Header Ads

पद्मा गोळे यांच्या कविता | Padma Gole Yanchya Kavita


पद्मा गोळे हे मराठी साहित्यातील एक प्रसिद्ध कवीयत्री, लेखिका, नाटककार म्हणून प्रसिद्ध नाव आहे. पद्मा गोळे यांचा जन्म १० जुलै १९१३ ला तासगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव पद्मावती विष्णू गोळे असे होते. त्यांनी प्रीतीपथावर (1947) , स्वप्नजा (1962), आकाशवेडी (1968), श्रवणमेघ (1988) हे काव्यसंग्रह तसेच नवी जाणीव, रायगडवरील एक रात्र यासारखी नाटके त्यांनी लिहिली. स्त्रियांच्या भावविश्वाचे सुंदर चित्रण त्यांनी आपल्या कवितांमधून केले. चला तर मग बघूया पद्मा गोळे यांच्या कविता -


जाणीव


अशी जाणीव झाली की
डोळे वळतात आत;
आतला सगळा गोंधळ
पाहून होतात अचंबित.
अहंची रानटी रोपटी,
बिन ओळखीची पाळमूळ,
झनानणाऱ्या विणाबिणा,
एक दोन पक्षी आभाळ खुळे.
पण खुज्या खुज्या सृष्टीत
सुद्धा समुद्र केव्हा वादळतात;
काळे कुठे ढग येतात;
वादळ वारे झंजाट सुटून
ढग असे बरसतात -
असे.... असे बरसतात
की खुजेपणा हा निघतो धुवून
क्षणभर पडतं लख्ख ऊन !!

- पद्मा गोळे


पाठीशी कृष्ण हवा


मौनान होतं एवढ रामायण
हे माहीत असतं तर
शब्दांच्याच स्वाधीन झाले असते
पण शब्दांनी नेली असती मिरवणूक
भलत्याच दिशेला.
शब्द म्हणजे अंध कौरव
ओठात एक पोटात भलतंच.
मनाचे रामायण सहन
 करता येतं सीता होऊन.
पण शब्दांचा महाभारत 
सोसायला पाठीशी कृष्ण हवा.

- पद्मा गोळे


सकाळ


ओल्या बाळंतिणीसारखी स्निग्ध सकाळ !!!
कोवळ्या उन्हाला मांडीवर खेळवणारी, लडिवाळ,
निंबोणी आणि बाभूळ कौतुक करताहेत.
बाळंतीनीच ओठातल्या ओठात हसत
बोगन वेल खेळणं पुढे करते
रंगीत रंगीत ऊन बाळ हसत स्वतःशीच.
आणि चमत्कारच !!!
बाळकृष्णान लोणी खाल्लं म्हणून
यशोदेने त्याला 'आ' करायला सांगावा
आणि त्या 'आ' त तिला विश्वरूप दिसावं
दिपून जाऊन तिनं डोळे मिटावे
तसंच होतं काहीसं माझं !!!
ऊन बाळाकडे पाहता पाहता
माझे डोळे दीपतात.
मी डोळ्यांवर हात दाबीत आत येऊन बसते.
मग कामधाम उरकते;.
थोड्यावेळाने खिडकीतून पाहते
तर वाढत्या ऊन बाळाचा हात हाती
धरून पोपटी पुरवते दुपार येत असते
धीमी धीमी पावलं टाकीत !!!!!

- पद्मा गोळे


उत्तर


लिहावयाचे होते उत्तर
हरखूनी गेलो पेन आणि मी
आज लिहूया मनातले अश्विनी चांदणे,
अर्थ विचारू त्या दिवशीच्या
डोळ्यांमधल्या गुलमोहराच्या,
आणिक छेडू लिहून निळसर ग्लासामधले
थंड सरबती केशर वादळ

सरसावुनिया हिरवे लाघट पेन
मनस्वी लिहिली तारीख पत्ता आणिक -
अडले तट्टू !! काय मायना. ??
लिहि न काही;

स्तब्ध पाहते स्तब्ध पेन आणि मीही
निश्चल कागदातले डोळे स्नेहल,
डोळ्यांमधली कोसळणाऱ्या चांदणीसही
बावरणारी शपथ रेशमी,
दात रोविल्या ओठा आतील अशब्द वादळ

या सर्वांच्या आवर्तातूनि कसे सुटावे.
भोवळ ये आग्रही खुर्चीला
बधिर झाले भोळे टेबल
भिरभिरू निया पेन
टपकले तबकामध्ये.

अनघामाने हात निथळला
अखेर उठले-.
समजावूनी गोंजारुनी धरले पेन
करा मधी लिहून टाकले क्षणात भरकन:.
स न विवी.
अन सुटकेचा श्वास सोडला
सुटलो दोघे पेन आणि मी

- पद्मा गोळे



आजमावण्यासाठी


पांढरे निशाण उभारण्याची....
घाई करू नकोस मूठभर हृदया
प्रयत्न कर तगण्याचा तरण्याचा.
अवकाश भवंडून टाकणाऱ्या
या प्रलयंकारी.

वादळाचही.... एक अंत आहे.
काळाच्या त्या निर्णायक
बिंदूपर्यंत लढत रहा.
तुझ्या नाजूक अस्तित्वानिशी.

वादळे यासाठीच वापरायची असतात
आपण काय आहोत ते
तपासण्यासाठी नव्हे,
काय होऊ शकतो
हे आजमावण्यासाठी.....

पद्मा गोळे




हे पण वाचा 👇👇👇

तर मित्रांनो आज या पोस्ट मध्ये आपण पद्मा गोळे यांच्या कविता बघितल्या. मी अजून कोणाच्या कविता पोस्ट करू हे मला खाली कमेंट मध्ये सांगा आणि अन्य मराठी पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.

हि पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.