Header Ads

वाचा गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी) कविता मराठी मध्ये | Govindagraj Kavita In Marathi


नमस्कार मित्रांनो, आपल्या अनेक महान कवी, लेखक होऊन गेले. आज आपण गोविंदाग्रज यांच्या कविता मराठी मधून बघणार आहोत . राम गणेश गडकरी यांनी ' गोविंदाग्रज ' या नावाने कविता लेखन केले. त्यांचा जन्म २६ मे १८८५ ला गुजरातमधील नवसारी इथे झाला होता. मराठी कवीसोबतच ते नाटककार, आणि विनोदी लेखक पण होते. ' बाळकराम ' या टोपण नावाने त्यांनी विनोदी लेख लिहिले. 
राम गणेश गडकरी यांना महाराष्ट्राचा शेक्सपियर म्हणून ओळखले जाते. त्यांचा वाग्वैजंती हा एकमेव असा काव्यसंग्रह आहे. २३ जानेवारी १९१९ला वयाच्या ३४ व्या वर्षीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. आपल्या छोट्याशा कारकिर्दीत गडकरींनी खूप मराठी साहित्यामध्ये खूप मोठं योगदान दिल आहे. विनोदी लेखांसोबत त्यांनी एकाच प्याला , प्रेमसंन्यास , पुण्यप्रभाव आणि भावबंधन हि चार नाटके लिहिली. तर राजसंन्यास आणि वेड्यांचा बाजार हि त्यांची दोन अपुरी राहिलेली नंतर होती.


    गोविंदाग्रज यांच्या कविता मराठी
    गोविंदाग्रज यांच्या कविता मराठी

    1. हृदयास 

    जिवलग हृदया !! मूढ वृत्ती हि धारण केली का असली ?
    लाथ मार त्या चंचल जगता - प्रेमाची सोंगे कसली !!

    चंचल लहरी , रंग बेगडी सुंदरतेचा मोहाने ,
    का वाटेवर पदासी हृदया विकून कवडीमोलाने ??

    तुझ्या जिवाच्या बाळासाठी हपापलेले हे रसिक पहा ,
    स्वागत करी जा त्यांचे - त्यांना हर्ष किती होईल आहा !!

    नटव्या सोंगामागे लागे जे , त्या सौन्दर्यासाठी
    नवलाखाचे मोल देसी का ?? कशास या आटापाटी ??

    जिथे गुंणाची चाड न काही - काम अस्सल जे जातींचे ;
    सौदर्याची ते कसले ?? - केवळ एक बाहुले मातीचे !!

    विद्यावैभव कुठे तुझे !! - तो ज्ञानाचागौरवकोठे !!
    आणि कुठे रंगीत खेळणे !! नवल खरोखरी हे मोठे !!

    उदारता ताव विशाल पाहुनी देवांनाही मोह सुटे ;
    आणिक असले खोटेनाटे नकली नाणे सांग कुठे !!

    गर्वाचे घर खाली पडूनी खुशाल मिळू दे मातीत ;
    रसिकांच्या मृदू हृदय मंदिरी रहा, नित्याच्या मिरवीत !!

    चिताडसी का चित्र जीवाचे पापण्यावरच्या रेघांनीं ??
    ' गोविंदाग्रज ' सांगे तुजला रहा त्याहूनि स्वस्थानी !!

    - गोविंदाग्रज

    — —⁘—⁘—⁘—⁘—⁘— —

    2. विरामचिन्हे

    जेव्हा जीवनलेखनास जागती प्रारंभ मी मांडीला ,
    जो जो दृष्टीत ये पदार्थ सहजी वाटे हवासा मला !!
    बाल्याची पहिली अशी बदलती दृष्टी सदा बागडे ,
    तेव्हा स्वालविराम मात्र दिसती स्वच्छंद चोहीकडे !!

    आहे काय जगात ? काय तिकडे ? हे कोण ? कोठे असे ?
    सांगा ईश्वर कोण ?त्यापलीकडे ते काय ? केव्हा ? कसे ?
    जे ते पाहून यापरी भकतसे, दृक संशय टाकीत ,
    सारा जीवनलेख मी करीतसे तै ' प्रश्नचिन्हां 'कित.
    अर्धांगी पुढती करी वश मना शृंगारदेवी नटे ,
    अर्धे जीवन सार्थ होईल इथे साक्षी मनाची पटे ,
    प्रेमाने मग एकजीव बनता भूमीवरी स्वर्ग ये !!
    केला अर्धविराम तेथ ; गमले येथून हालू नये !!

    झाली व्यापक दृष्टी ; चित्त फिरले साश्चर्य विश्वान्तरी ,
    दिक्कालादि अनंतरूप बघता मी होत वेड्यापरी !!
    सूक्ष्म स्थूलहि सारखी भ्रमविती ; लागे मुली अंत न ,
    त्याकाळी मग जाहले सहजचि ' उद्गार ' वाची मन !!

    आशा , प्रेम , नवीन वैभव , तशी कीर्ती प्रभा , सदृश -
    हि एकेक समर्थ आज नसती कराया वंश !!
    सर्वांचा परमोच्च संगम चिरं जेथे असे जाहला ,
    देवा !! ' पूर्णविराम ' त्या ताव पदी दे शीघ्र आता मला !!

    - गोविंदाग्रज

    — —⁘—⁘—⁘—⁘—⁘— —

    3. चिंतातुर जंतू

    निजले जग , का आता इतक्या तारा खिळल्या गगनाला |
    काय म्हणावे त्या देवाला - " वर जाउनी म्हण जा त्याला " || १ ||

    तेज रवीचे फुकट भांडते उजाड माळावर उघड्या |
    उधळणूक ती बघवत नाही , " डोळे फोडुनी घेत गाड्या " || २ ||

    " हिरवी पाने उगाच केली झाडांवर इतकी का हि |
    मातीत त्यांचे काय होतसे ? " " मातीस मिळुनी जा पाही !! " || ३ ||

    " पुराबरोबर फुकटावारी पाणी हे वाहून जात |
    काय करावे जीव तळमळे " "उडी ताक त्या पुरात " || ४ ||

    हि जीवांची इतकी गर्दी जगात आहे का रास्त |
    भरती मूर्खांचीच होत ना ? "एक तूच होती जास्त " || ५ ||

    देवा , तो विश्वसंसार राहूं द्या राहिला तरी |
    या चिंतातुर जंतूंना एकदा मुक्ती द्या परी !! || ६ ||

    - गोविंदाग्रज

    — —⁘—⁘—⁘—⁘—⁘— —

    4. फुल ना फुलाची पाकळी

    शहाजहानाआधी मेली ख्यालीखुशाली ती त्याची |
    खडा तेवढा ताजमहालचभूशा जी या जगताची ||

    चुकल्या तरुणा !! वेश्याक्रीडान आज तुझे स्मरणांत नसे |
    कालिदास कृत शाकुंतल परी सरस्वतीच्या कंठी असे ||

    खुनी खड्यांनी भरले रंजन वाल्ह्याचे फुटले सारे |
    उरले रामायण ते नटवी श्रीरामा निज आधारे ||

    गोकुळातल्या चोराचा नच गोपींना आता त्रास |
    श्रीकृष्णाची गीता उरली द्याया मरत्या उल्हास ||

    गडगडणे काळोख, वीज हि गेली वळवाच्या मागे |
    अन्नब्रम्हाची साक्ष तयाची द्याया हे राही जागे ||

    काटे सुकले फांदीवरती - धन त्यांची झाली राना |
    गुलाब देवा तुम्ही वाहिला , गोड करुनि तो का घ्याना ||

    दूषण वगळूनि भूषण मात्रे प्रभू पूजन करी काळ असे |
    तुम्ही आम्ही कष्टी होणे का कुठला मग न्याय असे ? ||

    (अनुष्टुम )
    ' गोविंदाग्रज ' अपी हि स्वभावे चरणांवरी |
    रसिका , घ्या फुल नाही फुलाची पाकळी तरी ||

    - गोविंदाग्रज

    — —⁘—⁘—⁘—⁘—⁘— —


    5. हुकूमे हुकूम

    करमत नव्हते म्हणुनी एकदा असाच गेलो रानी
    वसंत का - परी ऋतू दुसरा कधी कुणी पाहिला कवणी !!

    समोर होता झाडावरती एक चिमुकला पक्षी
    बोलुनी चालुनि कवी पडलो मी सहजचि त्याला लक्षी.

    वसंत ऋतू तो ; रम्य वनही ते , पक्षी आणि कविराय
    तुम्हीच सांगा , रसिका , आता हवे आणखी काय ??

    सत्वर कवीच्या रसिकपणाने सांगितले त्या गाया
    नवल वाटते सांगाया परी - कि ते गेले वाया

    वृक्षावरच्या माझ्या मित्रा , काही गाणे गाव

    गंमतीखातर आणि जरासा इकडे तिकडे नाच
    बंधू तुझा मी - माझ्यासाठी गाड्या तू लाग तू गाया

    हे बघ देतो कां धान्याचे काही तुजला खाया
    स्तुती गाण्याची तुझ्या बहुपरी करिन चारचौघांत

    चित्रही आणीन तुझे कशाच्या तरी खास अंकात
    गाण्याची या तुझ्या शिफारस करू अशी भरपूर

    शाळाखातेही वेड्या ते करील ते मंजूर
    अशा प्रकारे फार विनविले जीव तोडुनी साच

    भिकारडे ते काही केल्या ऐकेनाच
    गा म्हटल्या जो गात नसे त्या सृष्टीचा कवी म्हणती

    मस्तक फिरले हातपायही रागाने थरथरती
    एक मारितो दगड असा कि पडेल असा कि पडेल वासून चोच

    म्हणुनी वाकलो तसाच खाली आवेशाने तोच -
    लगबग दिसले स्नेही माझे संपादक त्या - ह्याचे
    म्हणू लागले भले !तुम्हाला कुठे कुठे पाह्यचे !!

    या अंकाचा चालू तक्ता (फर्मा ) होत नाही भरपूर
    कामाचा खोळंबा झाला द्या काही ' मजकूर '

    वसंत - अंकी वसंतवारांनापर कविता चालेल
    परंतु झटदिशी करा , नातरी काम उगाचि लांबेल

    सरासरी द्या खरडुनी ओळी अठरापासूनि वीस
    ऐकिले न हे तो कवणाची झाली स्फूर्ती कवीस

    झाडावरचा पिसाट कवी तो तसाच टाकुनी रानी
    चला रसिकहो लांबी रुंदी नीट ठेउनी ध्यानी

    वसंतकाळी त्या वर्णाया वनातून माघारी
    गोविंदाग्रज कवीश्वराची घरी परतली स्वारी

    - गोविंदाग्रज

    — —⁘—⁘—⁘—⁘—⁘— —


    हे पण वाचा 👇👇👇


    तर मित्रांनो आज आपण गोविंदाग्रज यांच्या कविता मराठी मधून बघितल्या. तर तुम्हाला कोणती कविता आवडली ते मला सांगा आणि अन्य मराठी कविता आणि गाण्यांच्या लिरिक्स साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट द्यायला विसरू नका .

    हि पोस्ट वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Blogger द्वारे प्रायोजित.