Header Ads

बहिणाबाई चौधरी यांची गाणी | Bahinabai Chi Gaani


नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं True Marathi Lyrics वर!!!!! या पोस्टमध्ये तुम्हाला बहिणाबाई चौधरी यांची गाणी वाचायला मिळतील. चला तर मग बहिणाबाईंची गाणी -


    १. घरोट घरोट


    उठ सासुरवाशीन बाई
    उठ सासुरवाशीन बाई
    उठ मध्य राती मांड दयन तु नीट
    मांड दयन तू नीट अन चालव बाई घरोट
    अन चालव बाई घरोट

    देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गोट
    देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गोट
    सर्व्या जुनी याच पोटभरी करमाचा मरोट
    चालव बाई घरोट... चालव बाई घरोट ...
    चालव बाई घरोट... चालव बाई घरोट ...

    अरे घरोट घरोट मानी बामनाचं जातं
    अरे घरोट घरोट मानी बामनाचं जातं
    कसा घरभर माझे याले म्हण घरोट
    देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गोट
    हं हं हं... हं हं हं हं

    अरे जोडता तोडलं त्याले नातं म्हणू नही
    त्याच्यातून येतं पीठ त्याले जातं म्हणून नही
    देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गोट
    हं हं हं... हं हं हं हं

    चाले घरोटा घरोटा तुझी चाले घरघर
    चाले घरोटा घरोटा तुझी चाले घरघर
    तुझ्या घरघरेतून पीठ गये भरभर
    चालव बाई घरोट चालव बाई घरोट
    हं हं हं... हं हं हं हं

    - बहिणाबाई चौधरी


    २. माणूस माणूस


    माणूस माणूस मतलबी रे माणसा
    माणूस माणूस मतलबी रे माणसा
    सुले हार हाव तुझी हपापेल आशा
    माणूस माणूस मतलबी रे माणसा...

    माणसा माणसा तुझी नियत बेकार
    तुझी नियत बेकार
    तुझ्याहून बरं गोठ्यातल्या जनावर
    तुझ्याहून बरं गोठ्यातल्या जनावर
    माणूस माणूस मतलबी रे माणसा..

    कर लाडा डोर भूली सनी जातो सूद
    खाई सनी चारा गाय म्हैस देते दूध
    मतलबासाठी माणूस डोलयमान
    अरे ईमानाच्या साठी ...
    अरे ईमानाच्या साठी ....
    ईमानाच्या साठी कुत्र शेपूट हालई
    माणूस माणूस मतलबी रे माणसा...

    माणसा माणसा कदी व्हशीन रे माणूस
    लोभासाठी झाला...
    लोभासाठी झाला...
    लोभासाठी झाला माणसाचा रे कानुस
    माणूस माणूस मतलबी रे माणसा...

    पाहिसनी रे लोकांचे यवहार खोटेनाटे
    तवा बोरी बाभईच्या आले अंगावर काटे
    माणूस माणूस मतलबी रे माणसा...
    मतलबी रे माणसा...
    मतलबी रे माणसा...
    मतलबी रे माणसा...

    - बहिणाबाई चौधरी


    ३. जीव देवानं धाडला

    जीव देवानं धाडला
    जीव देवानं धाडला
    जल्म म्हणे आला आला
    जवा आल बोलावण
    मौत म्हणे गेला गेला ...
    जीव देवानं धाडला
    जीव देवानं धाडला
    जल्म म्हणे आला आला
    जवा आल बोलावण
    मौत म्हणे गेला गेला ...

    आला सास गेला सास
    आला सासू गेला सासर
    जीवा बुझरे तंतर ..
    आले जगन मरण एका सासाच अंतर
    जीव देवानं धाडला

    नही सरल सरल जीवा तुझं येणं जाणं
    नही सरल सरल जीवा तुझं येणं जाणं
    जसा घडला मुक्काम त्याले म्हणती रे जीण
    नही सरल सरल जीवा तुझं येणं जाणं
    जसा घडला मुक्काम त्याले म्हणती रे जीण
    जीव देवानं धाडला

    येरे येरे माझ्या काम पडलं अमाप
    काम करता करता दिख देवाजीचे रूप
    येरे येरे माझ्या काम पडलं अमाप
    काम करता करता दिख देवाजीचे रूप
    जीव देवानं धाडला

    जग जग माझ्या जीवा
    जग जग माझ्या जीवा
    जग जग माझ्या जीवा
    असं जगणं तोलाच ... असं जगणं तोलाच
    उच्च गगनासारखं... उच्च गगनासारखं
    धरतीच्या रे मोलाचं .... धरतीच्या रे मोलाचं
    जीव देवानं धाडला
    जीव देवानं धाडला
    जीव देवानं धाडला

    - बहिणाबाई चौधरी


    ४. आज माहेराले जाणं


    आज माहेराले जाण ... आज माहेराले जाण ...
    झाली झाली हो पहाट
    आली आली डोयापूढे माझ्या माहेराची वाट
    आज माहेराले जाण ...
    आज माहेराले जाण ...

    माझं माहेर माहेर सदा गाणं तुझ्या ओठी
    मग माहेरून आली सासरले कशासाठी
    गाते माहेराचं गाणं
    गाते माहेराचं गाणं
    लेक येईन रे पोटी ...
    आज माहेराले जाण ...

    देरे देरे योग्या ध्यान, ऐक काय मी सांगते
    देरे देरे योग्या ध्यान, ऐक काय मी सांगते
    लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते

    माझ्या माहेराच्या बाटी
    माझ्या माहेराच्या बाटी
    जरी आले पायी फोड
    पाय चालले चालले अशी माहेराची ओढ
    आज माहेराले जाणं ....

    माझ्या माहेराच्या वाटे केलं बाईचं फाटूक
    माझ्या माहेराच्या वाटे केलं बाईचं फाटूक
    आगगाडीचे येणं जाणं तिले कशाची अटक
    आगगाडीचे येणं जाणं तिले कशाची अटक
    माझ्या माहेराच्या वाटे ...माझ्या माहेराच्या वाटे..
    जरी लागल्या रे चिचा वाटवरच्या
    दगडा तुले फुटली रे वाचा ...
    आज माहेराले जाणं ....

    नीट जाय माय बाई... नको करू धडपड
    तुझ्याच मी माहेराच्या वाटवरला दगड
    नीट जाय माय बाई... नको करू धडपड
    तुझ्याच मी माहेराच्या वाटवरला दगड
    माझ्या माहेराच्या वाटे मला लागली गुचकी
    आली उडत उडत एक दिसली सायंकी ....
    एक दिसली सायंकी...
    उठ उठ भिमाबाई काय घरात बसली
    उठ उठ भिमाबाई काय घरात बसली

    कर गुर मय रोट्या
    लेक बहीणाबाई आली
    लेक बहिणाबाई आली
    लेक बहिणाबाई आली

    - बहिणाबाई चौधरी


    ५. अरे रडता रडता

    अरे रडता रडता डोये भरले भरले
    आसू सरले सरले आता हुंदके उरले
    अरे रडता रडता डोये भरले भरले

    सांग सांग धरती माता अशी कशी जादू झाली
    सांग सांग धरती माता अशी कशी जादू झाली
    झाड गेलं निघी सनी.... मागे सावली उरली
    झाड गेलं निघी सनी.... मागे सावली उरली
    अरे रडता रडता डोये भरले

    जरी फुटल्या बांगड्या जरी फुटल्या बांगड्या
    मनगटी तर तूट ...
    तूटे मंगयसूत्र उरे गयाची शपथ
    कुंकू पुसलं पुसलं... कुंकू पुसलं पुसलं
    आता उरलं गोंदण ...

    तिचं देईन देईन नारी बाले अवतन
    रडू नको माझ्या जीवा रडू नको
    रडू नको माझ्या जीवा तुला रडायची रे सव
    रडू हासव रे जरा
    रडू हासव रे जरा
    त्यात संसाराची चव

    नका नका पाय पाय
    नका करू माझी किव
    नका नका पाय पाय
    नका करू माझी किव
    झालं माझं समाधान ...
    आता माझा माले जीव
    आता माझा माले जीव

    - बहिणाबाई चौधरी


    ६. बैल पोळा


    आला आला शेतकऱ्या पोयाचा रे सण मोठा
    करा आंघोयी बैलाच्या लावा शिंगाले शेंदूर

    लावा शिंगाले शेंदूर शेला घुंगराच्या लावा
    गया मंदी बांधा जिला घंट्या घुंगरू मिरवा

    बांधा कवड्याच्या गेठा अंगावर झूल छान
    माथी रेशमाचे गोंडे बांधा पायात पैंजण

    उठा उठा बहिणाबाई छुले पेटवा पेटवा
    आज बैलाने निवद पुरणाच्या पोया ठेवा

    वढे नागर वखर नाही कष्टाले गणती
    पिकं शेतकऱ्याच्या हाती याच्या जीवावर शेती

    उभे कामाचे ढिगारे बैलं कामदार बंध
    याले काही नाते झुलत जाणं चाऱ्याच मिंधा

    चुल्हा पेटवा पेटवा उठा उठा आयाबाया
    आज बैलाले खुराक रांधा पुरणाच्या पोया

    खाऊ द्या रे पोटभरी होऊ द्या रे मग दूल
    बशी सनी यायभरी आज करू द्या वागूल

    आता एका मनातलं माझं येडीच सांगन
    आज पोयाच्या सणाले माझं एवढं मागण

    कसे बैल कुदळता आदाबादीची आवड
    वझ शिंगाले बांधता बाशिंगचं होई जड

    नका हे हेलांडू बैलाले माझं ऐका रे जरासं
    व्हते आपली हाउस आणि बैल आले तरास

    आज पुजा रे बैलाले फेडा उपकाराचं देणं
    बैला खरा तुझा सण शेतकऱ्या तुझं रीन

    - बहिणाबाई चौधरी




    ७. उचलला हारा


    उचलला हारा... उचलला हारा....
    हरखल मन भारी
    उचलला हारा... उचलला हारा....
    हरखल मन भारी
    निजला हारात तान्हा माझा शिरीहरी
    उचलला हारा हरखल मन भारी
    निजला हारात तान्हा माझा शिरीहरी

    डोक्यावर हारा ... डोक्यावर हारा
    वाट बयाची धरली
    भवयाचा माया मया आंब्या खाले उतरली
    उतरला हारा हरखल माझं मन
    निजला हारात माझा कानका सोपान

    लागली कामाला उसामध्ये धरे बारे
    उसाच्या पानाचे हाती पायी लागे घरे
    उसाच्या पानाचे हाती पायी लागे घरे
    ऐकू हा राही .... ऐकू हा राही
    धावा धावा घात झाला ....
    धावा धावा घात झाला .....
    धावा धाव करी.... धावा धाव करी


    आंब्याखाली नाग आला
    हात जोडते नागोबा माझा वाचव रे कान्हा
    हात जोडते नागोबा माझा वाचव रे कान्हा
    अरे नको देऊ डंक अरे नको देऊ डंक
    तुले शंकराची आण
    हात जोडते नागोबा माझा वाचव रे कान्हा
    आता माझं व वाजव बालकिस्ना तुझा पोवा
    सांग सांग नागोबाले
    सांग सांग नागोबाले
    माझा आयक रे धावा
    माझा आयक रे धावा


    कधी भेटशीन तव्हा व्हती रे‌ भेटीगाठी
    कधी भेटशीन तव्हा व्हती रे‌ भेटीगाठी
    येत्या नागपंचमीले... येत्या नागपंचमीले ...
    आणिन दुधाची वाटी

    -बहिणाबाई चौधरी


    ८. परशसूराम बेलदार


    जाय आता पंढरी रे परसूराम बेलदारा
    जाय आता पंढरी रे परसूराम बेलदारा
    माटीमध्ये टाके पाणी
    माटीमध्ये टाके पाणी
    किती गुंदशी रे गारा
    जाय आता पंढरी रे परसूराम बेलदारा

    ईटा पाडल्या पाडल्या पजाववी गेला भरे
    तुझ्या इटाच्या रे भट्ट्या किती लावशील तरी
    किती लावशील तरी
    जाय आता पंढरी रे परसूराम बेलदारा

    भट्टीतल्या इटांवरी तुझ्या संसाराचा रंग
    भट्टीतल्या इटांवरी तुझ्या संसाराचा रंग
    तठी एका इटेवरी...
    तठी एका इटेवरी...
    देख उभा पांडुरंग

    विठ्ठल रखुमाई ...
    विठ्ठल रखुमाई ...
    विठ्ठल रखुमाई ...
    विठ्ठल रखुमाई ...
    विठ्ठल रखुमाई ....

    - बहिणाबाई चौधरी



    हे पण वाचा👇👇👇


    तर आज आपण बहिणाबाई चौधरी यांची गाणी बघितली अधिक गाण्यांच्या लिरिक्स साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .

    हि पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Blogger द्वारे प्रायोजित.