Sant Eknath Abhang | संत एकनाथ महाराजांचा सुन्दर अभंग संग्रह
नमस्कार मित्रांनो , या पोस्ट मध्ये आपण Sant Eknath Abhang बघणार आहोत .इथे आपण संत एकनाथ महाराजांचे अप्रतिम आणि निवडक असे अभंग मराठी भाषेमध्ये बघणारआहोत. चला तर मग बघुया Sant Eknath Abhang -
काया ही पंढरी अभंग लिरिक्स
काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल
नांदतो केवळ पांडुरंग
भाव भक्ती भीमा उदक ते वाहे
बरवा शोभताहे पांडुरंग
दया क्षमा शांती हेचि वाळुवंट
मिळालासे थाट वैष्णवांचा
ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद
हाची वेणुनाद शोभतसे
दश इंद्रियांचा एक मेळा केला
ऐसा गोपाळकाला होत असे
देखिली पंढरी देही जनी वनी
एका जनार्दनी वारी करी
–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–
माझे माहेर पंढरी अभंग लिरिक्स
माझे माहेर पंढरी,
आहे भीवरेच्या तीरी
माझे माहेर पंढरी,
आहे भीवरेच्या तीरी
बाप आणि आई,
माझी विठठल रखुमाई
माझे माहेर पंढरी ...
पुंडलीक राहे बंधू,
त्याची ख्याती काय सांगू
माझे माहेर पंढरी ...
माझी बहीण चंद्रभागा,
करीतसे पापभंगा
माझे माहेर पंढरी ...
एका जनार्दनी शरण,
करी माहेरची आठवण
माझे माहेर पंढरी ...
–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–
देह शुद्ध करुणि अभंग लिरिक्स
देह शुद्ध करुणि भजनी भजवावे ||
आणिकाचें नाठवावें दोषगुण ||
साधनें समाधी नको पां उपाधि |
सर्व समबुद्धी करी मन ||
ह्मणे जनार्दन घेई अनुताप |
सांडी पां संकल्प एकनाथा ||
–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–
ज्या सुखा कारणे देव वेडावला अभंग लिरिक्स
ज्या सुखा कारणे देव वेडावला,
वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला || धृ ||
धन्य धन्य संताचे सदन
तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण || १ ||
नारायण नारायण नारायण
लक्ष्मी नारायण नारायण नारायण
सर्व सुखाची सुखराशी,
संत चरणी भक्ती मुक्ती दासी
एका जनार्दनी पार नाही सुखा,
म्हणोनी देव भुलले देखा || २ ||
–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–
माझ्या मना लागो छंद अभंग लिरिक्स
माझ्या मना लागो छंद नित्य गोविंद गोविंद || धृ ||
तेणे निरसेल बंधन मुखी वदे नारायण || 1 ||
ब्रम्हरुप होई काया माया जाईल विलया || 2||
होय सर्व सुख धनी चुके जन्म मरण कानी|| 3 ||
म्हणे एका जनार्दन सदा समाधान मन || 4 ||
–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–
झाला महार पंढरीनाथ अभंग लिरिक्स
झाला महार पंढरीनाथ
काय देवाची सांगू मात
नेसला मळिण चिंधोटी
घेतली हातामधी काठी
घोंगडी टाकिली पाठी
करी जोहार दरबारात
मुंडाशात बांधली चिठी
फेकतो दुरुन जगजेठी
दामाजीनं विकली जी कोठी
त्याचं घ्यावं दाम पदरात
खळखळा ओतिल्या मोहरा
घ्या जी मोजून, पावती करा
ढीग बघून चमकल्या नजरा
शहा घाली बोट तोंडात
–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–⁘–
हे पण जरूर वाचा :
- Vitthal Abhang Lyrics
- Sant Dnyaneshwar Abhang In Marathi
- Vitthal Aarti Lyrics In Marathi
- Avaghe Garje Pandharpur Lyrics
- Aarti Dnyanraja Lyrics In Marathi
- Pasaydan Lyrics in Marathi
धन्यवाद !!!!!
Marathi meaning
उत्तर द्याहटवा