एकनाथ महाराजांचा अभंग संग्रह | Ekanath Maharajancha Abhang Sangrah (Marathi)
मित्रानो , या पोस्ट मध्ये तुम्हाला एकनाथ महाराजांचा अभंग वाचायला मिळतील . इथे आपण एकनाथ महाराजांनी रचलेले २५ अभंग बघणार आहोत . चला तर मग बघूया एकनाथ महाराजांचे अभंग -
1. माझे माहेर पंढरी
माझे माहेर पंढरी ,
आहे हिवरेच्या तिरी || धृ ||
बाप आणि आई ,
माझी विठल रखुमाई || १ ||
पुंडलिक आहे बंधू ,
त्याची ख्याति सांगू काय || २ ||
माझी बहिन चंद्रभागा ,
करिसे पापभंगा .. || ३ ||
एक जनार्दनी शरण ,
करि माहेर आठवण || ४ ||
2. देव इंद्रायणी थांबला
ज्ञानोबा माउली तुकाराम,
ज्ञानेश्वर माउली तुकाराम
देव इंद्रायणी थांबला || धृ ||
पंढरीचा पांडुरंग आळंदीशी आला
भक्तिभावाने एकरूप झाला || १ ||
म्हणे मुक्ताई चमत्कार झाला
समाधी घेता हात थरथरला || २ ||
एक जनार्दनी इंद्रायणी आठव
उधळून निघाले आळंदी हे गाव || ३ ||
3. लंबोदर गिरीजा नंदना देवा
लंबोदर गिरीजा नंदना देवा
पूर्ण करी मनोकामना देवा || धृ ||
हे मन पावन तव पदी सेवन
बुद्धी द्यावी गजानन देवा || १ ||
पायी घागुऱ्या वाजती रुणझुण
नाचत यावे गजानन देवा || २ ||
एका जनार्दनी विनवितो तुज
विद्या द्यावी गजानन देवा || ३ ||
4. प्राणियांसी मंत्र सोपा
प्राणियांसी मंत्र सोपा ,
दत्त वाचे जपा || धृ ||
आणिक गे साधन ,
दत्त नामे घडे ज्ञान || १ ||
न लगे योग याग पट्टी ,
दत्त वाचून नेने नाही || २ ||
एका जनार्दनी वेधले मन ,
मन हे झाले उन्मन || ३ ||
5. जनार्दनाचा गुरु हो
जनार्दनाचा गुरु हो ,
स्वामी दत्तात्रय माझा || धृ ||
त्याने उपदेश केला
केला ..स्वानंदाचा बोध दिला || १ ||
पतित सुखाचा अनुभव ,
दाखविला स्वयंमेव || २ ||
एका जनार्दनी दत्त ,
दत्त बसे माझ्या हृदयात || ३ ||
6. अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना
अरे कान्हा मनरंजन मोहना
आले संत घरी तरी काय बोलून शिणवावे
ऊस गोड लागला म्हणून काय मुळासहित खावे
प्रीतीचा पाहून झाला म्हणून काय फार दिवस रहावे
गावाचा पाटील झाला म्हणून काय गावचं बुडवावे
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन
देव अंगी आला म्हणून काय भलतेच बोलावे
चंदन शीतळ झाले म्हणून काय उगाळुनिया प्यावे
भगवी वस्त्रे केली म्हणून काय जागाच नडावे
आज्ञा विंचू झाला म्हणून काय कंठीच कळवावे
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन
परस्त्री सुंदर झाली म्हणून काय बळेच ओढावी
सूरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी
मखमली पैजार झाली म्हणून काय शिरीच बांधावी
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन
सद्गुरू सोयरा झाला म्हणून काय आचार बुडवावा
नित्य देव भेटला म्हणून काय जगाशी दावावा
घरचा दिवा झाला म्हणून काय अध्यक्ष बांधावा
एका जनार्दनीं म्हणे हरी हा गुप्तची ओळखावा
अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन
7. काया हि पंढरी
काया हि पंढरी आत्मा हा विठ्ठल |
नांदतो केवळ पांडुरंग || १ ||
भाव भक्ती भीमा उदक ते वाहे |
बरवा शोभतहे पांडुरंग || २ ||
दया क्षमा शांती हेचि वाळूवंट |
मिळालासे थाट वैष्णवांचा || ३ ||
ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद |
हेचि वेणूनाद शोभतसे || ४ ||
दश इंद्रियांचा एक मेल केला |
ऐसा गोपाळकाला होत असे || ५ ||
देखली पंढरी देही - जणी वनी |
एका जनार्दनी वारी करी || ६ ||
8. माझ्या मना चांद लागो छंद
माझ्या मना चांद लागो छंद , गोविंद नित्य गोविंद || १ ||
तेनो देह ब्रह्मरूप गोविंद , नित्य गोविंद |
नि जसे रामरूप , नित्य गोविंद || २ ||
तुटेल सकळ उपाधी , निरसेल आधी व्याधी |
निरसेल गोविंद , नित्य गोविंद || ३ ||
गोविंद हा जणी - वनी | म्हणे एका जनार्दनी || ४ ||
9. ओमकार स्वरूपा
ओमकार स्वरूपा , सद्गुरू समर्था |
अनाथांच्या नाथ तुज नमो |
तुज नमो , तुज नमो , तुज नमो || १ ||
नमो मायबापा , गुरुकृपाघना |
तोंडी या बंधना मायामोहा |
मोहजाल माझे कोण नीरशील |
तुजविण दयाळा सद्गुरुराया || २ ||
सद्गुरुराया माझा आनंदसागर |
त्रैलोक्या आधार गुरुराव |
गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश |
त्यापुढे उदास चंद्र - रवी |
रवी , शशी , अग्नी नेणती ज्या रूपा |
स्वप्रकाश स्वरूपा नेने वेद || ३ ||
एका जनार्दनी गुरु परब्रम्ह |
तयाचे परीणाम सादामुखी || ४ ||
10. गुरु परमात्मा परेशु
गुरु परमात्मा परेशु | ऐसा ज्याचा दृढ विश्वासू || १ ||
देव तयाचा अंकिला | स्वयें संचरा त्यांचे घरा || २ ||
एका जनार्दनी गुरुदेव | येथे नाही बा संशय || ३ ||
11.कानडा विठ्ठल कानडा विठ्ठल
कानडा विठ्ठल कानडा विठ्ठल | कानडा विठ्ठल विटेवरी || १ ||
कानडा विठ्ठल नामे बरवा | कानडा विठ्ठल हृदयी घ्यावा || २ ||
कानडा विठ्ठल रूपे सावळा | कानडा विठ्ठल पाहिला डोळा || ३ ||
कानडा विठ्ठल चंद्रभागे तटी | कानडा विठ्ठल पाहावा उठाउठी || ४ ||
कानडा विठ्ठल कानडा बोले | कांड्या विठ्ठले मन वेधियेलें || ५ ||
वेधियेलें मन कानड्यानें माझे | एका जनार्दनी दुजे नाठवे ची || ६ ||
12.असा कसा देवाचा देव
असा कसा देवाचा देव बाई ठकडा | देव एका पायाने लंगडा || १ ||
शिंकेचि तोडितो मडकेचि फोडितो | करी दही - दुधाचा रबडा || २ ||
वाळवंटी जातो कीर्तन करितो | घेतो साधुसंतांसी झगडा || ३ ||
एका जनार्दनी भिक्षा वाढा बाई | देव एकनाथाचा बछडा || ४ ||
13. राम नाम ज्याचे मुखी
राम नाम ज्याचे मुखी | तो नर धान्य तिनी लोकीं || १ ||
राम नाम वदता वाचे | ब्रम्हा सुख तेथे नाचे || २ ||
राम नामें वाजे टाळी | महादोषां होय होळी || ३ ||
राम नाम सदा गर्जे | कळी - काळ - भय पाविजे || ४ ||
एस राम नामी भाव | तया संसाराची वाव || ५ ||
आवडीने नाम गाय | एका जनार्दनीं वंदी पाय || ६ ||
14. रूपे सुंदर सावळा गे माये
रूपे सुंदर सावळा गे माये |
वेणू वाजवी वृन्दावाना गोधनें चारिताहे || १ ||
रुणझुण वाजवी वेणू |
वेढी वेधले आमुचे तनमनू ओ माये || २ ||
गोधनें चारी हती घेऊन काठी |
वैकुंठीचा सुकुमार गोपवेषे जगजेठी |
वैकुंठीचा सुकुमार गोधनें चारिताहे || ३ ||
एका जनार्दनी भुलवी गौळणी |
करिती तनुमनाची वोवाळणी वो माये || ४ ||
15. खांद्यावरी घोंगडी
खांद्यावरी घोंगडी हातामध्ये काठी |
घेऊनिया चारितसे धेनु सावळा || १ ||
राधे तुझा मुकुंद मुरारी |
वाजवी वेणू नानापरी || २ ||
सकाळ तीर्थें ज्याच्या चरणांवरी लोळती |
तो म्हणे राधिकेसी करिन मी तुझी वेणीफणी || ३ ||
एका जनार्दनी रचिले रासमंडळ |
जिकडे पाहें तिकडे अवघे ब्रम्हा कोंदलें || ४ ||
16. या पंढरीचे सुख पाहता डोळां
या पंढरीचे सुख पाहता डोळां |
उभा तो जिव्हाळा योगियांचा || १ ||
म्हणोनिया मन वेधले चरणीं |
आणिक त्यागुनी बुडी दिली || २ ||
जनार्दनाचा एका धांवे लोटांगणी |
करी ओवाळणी शरीराची || ३ ||
17. ऐक ऐक सखये बाई
ऐक ऐक सखये बाई | नवल मी सांगू काई |
त्रैलोक्याचा धनी तो हा यशोदेस म्हणतो आई || १ ||
देवकीने वाहिला गे यशोदेने पाळीला |
पांडवांचा बंधुजन होऊनिया राहिला || २ ||
ब्रम्हांडाची साठवण योगियांचे निजध्यान |
चोरी केली म्हणवून उखळाशी बंधन || ३ ||
सकळ तीर्थे जया चरणी | सुलभ हा शूळपाणि |
राधिकेसी म्हणतो तुझी करिन मी वेणीफणी || ४ ||
शरण एका जनार्दनी त्रैलोक्याचा मोक्षदानी |
गायी गोपी गोपबाळा मिळविले आपलेपणी || ५ ||
18. येथोनी आनंदु रे आनंदु
येथोनी आनंदु रे आनंदु | कृपासागर तो गोविंदु रे || १ ||
महाराजांचे राउळी | वाजे ब्रम्हानंद टाळी || २ ||
लक्ष्मी चतुर्भुज झाली | प्रसाद घेऊन बाहेर आली || ३ ||
एका जनार्दनी नाम | पाहता मिळे आत्माराम || ४ ||
19. कुणीतरी सांगा गे
कुणीतरी सांगा गे | माझा कृष्ण देखिला काय || १ ||
कुणीतरी सांगा गे | माझा कृष्ण देखिला काय || २ ||
हाती घेऊनिया फुल | अंगानी रांगत आले मुल |
होते सावरीत मी चूल | कैसी भूल पडियेली || २ ||
माथा शोभे पिंपळपान | मेघवर्ण एस जाण |
त्याला म्हणती श्रीभगवान | योगी ध्यान विश्रांती || ३ ||
एका जनार्दनी माय | घरोघरांप्रती जाय |
कृष्णा जाणावे ते काय | कोणी तरी अंग गे || ४ ||
20. वारियाने कुंडल हाले
वारियाने कुंडल हाले | डोळे मोडीत राधा चाले |
राधा पाहून भुलले हरी | बैल दुभवी नंदाघरी || १ ||
फणस जंबीर कर्दळी दाटा | हाती घेऊन नारंगी फाटा |
हरी पाहून भुलली चित्ता | राधा घुसली डेरा रिता || २ ||
एसी आवडी मानली दोघा | एकरूप झाले अंगा |
मन मिळालेसे मना | एका भलला जनार्दना || ३ ||
21. देवासी तो पुरे एक प्रेमभाव
देवासी तो पुरे एक प्रेमभाव | पूजा अर्चा वाव सर्व जाणा || १ ||
मनापासूनिया करिता कीर्तन | आनंदे नर्तन गाता गीत || २ ||
रामकृष्ण हरी उच्चार सर्वदा | कळी काळ बाधा तेणे नोहे || ३ ||
एका जनार्दनी हाचि पै विश्वास | सर्वभावे दास होईन त्याचा || ४ ||
22. आम्हा नादी विठ्ठलु
आम्हा नादी विठ्ठलु आम्हा छंदी विठ्ठलु
आम्हा नादी विठ्ठलु आम्हा छंदी विठ्ठलु हृद्परि मिळतसे || १ ||
आम्हा धातू विठ्ठल मातु | विठ्ठलु आनंदे || २ ||
आम्हा राग विठ्ठलु रंग विठ्ठलु सांग विठ्ठलु वैष्णवांचा || ३ ||
आम्हा ताल विठ्ठलु मेल विठ्ठलु कल्लोळ विठ्ठलु कीर्तने || ४ ||
आम्हा श्रुती विठ्ठलु श्रोता विठ्ठलु मत्ता इठ्ठलु वदनी || ५ ||
आम्हा मणी विठ्ठलु विठ्ठलु ध्यानी विठ्ठलु एका जनार्दनी अवघा विठ्ठलु || ६ ||
23. विठ्ठलावांचुनी आणिकांचे ध्यान
विठ्ठलावांचुनी आणिकांचे ध्यान | नाही आम्हा चिंतन दुजियाचे || १ ||
आमचे कुळीचे विठ्ठल दैवत | कुलधर्म समस्त विठ्ठल देव || २ ||
विठ्ठलावांचुनी नेणो क्रियाकर्म | विठ्ठलावांचून धर्म दुजा नाही || ३ ||
एका जनार्दनी विठ्ठल भरला | भरुनी उरला पंढरीये || ४ ||
24. आवडीने भावे हरिनाम घेती
आवडीने भावे हरिनाम घेती | तुझी चिंता त्यासी सर्व आहे || १ ||
नको खेद करू कोणत्या गोष्टीचा | पती लक्षुमीचा जाणतसे || २ ||
सकळ जीवांचा करितो सांभाळ | तुज मोकलिल ऐसे नाही || ३ ||
जैसी स्थिती आहे तैशापरी राहे | कौतुक तू पाहे संचिताचे || ४ ||
एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा | हरिकृपे त्याचा नाश आहे || ५ ||
हे पण वाचा 👇👇👇
- Abhir Gulal Abhang Lyrics
- Sant Dnyaneshwar Abhang In Marathi
- Sant Eknath Abhang
- Aamhi Jato Amuchya Gava Lyrics Marathi
तर आज इथे आपण एकनाथ महाराजांचा अभंग बघितले . यामध्ये काही मिस्टेक असतील तर कंमेंट मध्ये मला नक्की सांगा आणि अधिक भक्ती संबंधित पोस्ट आणि मराठी लिरिक्स साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .
हि पोस्ट वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏 !!!!!!!!!!!!!
Post a Comment