संत मुक्ताबाईचे अभंग | Muktabaicha Abhang Sangrah
नमस्कार, या पोस्ट मध्ये आपण संत मुक्ताबाईचे अभंग बघणार आहोत. महाराष्ट्राला संतांची नगरी म्हटलं तरी काही चुकीचे ठरणार नाही. खूप मोठे मोठे संत इथे होऊन गेले. अशाच एक स्त्री संत होत्या मुक्ताबाई त्यांना मुक्ताई असेही म्हणत. संत मुक्ताबाई या ज्ञानेश्वरांच्या बहीण आणि कवियत्री होत्या. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता तिन्ही भावंडे ज्ञान आणि भक्ती यांचे जिवंत उदाहरण होते. मुक्ताबाईचे अभंग प्रसिद्ध आहेत त्यामधीलच काही आपण इथे बघणार आहोत -
🌺🌺 संत मुक्ताबाईचे अभंग 🌺🌺
1. मुक्त जीव सदा होती
मुक्त जीव सदा होती पै नामपाठे | तेचि रूप इटे देखील आम्हे || १ ||
पुंडलिक विठ्ठल आणिला पंढरी | आणुनी लवकरी तरी जन || २ ||
ऐसे पुण्य केले एका पुंडलिकेची | निरसिली जनाची भ्रमभुली || ३ ||
मुक्ताई चिंतने मुक्त पै जाली | चरणी समरसाली हरिपाठें || ४ ||
2. शून्यापरते पाही तव शून्य तेही नाही
शून्यापरते पाही तव शून्य तेही नाही | पाहहले पाहोनि ठायी ठेवियले || १ ||
कैसागे माये हा ताराकू दिवटा | पंढरी वैकुंठ प्रगटला || २ ||
ना काळे गती याची आदी मध्य अंती | जेथे श्रुती नेति प्रगटल्या || ३ ||
मुक्ताई सप्रेम विठ्ठल संभ्रम | शून्यही शून्य समशेजबजे || ४ ||
3. प्रकृती निर्गुण प्रकृती सगुण
प्रकृती निर्गुण प्रकृती सगुण | दीपें दीप पूर्ण एका तत्वे || १ ||
देखिलेंगे माये पंढरिपाटनी | पुंडलिक अंगानी विठ्ठलराज || २ ||
विज्ञानेसी तेज सज्ञानेसी निज | निर्गुनेसी चोज केले सये || ३ ||
मुक्ताई तारक सम्यक विठ्ठल | निवृत्तीने चोखाळ दाखविले || ४ ||
4. अलिप्त संसारी हरिनाम पाठें
अलिप्त संसारी हरिनाम पाठें | जाइजे वैकुंठे मुक्तलग || १ ||
हरिविण मुक्त न करी हो सर्वदा | संसार आपदा भाव तोकडी || २ ||
आशेच्या निराशी अचेतना मारी | चेतविला हरी आप आपरुपे || ३ ||
मुक्ताई जीवन्मुक्तची सर्वदा | अभिन्नव भेंडी भेदीयले || ४ ||
5. आधी तू मुक्तची होतासिरे प्राणिया
आधी तू मुक्तची होतासिरे प्राणिया | परी वासने पापीनिया नाड़ीलासी |
आधीचे आठवी मग घेई परी | हरिनाम जिव्हारी मंत्रसार || १ ||
आदी मध्य हरी ऊर्ध्व पै वैकुंठ | जाईल वासना हरी होईल प्रगट || धृ ||
एकतत्व धरी हरिनाम गोड | येर ते काबाड विषय ओढी |
नाम पै सांडी वासना पापिणी | एक नारायणी चाड धरी || २ ||
मुक्ताई मुक्तलग सांडिली वासना | मुक्तामुक्ती राणा हरिपाठें |
नामाचेनि घोटे जळती पापराशी | न येति गर्भवासी अरे जाना || ३ ||
6. नाम मंत्रे हरी निज दासा पावे
नाम मंत्रे हरी निज दासा पावे | ऐकोनि घ्यावे झडकरी || १ ||
सुदर्शन करी पावे लवकरी | पांडवा सहाकारी श्रीकृष्ण रया || २ ||
निजानंद दावी उघडे पै वैकुंठ | नामेंचि प्रगट आम्हांलागीं || ३ ||
मुक्ताई जीवन्मुक्त हा संसार | हरी पारावार केला आम्ही || ४ ||
7. मुक्त पै अखंड त्यासी पै फावले
मुक्त पै अखंड त्यासी पै फावले | मुक्तची घडले हरीच्या पाठे || १ ||
रामकृष्णे मुक्त जाले पै अनंत | तारले पतित युगायुगी || २ ||
कृष्णनामें जीव झाले सदा शिव | वैकुंठ राणीव मुक्त सदा || ३ ||
मुक्ताई संजीवन मुक्तमुक्ती कोडे | जाले पै निवाडे हरिरूप || ४ ||
8. मुक्तामुक्त दोन्ही आईक तो कर्णी
मुक्तामुक्त दोन्ही आईक तो कर्णी | हरिनाम वर्णी सदा काळ || १ ||
नाही काळ तेथे आम्हा वेळ कैची | हरिनाम छंदाची गोडी थोरी || २ ||
नाना विघ्नबाधा नाइको आम्ही कंदा | निरंतर धंदा राम कृष्ण || ३ ||
मुक्तपणे मुक्त मुक्ताई रत | हरिनाम सेवीत सर्वकाळ || ४ ||
9. आदी अंतू हरी सर्व घटी पूर्ण
आदी अंतू हरी सर्व घटी पूर्ण | जाणोनि संतजन प्रेमभरित || १ ||
रामनाम चित्ते प्रेम वोसंडत | नित्यानित्य तृप्त हरिभक्ती || २ ||
शांती क्षमा दया सावध पै चित्ती | आनंदे डुलती सनकादिक || ३ ||
मुक्ताई म्हणे नाम श्रीहरीचे जोडी | नित्यता आवडी चरणसेवे || ४ ||
10. पूजा पूज्य वित्ते पूजक पै चित्ते
पूजा पूज्य वित्ते पूजक पै चित्ते | घाली दंडवते भाव शीळ || १ ||
चंपक सुमने पूजी कातळीने | धूप दीप मने मानसिक || २ ||
भावतीत भावो वोगरी अरावो | पाहुणा पंढरीरावो हरी माझा || ३ ||
मुक्ताई संपन्न विस्तारुनि अन्न | सेवी नारायण हरी माझा || ४ ||
11. व्यक्त अव्यक्तींचे रूपस मोहाचे
व्यक्त अव्यक्तींचे रूपस मोहाचे | एकतत्त्व दीपाचे हृदयी नांदे || १ ||
चांगया फावले फावोनि घेतले | निवृत्तीने आमुच्या करी || २ ||
आदी मध्य यासी सर्वत्रनिवासी | एक रूपे निशी दवडीतू || ३ ||
मुक्ताई पूर्णता एकरूपे चिंता | आदी अंतू कथा सांडियेली || ४ ||
12. मने मन चोरी मनोमय धरी
मने मन चोरी मनोमय धरी | कुंडली आधारी सहस्त्रकारी धरी || १ ||
मन हे वोगरु आदी हरिहरू | करी पाहुणेरू आदिरूपा || २ ||
सविया विसरू घेशील पडीभरु | गुरुकृपा वीरू विरे सदा || ३ ||
मुक्त मुक्तचित्ते गुरुमार्ग विते | पावन त्वरिते भवि भाव || ४ ||
13. उर्णाचीया गेला बांधली दोरी
उर्णाचीया गेला बांधली दोरी | पाहो जाय घरी ताव तंतू नाही || १ ||
तैसे झाले बाई जव एकतत्व नाही | दुजी जव साई तंव हे अंध || २ ||
ऐसे मी हो अंध जात होते वाया | प्रकृती सावया पावली तेथे || ३ ||
मुक्ताई सावध करी निवृत्तिराज | हरिप्रेमी उमज एकतत्वे || ४ ||
14. नादाबिंदा भेटी जे वेळी पै जाली
नादाबिंदा भेटी जे वेळी पै जाली | ऐशी एके बोली बोलती जीव || १ ||
उगेचि मोहन धरुनी प्रपंची | त्यासी पै यमाची नागरी आहे || २ ||
जीव जंतू जड त्यासी उपदेशी | त्यासी गर्भवासी घाली देवो || ३ ||
मुक्ताई श्रीहरी उपदेशी निवृत्ती | संसार पुढती नाही आम्हा || ३ ||
15. देउळिचा देवो घरभर भावो
देउळिचा देवो घरभर भावो | काळसेवीं वावो जातु असे || १ ||
जाताती वाउगे नटनाट्यसोंगें | चित्त अनुरागें भजतिना || २ ||
असोनि न दिसे उगवायची पिसे | घेती वाया वसे सज्जनेवीण || ३ ||
रावो रंक कोह न म्हणेची सोहं | साकारले अहम न काळे तया || ४ ||
भ्रांतीचेनि भुली वायाची घरकुली | माया आड ठेली अरे रया || ५ ||
मुक्ताई परेसी दुभते चहूसी | सत्रावी सर्व रसी एका देवे || ६ ||
16. मुक्तपणे सांग देव होय देवांग
मुक्तपणे सांग देव होय देवांग | मीपणे उद्वेग नेघे रया || १ ||
वाउगे मीपण आथिले प्रवीण | एक नारायण तत्व खरे || २ ||
मुक्त उक्ती दोन्ही करी कारे शिराणी | द्वैताची काहाणी नाही तुज || ३ ||
मुक्ताई अद्वैत द्वैती द्वैतातीत | अवघाचि अनंत दिसे देही || ४ ||
17. करणे जव काही करू जाये शेवट
करणे जव काही करू जाये शेवट | तंव पडे आडवाटे द्वैतभावे || १ ||
राहिले करणे नचले पै कर्म | हरिविण देहधर्म चुकताहे || २ ||
मोक्षलागी उपाय करितोसी नाना | तंव साधनी परता पडो पाहे || ३ ||
मुक्ताई करी हरी श्रावण पाठ | तेणे मोक्ष नीट सकळ साधे || ४ ||
18. मुक्तामुक्त कोडे पाहिले निवाडे
मुक्तामुक्त कोडे पाहिले निवाडे | ब्रम्हांडा एवढे महत्तत्त्व || १ ||
निज तत्व आप अवघाचि पारपाप | एका रूपे दीपक लावियेला || २ ||
आदी माधयनीज निर्गुण सहज | समाधी निजतेज आम्हा रामू || ३ ||
मुक्ताईचे धन आत्माराम गनू | देखील निधान हृदय घटी || ४ ||
19. चित्तासी व्यापक व्यापूनि दुरी
चित्तासी व्यापक व्यापूनि दुरी | तेचि माजी घरी नांदे सदा || १ ||
दिसे मध्य सुख मुक्तलग हरी | शांती वसे घरी सदोदित || २ ||
नाही या शेवट अवघाचि निघोट | गुरुतत्त्वे वाट चैतन्याची || ३ ||
मुक्ताई संपन्न मुक्त पै सेजुले | सर्वत्र उभविले मुक्ती चोख || ४ ||
20. प्रारब्ध संचित आचरण गोमटे
प्रारब्ध संचित आचरण गोमटे | निवृत्ती तटाके निघालो आम्ही || १ ||
मुळीचा पदार्थ मुळीच पै गेला | परतोनि अबोला संसारासी || २ ||
सत्यमिथाभाव सत्वर फळला | हृदयी सामावला हरिराज || ३ ||
अव्यक्त आकार साकार हे स्फूर्ती | जीवेशिवे प्राप्ती ऐसे केले || ४ ||
सकाम निष्काम वृत्तीचा निजफेर | वैकुंठाकार दाखविले || ५ ||
मित्तलांग मुक्त मुक्ताईचे तट | अवघेचि वैकुंठ निघोट रया || ६ ||
21. शांती क्षमा वसे देही देव पैसे
शांती क्षमा वसे देही देव पैसे | चित्त समरसे मुक्त मेळु || १ ||
निर्गुने उपरामु देव पुरुषोत्तमू | प्रकृती संगमूं चेतनेचा || २ ||
सज्ञानी दिवटा अज्ञानी तो पैठा | निवृत्तीच्या तटा नेतु भक्ता || ३ ||
मुक्ताई दिवस अवघा हृषीकेश | केशवेविण वास शून्य पैसे || ४ ||
22. देऊळाच्या कळशी नांदे एक ऋषी
देऊळाच्या कळशी नांदे एक ऋषी | तया घातली पुशी योगेश्वरी || १ ||
दिवसा चांदीणे रात्री पडे उष्ण | कैसेनि कठीण तत्व जालें || २ ||
ऋषी म्हणे चापेकळीकाळ पै कापे | प्रकाश पिसे मनाच्या धारसे एक होय || ३ ||
एकट ऐकले वायाचि पै गुंफले | मुक्त पै विठ्ठले सहज असे || ४ ||
वैकुंठ अवीट असोनि प्रकट | वायाचि आडवाट मुक्ताई म्हणे || ५ ||
23. मुंगी उडाली आकाशी
मुंगी उडाली आकाशी | तिने गिळले सूर्याशी || १ ||
थोर नवलाव जाहला | वांझे पुत्र प्रसवला || २ ||
विंचू पाताळाशी जाय | शेष माथा वंदी पाय || ३ ||
माशी व्याली घार झाली | देखोन मुक्ताई हांसली || ४ ||
हे पण वाचा👇👇👇
- गुरुपरंपरेचे अभंग
- संत तुकाराम महाराजांचे अभंग
- संत जनाबाईचे अभंग
- एकनाथ महाराजांचा अभंग संग्रह
- Pasaydan Lyrics in Marathi
तर आज आपण संत मुक्ताबाईचे अभंग बघितले. तुम्हाला हि पोस्ट कशी वाटली ते मला नक्की सांगा. आणि अन्य मराठी पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.
हि पोस्ट वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!!!
Post a Comment