Abhir Gulal Abhang Lyrics | अबीर गुलाल उधळीत रंग
मित्रांनो , या पोस्ट मध्ये आपण Abhir Gulal Abhang Lyrics बघणार आहोत . हे भगवान् विठ्ठलाचा एक सुन्दर अभंग आहे . चला तर मग बघुया अभिर गुलाल उधळीत रंग या अभंगाचे बोल -
Abhir Gulal Abhang Lyrics | Marathi
अबीर गुलाल उधळीत रंग,
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग || धृ ||
उंबरठ्याशी कैसे शिवू आम्ही जाती हीन ,
रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्हीलीन,
पायरीसी होवू दंग गावूनी अभंग || १ ||
नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग
वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू,
चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हावू ,
विठ्ठलाचे नाव घेवूनि निसं:ग || २ ||
नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग
आषाढी कार्तिकी भक्तजन येती ,
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती,
चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग || ३ ||
नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग
अबीर गुलाल उधळीत रंग,
नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग
- संत चोखामेळा
☙ ☙ ☙
हे सुद्धा नक्की वाचा :
- Dev Vithuraya Lyrics In Marathi
- Jay Hari New Marathi Song Lyrics
- Aamhi Jato Amuchya Gava Lyrics Marathi
- Vitthal Abhang Lyrics
- Vitthal Aarti Lyrics In Marathi
मित्रांनो या पोस्ट मध्ये आपण Abhir Gulal Abhang Lyrics बघितले. अधिक भक्ति सम्बंधित पोस्ट साठी True Marathi Lyrics ला पुन्हा नक्की भेट द्या.
धन्यवाद !!!!!
Post a Comment