Header Ads

Nach Re Mora Ambyachya Vanat Lyrics | आंब्याच्या वनात नाच रे मोरा लिरिक्स


नमस्कार मित्रांनो , या पोस्ट मध्ये तुम्हाला Nach Re Mora Ambyachya Vanat Lyrics मराठी मध्ये वाचायला मिळतील . हे खूपच लोकप्रिय अस गान ग. दी . माडगूळकर यांनी लिहलेल आहे . तसेच आशा भोसले यांनी हे गान गायलेल आहे .


सॉन्ग - नाच रे मोरा
लिरिक्स - ग दी माडगूळकर
सिंगर - आशा भोसले
म्यूज़िक - पि ल देशपांडे


Nach Re Mora Ambyachya Vanat Lyrics

नाच रे मोरा, आंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच 

ढगांशी वारा झुंजला रे
काळा काळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी, वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच, 
नाच रे मोरा …(*2)

झरझर धार झरली रे
झाडांची भिजली इरली रे
पावसात न्हाऊ, काहीतरी गाऊ (*2)
करुन पुकारा नाच, 
नाच रे मोरा …(*2)

थेंब थेंब तळयात नाचती रे
टपटप पानांत वाजती रे
पावसाच्या रेघात, खेळ खेळू दोघात
निळया सवंगडया नाच, 
नाच रे मोरा …(*2)

पावसाची रिमझिम थांबली रे
तुझी माझी जोडी जमली रे
आभाळात छान छान सात रंगी कमान
कमानीखाली त्या नाच,
नाच रे मोरा …(*2)



हे सुद्धा जरूर वाचा :



तर मित्रांनो आज आपण Nach Re Mora Ambyachya Vanat Lyrics मराठी मधून बघितले . तुमचे कही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा आणि मराठी गान्याच्या लिरिक्स साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की दया .

धन्यवाद !!!!!!!!!!



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.