Header Ads

ग दि माडगूळकर यांच्या कवितांचा संग्रह | Ga Di Madgulkaranchya Famous Kavita



नमस्कार मित्रानो , आज आपण ग दि माडगूळकर यांच्या कविता काही प्रसिद्ध कविता आपण इथे बघणार आहोत. कवितांकडे वळण्यापूर्वी ग दि माडगूळकरांबद्दल थोडं जाणून घेऊया. त्यांच्या नावाच्या सुरवातीच्या शब्दावरून त्यांना गदिमा असेही म्हणत. गदिमांचे पूर्ण नाव गजानन दिगंबर माडगूळकर (१ ऑक्टोबर १९१९ - १४ डिसेंबर १९७७) असे होते. ते एक प्रसिद्ध मराठी कवी, गीतकार,लेखक आणि अभिनेते होते. त्यांनी आपल्या करिअर मध्ये १५७ पटकथा आणि दोन हजारहून जास्त गाणी लिहिली होती. आपल्या अभूतपूर्व योगदानासाठी त्यांना १९६९ मध्ये पदमश्री पुरस्कारानी सम्मानीत करण्यात आले.



    ग दि माडगूळकर यांच्या कवितांचा संग्रह
    ग दि माडगूळकर यांच्या कवितांचा संग्रह

    1 - माहेर

    नदी सागराला मिळता, पुन्हा येईना बाहेर
    अशी शहाण्यांची म्हण, नाही नदीला माहेर

    काय सांगू रे बाप्पानो, तुम्ही आंधळ्यांचे चेले
    नदी माहेराला जाते म्हणुनीच जग चाले

    सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर
    तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर

    डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन,
    नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लावून

    पुन्हा होऊन लेकरू नदी वाजवितो वाळा
    पान्हा फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा

    - ग. दि. माडगूळकर


    2. सौन्दर्याची खाण पाहिली

    सौन्दर्याची खाण पाहिली,पाहिली आम्ही पहिल्यांदा
    नयनांमधला बाण लागला , लागला आम्हा पहिल्यांदा

    वाटते परंतु सांगाया न जुळे
    डोळ्यात आमुच्या भाव नवे आगळे
    बोलल्यावाचून गुज तुम्हालाला कळे
    शब्द मधाचे ठिबकू द्यात ना
    ठिबकू द्या कानी पहिल्यांदा !!

    हा रंग गोड का गालावरची खाली
    पाहता आमच्या पावन झाल्या कुळी
    उपजली उगीचच मनात अशा खुळी
    घायाळची गती समजली
    समजली आम्हा पहिल्यांदा !!

    या आधी आम्हा माहित नव्हती प्रीत
    परी आज सुखाचा स्वर्ग लागला हाती
    कधी दोन मनांची जुळून येतील नाती
    नकळत चेटूक होय आम्हावर
    आम्हावर असले पहिल्यांदा !!

    - ग. दि. माडगूळकर


    3 - मागणे

    वेळ साधुनी मिळावी
    जठराग्नीस आहुती
    माझ्या ऐकल्या व्यक्तीचे
    मागणे ते किती ?

    साऱ्या जगासाठी द्यावा
    गुरुदेव एक वर
    जीव जीव सुखी व्हावा
    स्वर्ग यावा पृथ्वीवर !!!!!!!!

    - ग. दि. माडगूळकर


    4. गोरी गोरी पान फुलासारखी छान

    दादा मला एक वाहिनी आण
    वाहिनीला आणायला चांदोबाची गाडी
    चांदोबाच्या गाडीला हरिणाची जोडी
    हरिणाची गाडी तुडवी गुलाबाचे रान
    दादा मला एक वाहिनी आण

    गोऱ्या गोऱ्या वाहिनीची अंधाराची साडी
    अंधाराच्या साडीला चांदण्याची खडी
    चांदण्याच्या पदराला बिजलीचा बाण
    दादा मला एक वाहिनी आण

    वाहिनीशी गट्टी होता तुला दोन थापा
    तुला दोन थापा तिला साखरेचा पापा
    बाहुल्यांच्या परी होऊ दोघी आम्ही छान
    दादा मला एक वाहिनी आण !!!!

    - ग. दि. माडगूळकर


    5. सांग मला रे सांग मला

    सांग मला रे सांग मला
    आई आणि बाबा यातून कोण आवडे अधिक तुला ??

    आई दिसते गोजिरवाणी, आई गाते सुंदर गाणी
    तऱ्हेतऱ्हेचे खाऊ येती, बनवायला सहज तिला !!
    आई आवडे अधिक मला !!

    गोजिरवाणी दिसते आई परंतु भित्री भागुबाई
    शक्तिवान किती असती बाबा थप्पड देती गुराख्याला !!
    आवडती रे वडील मला !!

    घरात करते खाऊ आई , घरातल्याला गंमत नाही
    चिंगम अन चॉकलेट तर , बाबा घेती रस्त्याला !!
    आवडती रे वडील मला !!

    कुशीत घेता रात्री आई थंडी वारा लागत नाही
    मऊ सायीचे हात आईचे सुगंध तिचिया पाप्याला !!
    आई आवडे अधिक मला !!

    नीजत सांगे बाबांजवळी भुते-राक्षसे पळती सगळी
    मिशा चिमुकल्या करती गुदगुल्या त्यांच्या आपुल्या गालाला !!
    आवडती रे वडील मला !!

    आई सुंदर कपडे शिवते , पावडर , तीटी तीच लावते
    तीच सजविले सदा मुलींना रिबीन बांधून वेणीला !!
    आई आवडे अधिक मला !!

    त्या रिबिनीला पैसे पडती ते तर बाबा मिळवून आणती
    कुणी न देती पैसा-दिडकी घरात बसल्या आईला !!
    आवडती रे वडील मला !!

    बाई म्हणती माय पुजावी , माणूस ती ना असते देवी
    रोज सकाळी नमन करावे हात लावूनी पायाला !!
    आई आवडे अधिक मला !!

    बाबांचा क्रम वरती राही, त्यांच्या पाय पडते आई !
    बाबा येता भिऊनी जाई सावरते ती पदराला !!
    आवडती रे वडील मला !!

    धडा शिक रे तू बैलोबा, आईहुनही मोठे बाबा
    म्हणून आया तयार होती , बाबांसंगे लग्नाला !!
    आवडती रे वडील मला !!

    - ग. दि. माडगूळकर


    6 - मृग

    माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार
    भुकेजल्या तान्ह्यासम तोंड पसरी शिवार

    तुकोबांच्या अभंगाला मंद चिपळ्यांची साथ
    भरारतो रानवारा तास झाडाझुडपांत !!!!

    पिउनिया रानवारा खोंड धावे वारेमाप
    येता मातीचा सुगंध स्तब्ध झाले आपोआप ....

    अवखळ बाळापरी पक्षी खेळतो मातीत,
    उभारल्या पंखावर थेम्ब मातीचे झेलीत ....

    धारा वर्षता वरून बैल वशिंड हालवी,
    अवेळीच फुटे पान्हा गाय वत्साला बोलवी !!!!!

    गावानेच उंच केला- हात प्रसादास,
    भिजूनिया चिंब झाला गावदेवीचा कळस

    निसर्गाने दिले धन द्यावे दुसऱ्या जाणुनी
    झाली छप्परे उदार आल्या पागोळ्या अंगनी !!!!!!!

    काळ्या मला करितात बाळे उघडी नागडी
    साचलेल्या पाण्यामध्ये नाचतात घडी घडी

    स्नान झाले धरणीचे पडे सोन्याचा प्रकाश
    आता बसेल माउली अन्नब्रम्हाच्या पूजेस

    - ग. दि. माडगूळकर


    7 - युद्धानंतर

    युद्धानंतर काय जगावर
    राज्य नादाने शांतीचे ??
    युद्धानंतर चढतील गगनी
    काय मनोरे नीतीचे ??

    युद्धानंतर नंदनवन का
    होईल अवघ्या विश्वाचे ??
    छे छे ; नाही युधोत्तर मग -
    प्रयत्न दुसऱ्या युद्धाचे ......

    - ग. दि. माडगूळकर


    8 - मज नकोत अश्रू

    मज नकोत अश्रू , घाम हवा
    हा नव्या युगाचा मंत्र नवा

    होते तैसी अजून उते मी
    साधन अननदा सुवर्णभूमी
    खंडतुल्य या माझ्या धामी
    का बुभिक्षितांचा रडे थवा ??

    अपार लक्ष्मी माझ्या पोटी
    का फारसी मन माझ्या पाठी
    एक मूठभर अन्नासाठी
    जगतोस तरी का भ्याड जीवा ??

    काय लाविसी हात कपाळी
    फेकून दे ती दुबळी झोळी
    जाल आळसाची तव होळी
    तू जिंक बाळाने पराभवा

    मोल श्रमाचे तुला कळू दे
    हात मळू दे घाम गळू दे
    सुखासीनता पूर्ण जळू दे
    दैन्यास तुझ्या हा एक देवा !!!!

    - ग. दि. माडगूळकर


    9 - कुंभारासारखं गुरु नाही

    कुंभारासारखं गुरु नाही रे जगात
    वारी घालितो धपाटा, आत आधाराला हात

    आधी तुडवी तुडवी मग हाते कुरवाळली
    ओल्या मातीच्या गोळ्याला येई आकृती वेगळी

    घाट जाती थोराघरी, घाट जाती राऊळात
    कुणी चढून बसतो गावगौरीच्या मस्तकी

    कुणी मद्यपात्र होतो रावराजांच्या हस्तकी
    आव्यातली आग नाही पुन्हा आठवत

    कुणी पूजेचा कलश, कुणी गोरसाचा माठ
    देता आकार गुरूने ज्याची तयाला लाभे वाट
    घाट पावती प्रतिष्ठा, गुरु राहतो अज्ञात !!!!!!!!

    - ग. दि. माडगूळकर


    10 - त्या तिथे पलीकडे

    त्या तिथे पलीकडे
    माझिया प्रियेचे झोपडे !!

    गावात उंच दात
    वळत जाई पायवाट
    वळणावर आंब्याचे
    झाड एक वाकडे

    कौलावर गारवेल
    वाऱ्यावर हळू झुलेलं
    गुलमोहर डोलता
    स्वागत हे केवढे !!!

    तिथेच वृत्ती गुंगल्या
    चांदराति रंगल्या
    कल्पनेत स्वर्ग तो
    तिथे मनास सापडे !!!

    - ग. दि. माडगूळकर


    11 - या कातरवेळी

    या कातरवेळी .....
    पाहिजेस तू जवळी
    दिवस जाय बुडून पार
    ललितनाभि मेघ चार ....

    पुसट त्यास जरी किनार
    शेष तेज वलय वलय
    पावे कमी सहज विलय
    कसले तरी दाते भय

    येई तूच तम उजळी
    येई बैस ये समीप
    अधरे हे नयन टीप
    दोन ज्योती एक दीप
    मदप्रभ मग पिवळी

    - ग. दि. माडगूळकर


    12 - काय वाढले पानावरती

    काय वाढले पानावरती
    एकूण घ्यावा थाट संप्रती

    धवल लवण हे पुढे वाढले
    मेतकूट मग पिवळे सजले
    आले लोणचे बहू मुरलेले
    लिंबू कागदी रसरसलेले

    किसून आवळे मधुर केले
    कृष्णाकाठचे वांगे आणले
    खमंग तयाचे भरीत केले

    निरनिराळे चटके नटले
    चटण्यांचे बहू नवे मासले
    संमेलनची त्यांचे भरले

    मिरची खोबरे तीसह ओले
    तीळ भाजून तयात वाटले
    कवठ गुळाचे मिलन झाले
    पंचामृत त्या जावळी आले

    वास त्यांचे हवेत भरले
    अंतरी अण्णा अधीर जाहले
    भिजल्या डाळी नंतर आल्या
    काही वाटल्या काही मोकळ्या
    काही वाटून सुरेख तळल्या

    कोशिंबिरीच्या ओळी जमल्या
    शुभ्र काकड्या होत्या किसल्या
    मुळा कोवळा, मिरच्या ओल्या
    केळी कापून चकत्या केल्या
    चिरून पेरूच्या फोडी सजल्या
    एक रूप त्या दह्यात झाल्या

    भाज्या आल्या अळू , घोसाळी
    रान कारली, वांगी काळी
    सुरण, तोंडली आणि पडवळी
    चुका चाकवत, मेथी कवळी
    चंदन बटवा भेंडी कवळी
    फणस कोवळा, हिरवी केळी
    काजूगरांची गोडी निराळी
    दुधी भोपळा आणि रताळी

    किती प्रकारे वेगवेगळी
    फेण्या पापड आणि सांडगे
    कुणी आणुनी वाढे वेगे
    गव्हल्या नकुल्या धवल मालत्या
    खिरी त्यांच्या शोभत होत्या

    शिव्यांच्या खिरी वाटल्या
    आमट्यानी नि मग वाट्या भरल्या
    सार गोडसे रातंब्याचे
    भरले प्याले मधुर कढीचे

    कणीदार मग तूप सुगंधी
    भट वाढण्यास थोडा अवधी .........

    - ग. दि. माडगूळकर


    13 - इथे टाका तंबू

    चला जाऊद्या पुढे काफिला
    अजून नाही मार्ग संपला
    इथेच टाका तंबू .....

    जाता जाता जरा विसावा
    एक रात्र थांबू
    इथेच टाका तंबू .....

    थोडी हिरवळ थोडे पाणी
    मस्त त्यात हि रात चांदणी
    उतरा ओझी विसरा थकवा
    सुखास पळभर चुंबू
    इथेच टाका तंबू ......

    अंगशहारे जशी खंजिरी
    चांदही हलला, हलल्या खजुरी
    हलल्या तारा, हलला वारा
    नृत्य लागले रंगू
    इथेच टाका तंबू ......

    निवल्या वाळूवरी सावली
    मंद मस्तानी नाचू लागली
    लयीत डूलती थकली शरीरे
    नयन लागले झिंगू
    इथेच टाका तंबू .......

    - ग. दि. माडगूळकर


    14 - बिन भिंतींची शाळा

    बिन भिंतींची उघडी शाळा, लाखो इथले गुरु
    झाडे, वेळी, पशु, पाखरे यांशी गोष्टी करू

    बघू बंगला या मुंग्यांचा सूर ऐकुया त्या भुंग्यांचा
    फुलाफुलांचे रंग दाखवील फिरते फुलपाखरू
    हिंडू ओढे, धुंडू ओहळ झाडावरचे काढू मोहळ
    चिडत्या डसत्या मधमाश्यांशी जरा सामना करू
    लाखो इथले गुरु !!!!

    हलवू झाडे चिटबोरांची, पिसे शोधूया वनी मोरांची
    माळावरची बिळे चला रे काठीने पोखरू
    सुगरण बांधी उलट वाडा, पाण्यावरती चाले घोडा
    मासोळीसम बिनपायांचे बेडकीचे लेकरू
    लाखो इथले गुरु !!!!!

    कसा जोंधळा राणी रुजतो, उंदीरमामा कोठे निजतो
    खबदाडातील खजिना त्याचा फस्त खाऊनी करू
    भल्या सकाळी उन्हात न्हाऊ, कड्या दुपारी पऱ्ह्यात पोहू
    मिळे तिथून घेऊन विद्या, अखंड साठा करू
    लाखो इथले गुरु !!!!

    - ग. दि. माडगूळकर


    15 - हे राष्ट्र देवतांचे

    हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
    आ - चंद्र, सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
    कर्तव्यदक्ष भूमी सीता रघूत्तमाची

    रामायणे घडावी येथे पराक्रमांची
    शीर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वताचे || १ ||
    आ - चंद्र, सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे !!!!!

    येथे नसो निराशा, थोड्या पराभवाने
    पार्थास बोध केला इथेच माधवाने
    हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे || २ ||
    आ - चंद्र, सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे !!!!!!

    हे राष्ट्र विक्रमांचे, हे राष्ट्र शांततेचे
    सत्यार्थ झुंज द्यावी, या जागत्या प्रथेचे
    येथे शिवप्रतापी नरसिंह योग्यतेचे || ३ ||
    आ - चंद्र, सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे !!!!!!

    येथे परंपरांचा सम्मान नित्य आहे
    जनशासनातळीचा पायाच सत्य आहे
    येथे सदा निनादो जयगीत जागृतांचे || ४ ||
    आ - चंद्र, सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे !!!!!!

    - ग. दि. माडगूळकर


    16 - अपराध मीच केला

    अपराध मीच केला शिक्षा तुझ्या कपाळी
    जाणीव हीच माझ्या जीवा सदैव जाळी

    जन्मात एक झाली हि प्रितिभेट देवा
    डोळ्यांनी हृदयात या पाय हळूच ठेवा
    बोलून द्यायची मी भलतेच लाभवेळी !!

    राष्ट्रात जन्मलेला मी पाहून क्षणाचा
    भासत गुंतवावा मी जीव का कुणाचा
    अक्षम्य चूक झाली, मी प्रीत दाखवीली !!

    - ग. दि. माडगूळकर


    17 - हे चिंचेचे झाड

    हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी
    दिसशी तू नवतारुनि काश्मिरी

    बघ निळसर पाणी झेलमचे झुळझुळे
    हे गावात नव्हे ग पिवळे केशरमुळे
    हि किमया केवळ घडते प्रीतीमुळे
    उघडे डोंगर आज हिमाचे मुकुट घालती शिरी ....

    रुसलास उगा का जावळी ये ना जरा
    ग गीत बुलबुल माझ्या चिटपाखरा
    हा राग खरा कि नखऱ्याचा मोहरा
    किती वार मी मारू तुझ्यावर, किती करू शायरी .....

    हार रंग दाविती, गुलाब गहिरे फिके
    तुज दाल सरोवर दिसते का लाडके
    पाण्यात तरंगे घरकुल से होडके
    त्यात बैसूनि मधुचंद्राची रात करू साजरी ......

    - ग. दि. माडगूळकर



    हे पण वाचा :



    तर मित्रानो , आज आपण ग दि माडगूळकर यांच्या कविता बघितले. तुम्हाला हि पोस्ट कशी वाटली ते मला कंमेंट मध्ये नक्की सांगा आणि अन्य मराठी गाण्यांच्या लिरिक्स साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .

    धन्यवाद !!!!!!!!!


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Blogger द्वारे प्रायोजित.