Header Ads

इंदिरा संत कविता संग्रह | Indira Sant Yanchya Kavita



इंदिरा संत या मराठी साहित्यातील हे प्रसिद्ध नाव आहे. इंदिरा नारायण संत यांचा जन्म ४ जानेवारी १९१४ ला कर्नाटकातील इंडी या गावात झाला. त्यांचे शिक्षण पुणे आणि कोल्हापूर मधून झाले त्यांनी बी. ए., बी.टी. डी. व बी. एड. या पदव्या मिळवल्यानंतर बेळगावच्या एका कॉलेजमध्ये अध्यापिका म्हणून काम पाहण्यास सुरवात केली आणि सहाध्यायी नारायण संत यांच्याशी १९३५ मध्ये त्या विवाहबद्ध झाल्या. शिक्षक म्हणून काम सुरु केल्यानंतरच त्यांनी लिखाणास सुरवात केली. इंदिरा संत यांचा ' गर्भरेशमी ' ला साहित्य अकादमी पुरस्कार मिळला आहे. चला तर मग बघूया इंदिरा संत कविता संग्रह -


    📜📜इंदिरा संत कविता संग्रह 📜📜

    ︾︾︾︾︾︾︾︾︾︾︾︾︾︾︾︾︾︾︾︾︾︾︾︾︾︾︾︾︾︾︾︾︾︾︾︾︾

    1. किती दिवस मी

    किती दिवस मी मानित होतें
    ह्या दगडापरी व्हावे जीवन;
    पडो उन वा पाउस त्यावर
    थिजलेलें अवधें संवेदन…

    किळवुन ज्याच्या वरती डोळे
    मनात यावे असले कांही
    तोच एकदा हसुन म्हणाला-
    दगडालाही चुकले नाही.

    चुकले नाही… चढते त्यावर
    शेवाळाचे जलमी गोंदण;
    चुकले नाही .. केविलवाणें
    दगडफुलाचे त्यास प्रसाधन…

    थिजलेल्याचे असले कांही
    त्याहुन वाते, हवे तुझे मन
    सळसळणारे अन जळणारे
    पशापशाने जाया भडकुन

    – इंदिरा संत

    ⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎


    2. तुला विसरण्यासाठी

    तुला विसरण्यासाठी
    पट सोंगट्या खेळते;
    अकांताने घेता दान
    पटालाही घेरी येते!

    असे कसे एकाएकी
    फासे जळले मुठीत
    कशा तुझ्या आठवणी
    उभ्या कट्टीत.. कट्टीत!

    दिला उधळुन डाव
    आणि निघाले कुठेही
    जिथे तुझे असें…
    तुजे असे कांही नाही!

    द्रुष्टी ठेविली समोर,
    चालले मी ’कुठेही’त;
    कुठेही च्या टोकापाशी
    उभी मात्र तुझी मुर्त!

    वाट टाकली मोडुन
    आणि गाठला मी डोह;
    एक तोच कनवाळु
    माझे जाणिल ह्रुदय!

    नांव तुझे येण्याआधी
    दिला झोकुन मी तोल;
    डोह लागला मिटाया
    तुझी होऊन ओंजळ!!

    – इंदिरा संत

    ⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎


    3. ऐक जरा ना….

    आठवते मज ती… टकटक
    त्या बोटांची;
    शहारते अन रंगरोगणाखाली
    एक आठवण,
    गतजन्मीची;
    आभाळातुन पडणार्या त्या थेंबाची
    ऐक जरा ना

    दंडावरती हात ठेवुनी
    कुजबुजते आरामखुर्ची.
    आठवते का अजुन तुला ती
    कातरवेळा.

    माहित नव्हते तुजला,
    वाट तुझी तो पहात होता
    मिटून डॊळे.

    होते दाटुन असह्य ओझे;
    होती धुमसत विद्युत काळी;
    अजुन होते मजला जाणिव

    निबिड वनांतिल….
    मध्यरात्रिच्या वावटळीची

    झपाटल्याची ऐक जरा ना
    कौलारांतुन थेंब ठिबकला ऒठांवरती.

    ऐक ना जरा….एक आठवण.
    ज्येष्ठामधल्या – त्या रात्रीच्या

    पहिल्या प्रहरी,
    अनपेक्षित से
    तया कोंडले जलधारांनी
    तुझ्याच पाशी.

    ऊठला जेंव्हा बंद कराया
    उघडी खीडकी,
    कसे म्हणाला…….
    मीच ऐकले शब्द तयाचे…

    ’या डोळ्यांची करील चोरी
    वीज चोरटी
    हेच मला भय’

    -धडपडले मी, उठले तेथुन;
    सुटले धावत

    त्या वस्तुतुन , त्या पाण्यातुन,
    दिशादिशातुन,

    हात ठेवुनी कानावरती;
    ऐकु न यावे शब्द कुणाचे

    ऐक जरा ना
    ऐक जरा ना
    ऐक जरा ना

    – म्रुगजळ, ईंदिरा संत

    ⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎


    4. किती दिवस मी

    किती दिवस मी मानित होतें
    ह्या दगडापरी व्हावे जीवन;
    पडो उन वा पाउस त्यावर
    थिजलेलें अवधें संवेदन…

    किळवुन ज्याच्या वरती डोळे
    मनात यावे असले कांही
    तोच एकदा हसुन म्हणाला-
    दगडालाही चुकले नाही.

    चुकले नाही… चढते त्यावर
    शेवाळाचे जलमी गोंदण;
    चुकले नाही .. केविलवाणें
    दगडफुलाचे त्यास प्रसाधन…

    थिजलेल्याचे असले कांही
    त्याहुन वाते, हवे तुझे मन
    सळसळणारे अन जळणारे
    पशापशाने जाया भडकुन

    – इंदिरा संत

    ⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎


    5. ऋणमुक्त

    सहज सहज टाकुन गेलास
    ओंजळीमधे एक ऋणाचा क्षण..
    एका जन्मासाठी.

    दहा बोटांची उधळली फुलपाखरे
    आणि, पांच प्राणाचे झाले संपुष्ट….

    कितिदा तुला वाऱ्याने सांगितले असेल;
    कितिदा फुल चिमणिने सांगितले असेल;

    झुंजु मुंजु धुक्यातुन
    कधीच का फिरला नाहीस?

    जांभळ्या फुलाच्या शामलीजवळून
    कधिच का गेला नाहीस?

    त्या फुलावरचा दवाचा थेंब
    कधिच का पाहिला नाहीस?

    कधिही न ढळणारा तो दवाचा थेंब तुझ्यासाठी.
    तुझ्या पापण्या भिजवण्यासाठी.

    कितीदा तुला हे वाऱ्याने सांगितले असेल
    फुल चिमणिने सांगितले असेल..

    – रंगबावरी, इंदिरा संत

    ⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎


    6. थेंबाथेंबी

    तारेवरती असती थांबुन
    थेंब दवाचे;
    मनांत ज्यांच्या,
    इवले काही, हिरवे पिवळे
    चमचमणारे……

    सतारीवरी असती थांबुन
    थेंब सुरांचे;
    मनांत ज्यांच्या ,
    इवले कांही, निळे- जांभळे
    झनझनणारे…….

    मनोमनावर असती थांबुन
    थेंब विजेचे;
    छेडुन तारा करांगुलीने.
    ऒठ करावे पुढती
    टिपायला ती थेंबाथेंबी.

    – इंदिरा संत

    ⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎


    7. तुला विसरण्यासाठी

    तुला विसरण्यासाठी
    पट सोंगट्या खेळते;
    अकांताने घेता दान
    पटालाही घेरी येते!

    असे कसे एकाएकी
    फासे जळले मुठीत
    कशा तुझ्या आठवणी
    उभ्या कट्टीत.. कट्टीत!

    दिला उधळुन डाव
    आणि निघाले कुठेही
    जिथे तुझे असें…
    तुजे असे कांही नाही!

    द्रुष्टी ठेविली समोर,
    चालले मी ’कुठेही’त;
    कुठेही च्या टोकापाशी
    उभी मात्र तुझी मुर्त!

    वाट टाकली मोडुन
    आणि गाठला मी डोह;
    एक तोच कनवाळु
    माझे जाणिल ह्रुदय!

    नांव तुझे येण्याआधी
    दिला झोकुन मी तोल;
    डोह लागला मिटाया
    तुझी होऊन ओंजळ!!

    – इंदिरा संत

    ⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎


    8. आई

    कळ्या माझ्या आनंदाच्या
    साठवील्या माझ्याकडे,
    फुलवाया तुझ्यापुढे.
    आसवे मी साठवली
    पापणीच्या काठोकाठ,
    तुझ्यापाशी देण्या वाट.

    ठरवले मानापाशी,
    बोलावयाचे कितितरी,
    निजुनिया मांडीवरी.

    किती लांब वाटे काळ,
    आई कधी भेटशील?
    जीव झाल उतवीळ.

    – इंदिरा संत

    ⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎


    9. बाकी

    होते का ते नुसते
    येणे आणिक जाणे
    होत्या का त्या नुसत्या गप्पा
    क्षेमकुशल अन स्मरणे
    होते का ते नुसते फिरणे

    करड्या चढणीवरुणी
    हिरवी उतरण घेणे
    होते का ते नुसते बघणे
    क्षितीजावरची चित्र लिपी अन
    पायाखालील गवतावरची
    तुसें रेशमी

    निवांतवेळी
    आभाळाच्या पाटीवरती
    हिशोब मांडू बघता
    उरते बाकी
    चंद्र घेतला जरी हातचा
    तरीही उरते बाकी.

    – इंदिरा संत

    ⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎


    10. अजूनही तिन्ही सांज

    चंदनाचा की चौरंग वर चांदीचे आसन
    मायबाई अन्नपूर्णा रांगणारा बालकृष्ण

    बाजूलाच सोनहंसी उभी चोचीत घेऊन
    कांचनाची दीपकळी तिचे हळवे नर्तन

    ओवाळाया आतुरसे पुढे तांब्याचे ताम्हन
    हिलारती निरांजन उदवात धूपदान
    तजेलशी गुलबास आणि नैवेद्याचा द्रोण

    समोरच्या पाटावर लक्ष्मी घराची येणार
    रोजचीच तिन्हीसांज मागे उभी राहणार

    अजूनही तिन्हीसांज रोज येतच राहते
    निरागस विध्वंसाच्या ढिगावरती टेकते

    काळा धूर, लाल जाळ रास राखेची पाहते
    काळोखाच्या ओढणीने डोळे टिपत राहते

    – इंदिरा संत

    ⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎⸎




    हे पण नक्की वाचा 👇👇👇


    तर आज आपण इंदिरा संत कविता संग्रह बघितला. तुम्हाला या कविता कशा वाटल्या ते तुम्ही मला खाली कंमेंट मध्ये सांगू शकता. आणि अन्य मराठी कविता, लिरिक्स संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.

    हि पोस्ट पूर्ण वाचल्याबद्द्दल खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🙏🙏








    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Blogger द्वारे प्रायोजित.