Header Ads

मराठी कविता कुसुमाग्रज | Kusumagraj Poems In Marathi


नमस्कार मित्रानो , आज या पोस्ट मध्ये आपण कुसुमाग्रजांच्या कविता मराठी मधून बघणार आहोत. इथे आपण कुसुगरजांच्या काही प्रसिद्ध आणि प्रेरक अशा कविता बघणार आहोत. या आधीसुद्धा मी कुसुमाग्रजांच्या कवितांवर एक पोस्ट लिहिलेली होती. ती तुम्ही वाचली नसेल तर जरूर वाचा. खाली मी त्याची लिंक देत आहे. त्यामध्ये पण आपण कुसुमाग्रजांच्या काही निवडक आणि प्रसिद्ध कविता बघितल्या होत्या. चला तर मग वळूया कवीतांकडे -
    मराठी कविता कुसुमाग्रज
    मराठी कविता कुसुमाग्रज


    1. कणा

    'ओळखलंत का सर मला ' पावसात आला कोणी
    कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी .
    क्षणभर बसला , नंतर हसला , बोलला वरती पाहून ;
    'गंगामाई ' पहाणी आली , गेली घरट्यात राहून
    माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली
    मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली
    भिंत खचली , चूल विझली , होते नव्हते नेले ,
    प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले
    कारभारणीला घेऊन संगे , सर आता लढतो आहे
    पडकी भिंत बांधतो आहे , चिखलगाळ काढतो आहे
    खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
    ' पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला
    मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
    पाठीवरती हात ठेऊन नुसते लढा म्हणा

    - कुसूमग्रज


    2. वेडात मराठे वीर दौडले सात

    वेडात मराठे वीर दौडले सात
    श्रुती धान्य जाहल्या , श्रवुनी आपुली वार्ता
    रान सोडूनि सेनासागर आमुचे पळता
    अबलंही घरोघर खऱ्या लाजत आता
    भर दिवस आम्हा दिसू लागली रात
    वेडात मराठी वीर दौडले सात

    ते कठोर अक्षर एक एक त्यातील
    जाळीत चालले कणखर ताठर दील
    माघारी वळणे नाही मराठी शील
    विसरला महाशय काय लावता जात
    वेडात मराठी वीर दौडले सात

    वर भिवयी चढली , दात दाबिती ओठ
    छातीवर तुटली पाटबंधाची गाठ
    डोळ्यात उठे काहूर , वळावे काठ
    नयनातून उसळे तलवारीची पात
    वेडात मराठी वीर दौडले सात

    जरी काल दाविली प्रभू , गनिमांना पाठ
    जरी काल विसरलो जरा मराठी जात
    हा असा धावतो आज अरी - शिबिरात
    तव मानकरी हा घेऊनि शीर करांत
    वेडात मराठी वीर दौडले सात

    ते फिरता बावीस डोळे , किंचित ओले
    सरदार सहा , सरसावून उठले शेले
    रिकिबीत टाकले पाय झेलले भाले
    उसळले धुळीचे मेघ सात , निमिषांत
    वेडात मराठी वीर दौडले सात

    आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
    अपमान बुजविण्या सात अर्पूनि माना
    छावणीत शिरले थेट थेट गनिमांना
    कोसळल्या उल्का जळत सात , दर्यात
    वेडात मराठी वीर दौडले सात

    खालून आग , वर आग , आग बाजूंनी
    समशेर उसळली सहस्त्र क्रूर इमानी
    गर्दीत लोपले सात जीव ते मानी
    खग सात जळाले अभिमानी वणव्यात
    वेडात मराठी वीर दौडले सात

    दगडांवर दिसतील अजून तेथल्या टाचा
    ओढ्यात तरंगे अजुनी रंग रक्ताचा
    क्षितिजावर उठतो अजुनी मेघ मातीचा
    अद्याप विराणी कुणी वाऱ्यावर गात
    वेडात मराठी वीर दौडले सात

    - कुसुमाग्रज


    3. मुक्त


    पिंजरा तोडून
    मुक्त झालेला तो पक्षी
    जखमी पंखातील रक्ताने
    हिरव्या भूमीवर
    लाल नागमोडी उमटवीत
    उडतो आहे आपल्या घरट्याकडे ,
    कदाचित आपल्या मृत्युकडेही .
    पण
    त्याच्याकडे करुणेने पाहणारे 
    सारे आकाशही
    हिरावून घेऊ शकत नाही
    रक्तात माखलेला
    त्याचा आंनद ...... अभिमान ....
    पिंजरा तोडल्याचा .

    - कुसुमाग्रज


    4. माझ्या मराठी मातीचा

    माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा
    हिरव्या सांगणे जागल्या,  दऱ्या खोऱ्यातील शिळा

    माझ्या मराठी मातीला, नका म्हणे हीन दिन
    स्वर्गलोकाहून थोर, मला हिचे महिमान

    रत्नजडित अभंग,  ओव्या अमृताची सखी
    चारी वर्णतुनी फिरे, सरस्वतीची पालखी

    रसरंगात भिजला, येथे शृंगाराचा स्वर
    येथे अहंता द्रवली, झाले वसुधेचे घर

    माझ्या मराठी मातीचा,  नका करू अवमान
    हिच्या दरिद्र्यात आहे, भविष्याचे वरदान

    नाही पसरला कर, कधी मागायास दान
    स्वर्ण सिंहासनापुढे, कधी लावली ना मान !!!!

    - कुसुमाग्रज


    5. सात चमचे

    चमच्याच्या स्टॅन्ड वर सात चमचे होते .
    एक चमचा एके दिवशी गहाळ झाला ,
    उरलेल्या सहाच्या गळ्यातून प्रथमच
    अनावर हुंदका फुटला .....
    ' ती असती तर ' - ते उद्धाराले
    तो हरवला नसता .........
    मी हि अनावरपणे ,
    सातवा चमचा झालो आणि
    त्याची रिकामी जागा घेऊन
    सहांच्या हुंदक्यात सामील झालो
    आणि पुटपुटलो ......
    खर आहे मित्रांनो !!!!!!!
    ती असती तर मी हरवलो नसतो .........

    - कुसुमाग्रज



    6. नाते

    नात्यास नाव आपल्या देऊ नकोस काही |
    साऱ्याच चांदण्याची जाण जगतास नाही |
    व्यवहार कोविंदांचा होईल रोष होवो |
    व्याख्येतूनीच त्यांची प्रज्ञा वाहत जाई |
    ना तालराग यांच्या बांधत बांधलेला |
    स्वरमेघ मंजूळाचा बारसे दिशांत दाही |
    गावातल्या दिव्यांना पाठ तो कसा पुसावा |
    मंझिलकी जयाची तारांगणात राही |

    - कुसुमाग्रज



    7. अघटित

    पाहत दिसतं क्षितिजावरती
    विझवायला
    तयार झाला
    रस्त्यावरचा कुणी दिवा -
    तोच चांदणी एक नभातील
    त्यास म्हणाली ,
    (का , ते केवळ जाणे ईश्वर )
    थांब घडीभर
    स्नेह तुझा मज
    जरा हवा.

    - कुसुमाग्रज

     

    8. एकटे

    असंख्य नक्षत्रांची यात्रा घेऊन
    विश्व् चालले आहे विश्वातूनच
    आणि विश्वाकडेच ,
    काळीं , दिशाहीन , निरुद्देश , अनाद्यन्त
    विश्व् भयाण एकटे
    आपल्या विश्वातच

    - कुसुमाग्रज



    9. श्रावण आला

    हसरा नाचरा , जरासा लाजरा ,
    सुंदर साजिरा श्रावण आला
    तांबूस कोमल पाऊल टाकीत
    भिजल्या मातीत श्रावण आला
    मेघांत लावीत सोनेरी निशाने
    आकाशवाटेने श्रावण आला

    लपत ,छपत , हिरव्या रानात ,
    केशर शिंपीत श्रावण आला
    इंद्रधनुष्याच्या बांधीत कमानी
    संध्येच्या गगनी श्रावण आला

    लपे ढगामागे , धावे माळावर ,
    असा खेळकर श्रावण आला
    सृष्टीत सुखाची करीत पेरणी
    आनंदाच्या धनी श्रावण आला

    - कुसुमाग्रज


    10. घड्याळ बाबा

    घड्याळ बाबा भिंतीवर बसतात
    दिवसभर टिक टिक करतात
    ठण ठण ठोके देतात आणि म्हणतात
    मुलांनो सहा वाजले आता उठा
    मुलांनो आठ वाजले आता आंघोळ करा
    मुलांनो दहा वाजले आता जेवण करा
    मुलांनो अकरा वाजले आता शाळेत जा
    आम्ही रोज घड्याळ बाबांचं ऐकतो
    पण रविवारी काहीच ऐकत नाही
    ते म्हणतात सहा वाजले उठा
    आम्ही सात वाजता उठतो
    ते म्हणतात आठ वाजले आंघोळ करा
    आम्ही नऊ वाजता आंघोळ करतो
    ते म्हणतात दाह वाजले जेवण करा
    आम्ही अकरा वाजता जेवण करतो
    आणि रविवारी तर शाळेला सुट्टीच असते
    मग घड्याळ बाबा खूप रागावतात
    जोरजोरात ठाण ठाण ठोके देतात
    पण रविवारी आम्ही त्यांच्याकडे बघत सुद्धा नाही
    बघितले तरी फक्त हसतो आणि खेळत राहतो

    - कुसुमाग्रज



    11. अपार माझ्या काळोखाला

    अपार माझ्या काळोखाला दिलीस जीवनतारा
    सुंदर आता झाली धरती , सुंदर नभ हे वरती
    वैरणावर उधळीत आला श्रावण सुंदर मोती
    मनात माझ्या मोरपिसांचा फुलाला रंग पिसारा
    रात्र एक मी अथांग होते नव्हता दीप उशाला
    जागाही नव्हती , नाझी नव्हती , नव्हता अर्थ कशाला
    हारपलेल्या या नौकेला गवसे आज किनारा

    - कुसुमाग्रज


    12. काळ

    इतका काळ वाहून गेल्यावर
    आज वाटते
    काळ हि संकल्पना
    शंकास्पद आहे
    अंड्यांच्या विश्वाच्या अस्तित्वाला
    अंकित करण्यासाठी
    माझ्या मनानं
    निर्माण केलेली काळल्पना
    हेही एक अनुमान
    कवीच्या प्रतिभेने निर्माण केलेलं
    माणसाला दिलेलं त्याच्या व्यवहारिक सोयीसाठी
    हे सोयीचं कारागृह मी
    मानलेच पाहिजे का ??

    - कुसुमाग्रज


    13. केव्हा तरी मिटण्यासाठीच ...

    केव्हा तरी मिटण्यासाठीच , काळजामधला श्वास असतो
    वाट केव्हा वैरीण झाली , तरी झाडे प्रेमळ होती
    लाल जांभळे भेटून गेली , साथीत उरली निळी नाती
    काळोखाच्या गुहेत देखील ,धडपडणारे किरण होते
    पेटवलेल्या दिपालींना , वादळवाऱ्यात मरण होते
    असणे आता असत असत ... नसण्यापाशी अडले आहे
    जिव्हाळ्याच्या चिता पेटवीत , बरेच चालणे घडले आहे
    माथ्यावरचा आभाळबाबा , सवाल आता पुसत नाही
    पृश्वी झाली पावला पुरती .....अल्याड पल्याड दिसत नाही

    - कुसुमाग्रज



    14. नदी माय

    नदी बाई माय माझी , डोंगरात घर
    लेकरांच्या मायेपोटी येते - भूमीवर
    नदी बाई आई माझी , निळे निळे पाणी
    मंद लहरीत गते ममतेची गाणी
    नदी माय जल साऱ्या तान्हेलयांना देई
    कोणी असो कसा असो भेदभाव नाही
    शेतमळे मायेमुळे येती बहरास
    थाळीमध्ये माझ्या बहिजी भाकरीचा घास
    श्रावणात आषाढात येतो टिळा पूर
    पुढच्यांच्या भल्यासाठी जाई दूर दूर
    माय संगे थांबू नका पुढे पुढे चला
    थांबत्याला पराजय जय चालत्याला

    - कुसुमाग्रज



    15. वाट वाकडी धरू नका

    पन्नाशीची उमर गाठली 
    अभिवादन मज करू नका !!!
    मीच विनविते हात जोडुनी 
    वाट वाकडी धरू नका !!!!

    सूर्यकुलाचा दिव्य वारसा 
    प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे !!!
    काळोखाचे करून पूजन 
    घुबडांचे व्रत धरू नका !!!!

    अज्ञानाच्या गळ्यात माळा, 
    अभिमानाच्या घालू नका !!!
    अंध प्रथांच्या कुजत कोठरी ,
     दिवा भितासम दडु नका !!!!

    जुनाट पाने गळून पालवी 
    नवी फुटे हे ध्यानी धरा !!!
    एकविसावे शतक समोरी 
    सोळाव्यास्तव रडू नका !!!!

    वेतन खाऊन काम टाळणे 
    हा देशाचा द्रोह असे !!!
    करतील दुसरे बघतील तिसरे 
    असे सांगुनी सुटू नका !!!!

    जनसेवेस्तव असे कचेरी ती 
    डाकूंची नसे गुहा !!!
    मेजाखालून मेजावरतूनी द्रव्य 
    कुणाचे लुटू नका !!!!

    बोथट पुतळे पथा पथांवर
     हि थोरांची विटंबना !!!
    कणभर त्यांचा मार्ग अनुसरा
     वांझ गोडवे गाऊ नका !!!!

    सत्ता तारक सुधा असे 
    पण सुराही मादक सहज बने !!!
    करिन मंदिरी मी मंदिरालय 
    अशी प्रतिज्ञा करू नका !!!!

    प्रकाश पेरा आपुल्या भवती
     दिवा दिव्याने पेटतसे !!!
    इथे भ्रष्टता तिथे नष्टता 
    शंखच पोकळ फुंकू नका !!!!

    पाप कृपनता पुण्य सदयता 
    संत वय हे सदा स्मरा !!!
    भलेपणाचे कार्य उगवता 
    कुठे पायांवर भुंकू नका !!!!

    गोरगरिबा छळू नका !!!
    पिंड फुकाचे गिळू नका !!!
    गुणिजनांवर जळू नका !!!

    उणे कुणाचे दिसता किंचित
     देत दवंडी फिरू नका !!!
    मीच विनविते हात जोडुनी 
    वाट वाकडी धरू नका !!!!

    परभाषेतही व्हा पारंगत 
    ज्ञानसाधना करा , तरी !!!
    माय मराठी मरते इकडे 
    परकीचे पद चेपू नका !!!!

    भाषा मरता देशही मरतो 
    संस्कृतीचाही दिवा विझे !!!
    गुलाम भाषिक होऊनि 
    आपुल्या प्रगतीचे शीर कापू नका !!!!

    कलम करी ये तरी सालभर 
    सण शिमग्याचा ताणू नका !!!
    सरस्वतीच्या देवळातले स्तंभ 
    घनाने तोडू नका !!!!

    पुत्र परशुसम विकती ते नर , 
    नर न नराधम गणा तया !!!
    पर वित्ताचे असे लुटारू 
    नाते त्यांशी जोडू नका !!!!

    स्वच्छ साधना करा धनाची 
    बैरागीपण नसे बरे !!!
    सदन आपुले करा सुशोभित
     दुसऱ्याचे पण जाळू नका !!!!

    तरुणाईचे बळ देशाचे 
    जपा वाढवा तरुपरी !!!
    करमणुकीच्या गटारगंगा 
    त्यात तयाला क्षळू नका !!!!

    सुजाण असा पण कूजन 
    माजत हत्यार हातामध्ये धरा !!!
    सौजन्याचा बुरख्याखाली शेपूट 
    घालुनी पळू नका !!!!

    करा कायदे परंतु हटवा 
    जहर जातीचे मनातुनी !!!
    एकपणाच्या मारून बाता
     एन घडीला चळू नका !!!!

    सामान मानव माना स्त्रीला
     तिचो अस्मिता खुडू नका !!!
    दासी म्हणुनी पिटू नका 
    वा देवी म्हणुनी पुजू नका !!!!

    नास्तिक आस्तिक असा कुणीही 
    माणुसकीतच देव पहा !!!
    उंच नीच हा भेद घृणास्पद 
    उकिरड्यात त्या कुजू नका !!!!

    माणूस म्हणजे पशु नसे !!!!
    हे ज्याच्या हृदयात ठसे !!!
    नर नारायण तोच असे !!!

    लाख लाख जण माझ्यासाठी 
    जळले मेले विसरू नका !!!
    मीच विनविते हात जोडुनी 
    वाट वाकडी धरू नका !!!!

    - कुसुमाग्रज



    हे पण नक्की वाचा 👇👇👇


    तर मित्रानो या पोस्ट मध्ये आपण मराठी कविता कुसुमाग्रज बघितल्या. या कविता तुम्हाला कशा वाटल्या ते माळा कंमेंट मध्ये नक्की सांगा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या पण कळवा. आणि अन्य मराठी कविता आणि गाण्यांच्या लिरिक्स साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.

    हि पोस्ट वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!!!




    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Blogger द्वारे प्रायोजित.