Header Ads

सुरेश भट कविता (मराठी) | Suresh Bhat Kavita Sangrah


नमस्कार नित्रांनो, स्वागत आहे तुमचं True Marathi Lyrics  वर !!!! सुरेश भट हे मराठी भाषेतील एक सुप्रसिद्ध कवी आहेत. त्यांचा जन्म १५ एप्रिल १९३२ ला महाराष्ट्रातील अमरावती इथे झाला होता. त्यांचा जन्म जरी एका ब्राम्हण कुटुंबात झाला असला तरी वयाच्या उत्तरार्धात त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. ' गझल ' हा काव्यप्रकार त्यांनी प्रथमच मराठी मध्ये रुजवला. म्हणून त्यांना गझलसम्राट देखील म्हटले जाते. सुरेश भट यांचे एल्गार (1983), रंग माझा वेगळा (1974), झंझावात (1994), सप्तरंग (2002) हे काही प्रसिद्ध काव्यसंग्रह आहेत. १४ मार्च २००३ रोजी वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या पोस्ट मध्ये आपण सुरेश भट यांच्या काही कविता बघणार आहोत. चला तर मग वळूया कवितांकडे -


    1. आयुष्य छान आहे

    आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे
    रडतोस काय वेड्या, लढण्यात शान आहे

    अश्रूच यार माझा मदिरेसमान आहे
    काट्यातही फुलांची झुलती कमान आहे

    उचलून घे हवे ते दुनिया दुकान आहे
    जगणे निरर्थ म्हणतो तो बेईमान आहे

    सुखासाठी कधी हसावं लागत
    तर कधी रडावं लागत

    कारण सुंदर धबधबा बनायला
    पाण्यालाही उंचावरून पडायला लागत ...

    - सुरेश भट्ट

    ⸎ ⸎ ⸎ ⸎  ⸎ ⸎


    2. आकाश उजळले होते

    इतकेच मला जाताना सरणावर कळले होते
    मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते

    हि दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही
    मी बाहेर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते

    गेलेल्या आयुष्याचा मधुमास गाडे विसरू या
    पाऊल कधी वाऱ्याचे माघारी वळले होते

    मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी
    मी नाव ऐकले तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते

    याचेच रडू आले कि जमले न मला रडणेही
    मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते

    नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली
    नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते

    घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली
    जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते

    मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो
    मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते

    - सुरेश भट्ट

    ⸎ ⸎ ⸎ ⸎  ⸎ ⸎


    3. चुकलेच माझे

    मी कशाला जन्मलो, चुकलेच माझे
    या जगाशी भांडलो, चुकलेच माझे

    मान्यही केले तू आरोप सारे
    मीच तेव्हा लाजलो, चुकलेच माझे

    सांग आता ती तुझी का हाक होती ?
    मी खुला भांबावलो !! चुकलेच माझे

    चालताना ओळखीचे दार आले
    मी जरासा थांबलो ... चुकलेच माझे

    पाहिजे पूजेस त्यांना प्रेत माझे !!
    मी जगाया लागलो, चुकलेच माझे

    वाट माझ्या चार शब्दांचीच होती
    मी न काही बोललो - चुकलेच माझे

    - सुरेश भट्ट

    ⸎ ⸎ ⸎ ⸎  ⸎ ⸎


    4. एकटी

    मी एकटीच असते माझी कधी कधी
    गर्दीत भोतीच्या असते कधी कधी

    येते न ओळखीचे कोणीच राहिले
    होतात भास मजला नुसते कधी कधी

    मागेच मी कधीची हरपून बैसले
    आता नको नकोशी दिसते कधी कधी

    जखमा बुजून गेल्या साऱ्या तरीही
    असावीत जीवनाला बसते कधी कधी

    मी एकटीच माझी असते कधी कधी
    गर्दीत माझ्या भोवतीच्या नसते कधी कधी

    - सुरेश भट्ट

    ⸎ ⸎ ⸎ ⸎  ⸎ ⸎


    5. रंग माझा वेगळा !!!

    रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा !
    गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा !!

    कोण जाणे कोठींनी ह्या सावल्या आल्या पुढे ;
    मी असा कि लागती ह्या सावल्यांच्याही झळा !!

    राहती माझ्यासवे हि असावे गीतांपरी :
    हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा !!

    कोणत्या काली कळेना मी जगाया लागलो
    अन कुठे आयुष्य गेले कंपनी माझा गळा ?

    संगती ' तात्पर्य ' माझे सारख्या खोट्या दिशा ;
    चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा !!

    माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी ;
    माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !!

    - सुरेश भट्ट

    ⸎ ⸎ ⸎ ⸎  ⸎ ⸎


    6. वणवण

    रुणझुणत राहिलो ! किणकिणत राहिलो !
    जन्मभर मी तुला ये म्हणत राहिलो !!

    सांत्वनाना तरी हृदय होते कुठे ?
    रोज माझेच मी मन चीनत राहिलो !!

    ऐकणारे तिथे दगड होते जरी,
    मीच वेड्यापरी गुणगुणत राहिलो !!

    शेवटी राहिले घर सुनेच्या सुने ...
    उंबर्यावरच मी तणतणत राहिलो !!

    ऐनवेळी उभे गाव झाले मुके ;
    मीच रस्त्यावर खणखणाट राहिलो !!

    विझत होते जरी दीप भवतालचे,
    आतल्याआत मी मिणमिणती राहिलो !!

    दूर गेल्या पुन्हा जवळच्या सावल्या
    मी जसच्या तास रणरणत राहिलो !!

    मज न ताराच तो गवसला नेमका ...
    आंबरापार मी वनावनात राहिलो !!

    - सुरेश भट्ट

    ⸎ ⸎ ⸎ ⸎  ⸎ ⸎


    7. वय निघून गेले

    देखावे बघण्याचे वय निघून गेले
    रंगावर भुलण्याचे वय निघून गेले

    गेले ते उडून रंग
    उरले हे फिकट संग

    हात पुढे करण्याचे वय निघून गेले
    कळते पाहून हेच
    हे नुसते चेहरेच
    चेहऱ्यांत जगण्याचेवय निघून गेले

    रोज नवे एक नाव
    रोज नवे एक गाव
    नाव गाव पुसण्याचे वय निघून गेले

    रिमझिमती रातंदिन
    स्मरणांचा अमृतघन
    पावसात भिजण्याचं वय निघून गेले

    आला जर जवळ अंत
    का हा आला वसंत ?
    हाय, फुले टिपण्याचे वय निघून गेले

    - सुरेश भट्ट

    ⸎ ⸎ ⸎ ⸎  ⸎ ⸎


    8. पहिले वळून मला

    कळे न काय कळे एवढे कळून मला
    जागून मीच असा घेतसे छळून मला

    तुरुंग हाच मला सांग तू कुठे नाही ?
    मिळेल काय असे मला दूरही पळून मला

    पुसू कुणास कुठे राख राहिली माझी ?
    उगीच लोक खुले पाहती जाळून मला

    खरेच सांग मला .... काय हि तुझीच फुले ?
    तुझा सुगंध कसा ये न आढळून मला ?

    जरी अजून तुझे कर्ज राहिले नाही
    अजून घेत राहा जीवाला पिळून मला

    उजाडलेच कसे ? हि उन्हे कशी आली ?
    करी अजून खुणा चंद्र मावळून मला

    कधी हाक तुझी हाय ऐकली नाही
    अखेर मीच पुन्हा पहिले वळून मला

    - सुरेश भट्ट

    ⸎ ⸎ ⸎ ⸎  ⸎ ⸎


    9. भोगले जे दुःख त्याला

    भोगले जे दुःख त्याला, सुख म्हणावे लागले
    एवढे मी भोगिले कि मज हसावे लागले

    ठेविले आजन्म डोळे, आपुले मी कोरडे
    पण दुजांच्या आसवांनी, मज भिजावे लागले

    लोक भेटण्यास आले, काढतंय पायसावे
    अन अखेरी कुशल माझे, मज पुसावे लागले

    गवसला नाही मजला, चेहरा माझा कधी
    मी कशी होते मलाही आठवावे लागले

    एकदा केव्हातरी मी वाचन कवितेला दिले
    राखरांगोळीस माझ्या गुणगुणावे लागले

    - सुरेश भट्ट

    ⸎ ⸎ ⸎ ⸎  ⸎ ⸎



    हे पण वाचा 👇👇👇


    तर मित्रांनो आज आपण सुरेश भट यांच्या कविता बघितल्या. तुमच्या काही प्रतिक्रिया, सजेशन असतील तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अधिक मराठी कविता आणि अन्य पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.

    हि पोस्ट वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Blogger द्वारे प्रायोजित.