Spruha Joshi Kavita | इथे वाचा स्पृहा जोशींच्या कविता
नमस्कार मित्रानो , कसे आहेत तुम्ही !!!!! आज आपण Spruha Joshi Kavita बघणार आहोत. तुम्हाला माहित असेलच की स्पृहा जोशी या एक अभिनेत्री आणि टीव्ही अँकर आहेत.
स्पृहा जोशी यांचा लोपामुद्रा हे कवितेवरच पुस्तक हि २०१६ मध्ये पब्लिश झालं आहे. तुम्हाला ते ऍमेझॉन किंवा फ्लिपकार्ट वर मिळून जाईल . या पोस्ट मध्ये आपण स्पृहा जोशी यांच्या १० कविता बघणार आहोत. चला तर मग बघूया कविता -
1. आनंदाला माझ्या आहे
आनंदाला माझ्या आहे मर्यादेचं पांघरून
आणि दुःख ठेवली आहेत अश्रूंखाली झाकून
मन काही बाही जेव्हा सांगू काही पाहत
गप काही बोलशील तर त्याला टाकते सांगून
अनोळखिश्या रानवाटा पाय राहतात शोधत
पिसाट वारा गुपित वेड झाड राहतात सांगत
वेळ काय काळ काय भान सरून जात
किती रोख वेड मन एकटाच गात राहतं
2. त्या वळणावरती मजला
त्या वळणावरती मजला ती सहज भेटली होती
स्वप्नांच्या दुनियेमध्ये अलवार रंगली होती
पत्त्यांचे बंगले मोठे ती उगाच उठवीत होती
खेळात कल्पनेमधल्या ती स्वतःस रमवीत होती
आयुष्य तिचेही होते क्षणभंगुर त्या पत्त्यांसम
त्या खोट्या दुनियेमध्ये शाश्वतता शोधत होती
मी पुसले होते तिजला तव रहस्य आनंदाचे
तर नभी उडाला पक्षी पाहून हासली होती
त्या वळणावरती मजला सहज भेटली होती
स्वप्नांच्या दुनियेमध्ये अलवार रंगली होती
3. अचानक कसं सगळं
अचानक कसं सगळं शांत शांत होत
श्वास रोखून धरत सूर्यबिंब उडत उडत जात
किनाऱ्यावर येत राहतात लयदार लाटा
उन्हामधून शोधत राहतात ढग वेगळ्या वाटा
नारिंगी सोनेरी होत केशराचं पाणी
भरतीच्या आवेगाला वेदनेची गाणी
वाळू सरकत राहते आणि पाऊले भिजत राहतात
समुद्राचे कण कण शोषून घेऊ पाहतात
आपल्या आत वाजत राहते हळुवार गाज
अंधारावर चढत जातो चांद्रवर्खी साज
नक्की कोण असतो आपण अशा वेळी खरंच
आता इथे एकटे आहोत तेही एक बरंच
4. अलगद पावलांनी
अलगद पावलांनी नको तोलूस आभाळ
नाव कालच्या चुकांची आज रानमाळ
तुझे माझे हे गुपित नको मोगऱ्याला सांगू
गंधवेड्या शपथात नको वेड्या पुन्हा रंगू
नको घेऊ पुन्हा शोध डोहातल्या चांदण्याचा
नको तोच खेळ खेळू तुटलेल्या सांधण्याचा
शोधू नको पुन्हा मला जुन्या कवितेच्या मागे
तुझ्यातल्या खऱ्या ' तुला ' नको करू पुन्हा जागे
5. तू जर मला विचारशील
तू जर मला विशारशील कि तुझी स्वप्न काय आहेत ??
तर कदाचित मला काहीच सांगता येणार नाही ......
मेंदू कोरा होऊन जाईल ,,,,,
कारण बहुतेकवेळी मी जागेपणीही मी स्वप्नच बघत असते
तू जर मला विशारशील कि या क्षणी तुला काय हवय ???
तर कदाचित मला काहीच सांगता येणार नाही ......
किंवा कदाचित मी सांगेन कि
मला औषधांचा एक मोठा डोस हवाय .
समुद्रकाठचा खारा वारा, सूर्य, वाळू आणि
ताजी मोकळी हवा हवी आहे
एखादी पावसाळी चक्कर सुद्धा चालेल ...
तू जर मला विशारशील कि आता कुठे चाललीयेस ??
तर कदाचित मला काहीच सांगता येणार नाही ......
कारण ते मला माहितीच नाहीये
मला रस्ते वेडसर वाटतात आणि उडता आल असत
तर मला खूपच आवडलं असत
तू जर मला विशारशील कि तू नक्की कोण आहेस ??
तर कदाचित मला काहीच सांगता येणार नाही ......
किंवा कदाचित मी खदा खदा हसायलाच लागेल
नाम , सर्वनाम , विशेषण , क्रियापद
आपण सगळे यांच्या पलीकडे असतो ना रे !!!!
तू जर मला विशारशील कशाचं वाईट वाटत ???
तर कदाचित मला काहीच सांगता येणार नाही ......
किंवा कदाचित मग मी रडायलाच लागेल खूप
कशाला जायचं त्या आठवणींमध्ये खोल आत
माफ करून टाकायचं विसरून जायचं
दूर जायचं निघून इतकंच असत आपल्या हातात !!!!!
तू जर मला विशारशील कि तुझ सगळ्यात जास्त प्रेम कोणावर आहे
तर कदाचित मला काहीच सांगता येणार नाही ......
किंवा मी काहीच न सांगता माझ्या डोळ्यातलं हसू तुला दिसेल
मी काही न सांगताच मला काय म्हणायचंय ते सगळंच तुला कळेल
फार कमी वेळा अरे असं श्वासात कोणी रुजून येत
न सांगता आपोआप गाणं ओठी फुलून येत
त्यामुळे आता ना कुठलेच प्रश्न नको विचारू
माझ्याशेजारी नुसता बस .....
थोडावेळाचं आत्त्ता जरा माझ्यासाठी नुसता अस .....
एकूण बघ माझ्यासोबत रात्रीचे हे सूर कातर
आभाळाने धरली बघ तितक्यात आपल्यावरती झालर
6. आभाळ
गच्च काळ्या ढगांनी भरलेलं काळ कुट्ट आभाळ
भीती वाटते त्याची कधी कधी
सारं आसमंतच व्यापून टाकलेलं असत त्याने
पाळणार तरी कुठे आपण त्याच्यापासून
त्याने डोळे उघडले तर लक्ष लक्ष एकदाच
फोडून काढलं तर पावसाच्या चाबकाने ??
विजेचा तिसरा डोळा भयकारी
रागामध्ये आगीत लपेटून टाकेल आपल्याला
जीव मुठीत धरून आपलं क्षुद्र जगणं जगत राहणं ........
एवढंच आपल्या हातात
त्याच्या डोळ्याला डोळे भिडवायची काय ,
मान वर करून पाहण्याची सुद्धा हिम्मत नाही ...
सृष्टीच्या आतलं काहूर जाणवत असत खरतर
तिची इच्छा असते आपला संवाद घडावा आभाळाशी
पण तीही मुक्याने हे कडू सत्य पचवत राहते ,
आतले कढ आतच दाबत राहते
हळू हळू अंतर वाढत वाढतच जातं
क्रांती करायला लागत मन वाढत्या वयानुसार
आभाळच अस्तित्वच झुगारून द्यायला लागतं
धाडस करत त्याच्या नजरेला नजर देण्याचं
ताठ मानेने त्याच्यासमोर उभं राहण्याचं
आता हळू हळू आभाळही म्हातारं व्हायला लागतं
अशीच कधी नजर जेव्हा आभाळावर जाते
काळेभोर क्रुद्ध ढग निघून गेलेले असतात .....
आभाळाच्या वृद्ध नजरेत वेगळेच भाव दिसतात
शांत निरभ्र आभाळ जेव्हा कौतुकाने पाहतं
काहीतरी आपल्याहि मनात उगाच दाटून येत
हात पसरून वय विसरून आपण मोठे होतो
थकलेल्या आभाळाला मायेने कवेत घेतो
आभाळाच्या डोळ्यात तेव्हा आनंदाश्रू दाटून येतात
सुरकुतलेल्या सृष्टीचे कातर क्षण जागे होतात
7. बकुळ
दुधाळ झऱ्याच्या आणि हिरव्या पाऊल वाटेच्या मध्ये
तू दिसते थरथरत उभी असलेली
लोक चालत रहातात , धुळीतून
वाट होत जाते आणखी मळलेली
तू तशीच उभी आहेस
थोडी मूळ हलवून इकडे तिकडे बघ तरी
तुझ्या आसपासच्या या मळकट कोरडेपणात
तू किती सुंदर दिसतेस
आकाश निळी झालर , पाऊस त्याची रिमझिम ,
चंद्र मोतिया चांदणं देतो
तू हलत नाही पण जागची ......
थोडंसं मोहरल्यासारखं दाखवतेस फक्त ,,,,
आपण आता इतकं बोलतोय म्हणून पण
पलीकडे हिरवेगार डोंगर आहेत , उसळणार समुद्र आहे
तुला नाही वाटत एकदा त्यांच्याकडे पाहावंसं ??
त्या मळक्या पाऊल वाटेवरून दूर कुठेतरी जावंसं .....
पण .... तू आपली तिथेच नेहमी
दुधाळ झऱ्याच्या आणि हिरव्या पाऊलवाटेच्या मध्ये थरथरत उभी
संध्याकाळच्या वाऱ्याची वाट पाहत
तुझा आणि संध्याकाळच्या वाऱ्याचा जीव आहे ना एकमेकांवर ??
मला कसं कळलं ??
अगं संध्याकाळचे दुखरे होऊन इतके घमघमता दोघेही
आपल्यालाच वाटत कि जात येता मानस पाहत असतात
आपण आता इतकं बोलतोय म्हणून .....
पण अशी दुखरी गुपित फार काळ लपत नसतात
8. चेहरा
आज किती नंबरच हसशील ?? ३१७ , २७५ कि ५०१
हा पण ते ३८ नंबरच नको हा ......
खूप वेळा repeat झालंय
तेच expression खूप वेळा repeat झालं कि
नट खोटाय अस समजतात
हा म्हणजे बरोबरच आहे तुझं .....
नटाचं तेच काम आहे म्हणा
खोट्याचं खरं करणं .......
पण ते predictable झालं ना
तर बाजारातली worth उतरते
असो .... कुठे होतो आपण ... अं .... हा अश्रू ...
ते ना एका डोळ्यातून ३ थेंब आणि
दुसऱ्या डोळ्यातून असे खळकन पडू दे
काच तडकल्यासारखे ,.....
तेवढं एक साधलं कि मग नेहमीच्याच
८८ , ७५ आणि २७ नंबरच्या प्रेम अशा आणि लाज
अशा एकामागून एक cut paste
कर म्हणजे झालं
अरे हो सकाळपासून रात्रीपर्यंत
screen play रंगवायला
एवढं calculation खूप झालं .....
मन काय असाल तर असलं नसाल
तर तसही कोणाला दिसतं
9. असा कोणीतरी
आपण जेवहा प्रेमात पडतो तेव्हा नुसतेच नाही पडत
खूप छोट्या छोट्या गोष्टी घडतात
आपण त्या व्यक्तीचे डोळे , हसणं , त्याचा आवाज
सगळ्या गोष्टींनी वेडे होत राहतो
ती एखादी झलकही अख्या दिवसाचा मूड पालटायला पुरेशी असते
त्यामुळे फार जपून पाऊल टाकायला हवं
अशाच माणसाच्या प्रेमात पडायला हवं
ज्याला आपल्याबद्दल सगळं सगळं जाणून घ्यावंसं वाटतो
त्याला माझा भूतकाळ माहितीये आणि
मी घडवू पाहतेय ते भविष्यही तो वाचू शकतोय
असा कोणीतरी जो फक्त माझ्या शरीराला नाही
माझ्या मनाला स्पर्श करू शकेल
असा कोणीतरी ज्याचा चेहरा मी दिसता क्षणी उजळून निघेल
असा कोणीतरी ज्याच्या नजरेत माझ्याबद्दलचे कौतुक मावणार नाही
आणि मी दिसल्यावर त्याच्या डोळ्यात उमटलेलं हसू विरणार नाही
असा कोणीतरी ज्याला माहित माहिती असेल
मला अशीच कॉफी आवडते स्ट्रॉंग .....
आणि ती पिताना माझ्या ओठावर आलेली फेसाची मिशी
तो सहज पुसून टाकेल बोलता बोलता .......
ज्याचा हात हातात असताना खूप सुरक्षित वाटेल
प्रचंड गर्दीच्या कोलाहलातही
किंवा अनोळखी शहराच्या वाटांवर भटकता येईल
तो सोबत आहे याची खात्री असल्यामुळे अजिबात न घाबरता
माझ्या छोट्या छोट्या तक्रारी , अडचणी त्याच्यासाठी महत्वाच्या
नसल्या तरी तो एकूण घेईल शांतपणे !
ओसरू देईल माझ्या आवेगाचा धबधबा , थोपटत राहील डोक्यावर
मोकळं मोकळं होऊ देईल दाटून आलेलं सारं
आणि तोपर्यंत घट्ट मारलेली मिठी अजिबात सैल होऊ देणार नाही
माझी थर थर थांबेपर्यन्त ..... असा कोणीतरी
जागाच हे ठरलेलं चोवीस तासांचं घड्याळ .....
त्याचे काटे अस्वस्थ नाही करणार त्याला माझ्यासोबत असताना
आणि खुल्या मानाने दिलखुलासपणे करेल माझी चेष्टा खुलवणारी !!
असा कोणीतरी जो कोणीतरी नसेल
तो असेल माझा सगळ्यात जवळचा मित्र , पार्टनर ,
माझी दुसरी बाजू ,माझा आतला आवाज
प्रेमात नुसतेच नाही पडत आपण
फार फार फार जपून पाऊल टाकावं लागत
10. आठवणी सरल्या स्वप्नांच्या
आठवणी सरल्या स्वप्नांच्या
घेऊन आले अवचित कोणी
नजरेमध्ये अनोळखी, पण
तीच जुनी भासली विराणी...
उंबरठ्यावर पाऊल माझे अडखळले
का उगा कळेना
थरथरला प्राजक्त जरासा
खूण अंतरी तरी पटेना...
रुणझणले अनुबंध जरासे सरून उरला
जरा पूरिया नको नको
म्हणता बिलगे
तुझ्या मिठीची साखरमाया... !!
हे पण वाचा 👇👇👇
तर मित्रानो आज आपण Spruha Joshi Kavita बघितल्या. तुम्हाला जी पोस्ट कशी वाटली ते मला सांगा आणि अन्य मराठी कविता आणि लिरिक्स साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .
हि पोस्ट वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!!!!
Post a Comment