुन बावरी झाली ग...
पार्वती शंकराची नवरी झाली ग ...
पार्वती शंकराची नवरी झाली ग ...
पिवळा शालू शोभे तिला,
हातात भरला हिरवा चुडा
पिवळा शालू शोभे तिला,
हातात भरला हिरवा चुडा
कशी हळदीने पिवळी झाली ग ..
पार्वती शंकराची नवरी झाली ग ....
अशी लाजुन पार्वती झाली ग...
पार्वती शंकराची नवरी झाली ग ...
सनई चौघडा वाजे ग...
देवगन भुतावळ नाचे ग ...
सनई चौघडा वाजे ग...
देवगन भुतावळ नाचे ग ...
शंकर बैसून नंदी डोलत आला ग...
पार्वती शंकराची नवरी झाली ग ....
अशी लाजुन पार्वती झाली ग...
पार्वती शंकराची नवरी झाली ग ....
एका जनार्दनी शंकर पार्वती,
काय वर्णावी ती महती ...
एका जनार्दनी शंकर पार्वती,
काय वर्णावी ती महती ...
पार्वती शंकराची नवरी झाली ग ....
अशी लाजुन पार्वती झाली ग...
पार्वती शंकराची नवरी झाली ग ...
पार्वती शंकराची नवरी झाली ग ...
❖❖❖❖❖❖❖
भजन - ५
चांदणं चांदणं झाली रात
शिवशंभुची पार्वती पाहते वाट
चांदणं चांदणं झाली रात
शिवशंभुची पार्वती पाहते वाट
पुण्याचा सोनार बोलवा ग,
शंभूला सोन्यानं मढवा ग
गंधाचं विभूतीच घेऊन ताट
शिवशंभुची पार्वती पाहते वाट
चांदणं चांदणं झाली रात
शिव शंभू ची पाहत होते वाट
सातारचा माळी बोलवा ग,
मोठ्या महादेवाला सजवा ग
बेलाचं फुलाचं घेऊन ताट
शिवशंभुची पार्वती पाहते वाट
चांदणं चांदणं झाली रात
शिव शंभू ची पाहत होते वाट
नगरचा लोहार बोलवा ग,
शंभूला त्रिशूळ घडवा ग ...
उदाचं कापराचं घेऊन ताट
शिवशंभुची पार्वती पाहते वाट
चांदणं चांदणं झाली रात
शिव शंभू ची पाहत होते वाट
सासवड चे कावड बोलवा ग
शंभूला भक्तीत रंगवा ग
आरतीचं भवतीच घेऊन ताट
शिवशंभुची पार्वती पाहते वाट
चांदणं चांदणं झाली रात
शिव शंभू ची पाहत होते वाट
शिव शंभू ची पाहत होते वाट
पाहत होते वाट ...
पाहत होते वाट ....
❖❖❖❖❖❖❖
हे पण नक्की वाचा 👇👇👇👇
- डम डम डम डम डमरू वाला पार्वती पती कैलास वाला Lyrics
- He Bholya Shankara Lyrics in Marathi
- Shankarachi Aarti Lyrics In Marathi
तर या पोस्टमध्ये आपण Hartalika Bhajan Marathi Lyrics बघितले. अधिक भक्ती संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.
ही पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Post a Comment