Madanmanjiri Song Lyrics | मदनमंजिरी | Phullwanti
नमस्कार, या पोस्टमध्ये आपण Madanmanjiri Song Lyrics बघणार आहोत. हे गाणं फुलवंती या मराठी चित्रपटातील आहे. वैशाली माडे यांनी हे गीत गायलेलं आहे. डॉ. प्रसाद बिवरे यांनी गाण्याचे लिरिक्स लिहिले आहेत. अविनाश विश्वजित यांनी गाण्याला म्युझिक दिल आहे.
सॉंग - मदनमंजिरी
मूवी -फुलवंती (2024)
लिरिक्स - डॉक्टर प्रसाद बिवरे
सिंगर - वैशाली माडे
म्युझिक - अविनाश विश्वजीत
म्युझिक ऑन - पनोरमा म्युझिक
Madanmanjiri Song Lyrics | Marathi
हं कानीअस्सल कीरत
माझी देखणी सुरत
न्हाई हटत कुणाच्या नजरा..
माझी पाटी हाय कोरी
माझं रूप लय भारी
नटे सावरे माळून हो गजरा
दिलवरा, राजसा
तुम्ही जरा बघा तरी
अशी मी मदन मंजिरी
सुबक ठेंगणी लखलखते सुंदरी
अशी मी मदन मंजिरी
चटक चांदणी चमचमते अंबरी...
अशी मी मदन मंजिरी
सुबक ठेंगणी लखलखते सुंदरी
अशी मी मदन मंजिरी
चटक चांदणी चमचमते अंबरी
भरवसा... हो भरवसा
दिलाचा कसा धरावा बाई
जीव हा जाई.. पेटूनी
कसाबसा अहो राजसा...
ठेवला हाय धीर गं बाई राखुनी
नाद हाय लय खुळा
माझ्या घुंगराचा चाळा
सोना नाणं उधळते मोहरा..
माझ्या नजरेचा बाण..
काळजात धुमशान ...
खोल जाऊन रुतलाया
ह्यो गहिरा.. ह्यो दिलवरा
तुम्ही...अंह तुम्ही नाही
तुम्ही जरा.. तुम्ही जरा
बघा तरी ..
अशी मी मदन मंजिरी
सुबक ठेंगणी लखलखते सुंदरी
अशी मी मदन मंजिरी
चटक चांदणी चमचमते अंबरी
अशी मी मदन मंजिरी
सुबक ठेंगणी भिरभिरते भिंगरी..
अशी मी मदन मंजिरी
चटक चांदणी लुकलुकते अंबरी...
माझं रूप बघून
सारंखूळ फिरती मागं पुढं
नाव मी सांगू कुणाचा आज
माझी अदा बघून येडं पिसं
कळना रात दिसं
लागलं भल्याभल्यांना नाद
तरी कसा एक पावणा
साधी नजर घेईना बाई
आला शिन कळना मला
कोणती युगत करू मी बाई
तुम्हा हाय काय खावं..
मी बी देत नाही भाव
तरी राव अदबीन मुजरा
माझी बात लय भारी
अशी हाय अदाकारी
शोभ त्यावर नाजूक ह्यो नखरा
दिलबरा.. ओ फेटेवालं..
तुम्ही.. तुम्हीच की
तुम्ही जरा..
तुम्ही जरा बघा तरी..
अशी मी मदन मंजिरी
सुबक ठेंगणी भिरभिरते भिंगरी
अशी मी मदन मंजिरी चटक चांदणी
चमचमते अंबरी
§ § § §
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- Phullwanti Ttle Song Lyrics
- Hey Pori Song Lyrics Marathi
- Maza Konkan Bhari Song Lyrics
- Hey Sharade Song Lyrics | Phullwanti
तर आज आपण Madanmanjiri Song Lyrics बघितली.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!! 🙏🙏🙏
it is not full lyrics
उत्तर द्याहटवाThank You Very Much..For Reading the Post and also correcting.. I added full lyrics now...
हटवा