डोहाळे जेवणाची गाणी lyrics | Dohale Jevan Songs Lyrics
हॅलो फ्रेंड्स, आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये गर्भवती महिलेचा सातव्या महिन्यात डोहाळे जेवणच कार्यक्रम करण्याची पद्धत आहे. त्या वेळी पाळणा सुंदर फुलांनी यावेळी सजवला जातो. त्यामध्ये मग गर्भवतीला बसवतात. नाना प्रकाचे पकवान यावेळी समोर ठेवले जातात. आणि गाणी सुद्धा म्हटली जातात. हीच डोहाळे जेवणाची गाणी lyrics आपण या पोस्ट मध्ये बघणार आहोत. डोहाळे जेवणाची ८ गाणी आपण या पोस्ट मध्ये बघणार आहोत. चला वळूया गाण्यांकडे -
![]() |
डोहाळे जेवणाची गाणी lyrics |
डोहाळे जेवणाची गाणी Lyrics
(( १ ))
हिरवी साडी नेसवून
हिरवी साडी नेसवून रानी झुलयात बसवू ग
लाडक्या या लेकीचे डोहाळे पुरवू ग || धृ ||
पहिल्या मासी मातृत्वाची आली चाहुल
गोड बातमी पतिराजाला सांगे लाजुन
परिवाराला आनंद झाला गेले हर्षुन ग
लाडक्या या लेकीचे डोहाळे पुरवू ग || १ ||
दुसऱ्या मासी आली शिसरि शिजल्या अन्नाची
दूध नको अन फळे नको तीज राही उपवासी
सासु, आई जाऊ ननदा थकल्या सांगून ग
लाडक्या या लेकीचे डोहाळे पुरवू ग || २ ||
तिसऱ्या मासी पिकल्या चिंचा, पिकल्या रानात
हेतु आपुला हळूच सांगे सखीच्या कानात
गाभुळलेल्या चिंचा तोंडी पानी सुतले ग
लाडक्या या लेकीचे डोहाळे पुरवू ग || ३ ||
चवथ्या मासी पिवळी बोर पिकली अंगणात
टपाप पडता झेलून घेई आपुल्या पदरात
आंबट गोड चविचे बोर खाशी वेचून ग
लाडक्या या लेकीचे डोहाळे पुरवू ग || ४ ||
पाचव्या मासी आणले आवले तुरट रसदार
लोणचं, मुरब्बा, आवळा कॅंडी नाना प्रकार
आंबट चिंबट देऊ आणून ग
लाडक्या या लेकीचे डोहाळे पुरवू ग || ५ ||
सहाव्या मासी वस्त्र ना पुरे भरला हा बांधा
एक हि चोळी न ये तनाला झालाय ग वांदा
गाळ गोबरे, पोट वाढले रूपही खुलले ग
लाडक्या या लेकीचे डोहाळे पुरवू ग || ६ ||
सातव्या मासी ओटी भरण्या सुवासिनी आल्या
हिरवा चुडा, साडी रेशमी सजला झोपाळा
हार फुलांचे अंगावरती वेणीत माळून ग
लाडक्या या लेकीचे डोहाळे पुरवू ग || ७ ||
आठव्या मासी भर सोसेना ठाकली हि बाला
वेळ जाईना रात्र हि मोठी, मोजे दिवसाला
धीर देतसे संख्या मैत्रिणी गोष्टी सांगून ग
लाडक्या या लेकीचे डोहाळे पुरवू ग || ८ ||
नवव्या मासी भावासंगे निघे माहेरी
पाऊल भारी परतून परतून आहे माघारी
पुत्र असो व पुत्री आंबे लवकर सोडिव ग
लाडक्या या लेकीचे डोहाळे पुरवू ग || ९ ||
हिरवी साडी नेसवून रानी झुलयात बसवू ग
लाडक्या या लेकीचे डोहाळे पुरवू ग ||
—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙
(( २ ))
पाच तऱ्हेच्या पाच खिरी
पाच तऱ्हेच्या पाच खिरी, त्या ठेवून द्या ताटात ग
डोहाळे जेवण आज, सखेचे आहे मोठ्या थाटात || धृ ||
तुझ्यासाठी सुंदर साडी आणली ग बुट्ट्याची
सोन्यासंगे बांगडी शोभे हिरव्या ग काचेची
कळ्या कल्याणचा करुनि गजरा, घालविला ग केसात
डोहाळे जेवण आज, सखेचे आहे मोठ्या थाटात || १ ||
जाऊ तुझी ग मोठी हौशी तयारी केली ग पाळण्याची
रांगोळी ती सुंदर काढी, ताटाच्या भोवती
उघड म्हणे ती खिरीची वाटी, काय निघाले ग त्यात
डोहाळे जेवण आज, सखेचे आहे मोठ्या थाटात || २ ||
नाव घेई तू आज पतीचे, विनविते ग तुजला
रोमारोमाचा छेड तुजवरी आज ग बहू फुलांचा
आशीर्वाद हा आम्ही देतो पुत्र पडो ग ओटीत
डोहाळे जेवण आज, सखेचे आहे मोठ्या थाटात || ३ ||
आजवरी तू एकटीच जाई, आपुल्या ग माहेराला
आज मात्र आणविले संगे, छोट्या हिंदू राजाला
आता आणले तू संगे छोट्या ग युवराजला
डोहाळे जेवण आज, सखेचे आहे मोठ्या थाटात || ४ ||
—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙
(( ३ ))
गोरी गोरी पान फुलांसारखी छान
गोरी गोरी पान फुलांसारखी छान
दिसते पहा कशी गर्भवती छान || धृ ||
गोऱ्या गोऱ्या गर्भवतीचे हिरवी हिरवी साडी
हिरव्या हिरव्या साडीवर हिरवी चोळी
साडीच्या काठावर मोती लावले छान
दिसते पहा कशी गर्भवती छान || १ ||
गर्भवतीला बसण्यासाठी पाळणा बनवला
पाळणा बनवला त्याला फुलानी सजवला
पाळण्याच्या दोरीला फुले दिसे छान
दिसते पहा कशी गर्भवती छान || २ ||
गर्भवतीला वाटे मी बागेत जावे
हिरव्या हिरव्या गवतावर निद्रा मी घ्यावे
आंबा, चिंच, पेरू तिला खावे वाटे छान
दिसते पहा कशी गर्भवती छान || ३ ||
- मीनाताई तगारे
—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙
(( ४ ))
चांदणं चांदणं झाली रात
चांदणं चांदणं झाली रात
ओटी भरुया भरुया पदरात || धृ ||
पाच सुवासिनी बोलवा ग
पाळणा तिचा सजवा ग
हिरव्या वेली लावल्या दाट
ओटी भरुया भरुया पदरात || १ ||
पाच सुवासिनी बोलवा ग
बांगड्या तिला भरवा ग
बांगड्यांची शोभून दिसते हात
ओटी भरुया भरुया पदरात || २ ||
पाच सुवासिनी बोलवा ग
हिरवा गजरा भरवा ग
शालू संग भारीच हीच थाट
ओटी भरुया भरुया पदरात || ३ ||
पाच सुवासिनी बोलवा ग
डोहाळे हिचे पुरवा ग
पक्वानांनी शोभून दिसते ताट
ओटी भरुया भरुया पदरात || ४ ||
पाच सुवासिनी बोलवा ग
कौतुक तिचे करवा ग
नव्या बाळाची सारे बघती वाट
ओटी भरुया भरुया पदरात || ५ ||
—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙
(( ५ ))
चेहऱ्यावरची लाली तुझ्या
चेहऱ्यावरची लाली तुझ्या दिसते पाहताना
काय सांगू तुला, आई तू होणार होणार होणार || धृ ||
योग्य अपूर्व हा जीवनी, ध्यास बाळाचा सोडोनि
आता राहावे आनंदी, ध्यास देवाचा धरोनि
आई वदता कष्ट तुझे हे हरणार
आई वदता सर्व कष्ट तुझे हे हरणार
आई तू होणार होणार होणार || १ ||
आई होशील ग सवडीनं, इच्छा पुरवील ग आवडीनं
पाळणा सजवून तुझा चोळी घालीन आवडीनं
कौतुक तुझे सारे जण आता ग करणार
आई तू होणार होणार होणार || २ ||
कुलदीपक वंशाचा तुझ्या पोटी आला आता
ता पाऊल जपून आता सांभाळ अंकुशाला
आजी आजोबाना नातू बघता वाटे आनंद
आई तू होणार होणार होणार || ३ ||
—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙
(( ६ ))
तुम्ही राणीचे डोहाळे पुरवा ग
तुम्ही राणीचे डोहाळे पुरवा ग
तुम्ही राणीचे डोहाळे पुरवा ग
तुम्ही राणीचे डोहाळे पुरवा ग || धृ ||
चिंच, बोर, अंजीर, अननस
डाळिंब, मोसंबी, पेरू, फणस
आंबे हापूस पाडाचे मागावा ग
तुम्ही राणीचे डोहाळे पुरवा ग || १ ||
लाडू जिलेबी श्रीखंड कलाकंद
शेव चिवडा चकली फरसाण
पेढे केशरी मथुरेचे बोलवा ग
तुम्ही राणीचे डोहाळे पुरवा ग || २ ||
हिरवा शालू चोळी भरजरी
चुडा हिरवा भरा बिल्लोरी
गजरा अबोली वेणीत माळवा ग
तुम्ही राणीचे डोहाळे पुरवा ग || ३ ||
झुला बसाया चंदनी सुंदर
फुलमाळा नि लावा हंड्या झुंबर
मखर सोन्याचा मोती त्यास लावा ग
तुम्ही राणीचे डोहाळे पुरवा ग || ४ ||
राणी मखरात बसेन सकुमार
लावा मोराच्या समया चौफेर
बाळ येईल पोटी जप जिवा ग
तुम्ही राणीचे डोहाळे पुरवा ग || ५ ||
—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙
(( ७ ))
किती आनंद झाला ग बाई
किती आनंद झाला ग बाई ....(2times )
तू होणार बाळाची आई ....(2times ) || धृ ||
त्याची चाहूल लागली आज,चढला अंगावर लाजेचा साज
आज सुचेना हिला ग काही ,आज सुचेना हिला ग काही
तू होणार बाळाची आई || १ ||
आता लागला तिसरा मास, जेवायला ग भलताच त्रास
हिला होतो ग बाई आला फळांचा पेटारा बाई
तू होणार बाळाची आई || १ ||
हिच्या माहेरी निरोप दिला, आई बाबाना आनंद झाला
बहीण भावांना उल्हास झाला, उद्या होणार हिची ग घाई
तू होणार बाळाची आई || २ ||
डोहाळे जेवणाचा थाट ग मोठा, येथे कशाला नाही ग तोटा
सगळ्या पंगतीला मेवा मिठाई, आता वर्षाची होणार घाई
तू होणार बाळाची आई || ३ ||
तू होणार बाळाची आई
तू होणार बाळाची आई
तू होणार बाळाची आई
किती आनंद झाला ग बाई
तू होणार बाळाची आई ||
—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙
(( ८ ))
सीतामातेचे पारंपरिक डोहाळे गीत
पहिल्या दिवशी पहिला दिवस, सीतामाई गरोदर बहू सुखनार
अयोध्या नगरीत बहू उल्हास, लागले डोहाळे पुरवावी आस
जो बाळा जो जो रे जो || १ ||
दुसऱ्या दिवशी झाला आनंद, कैकेयी, कौसल्या हर्षल नंद
सीता महालात सुटला गंध, नाचे गायन उडवितो छंद
जो बाळा जो जो रे जो || २ ||
तिसऱ्या दिवशी झाले विपरीत, रामची निंदा होती शहरात
चिंता लागली राम हृदयात, काही सुचेना कल्प मनात
जो बाळा जो जो रे जो || ३ ||
चवथ्या दिवशी पेटली आग, राम सीतेचा करितो त्याग
लक्ष्मणाला बोले सारंग, वाणी सोड सीता नेऊनि संग
जो बाळा जो जो रे जो || ४ ||
पाचवे दिवशी शब्द ऐकता, दुःख झाले लक्ष्मण दूता
कैसे सोडू मी वनात सीता, आदिमाया शक्ती आहे पतिव्रता
जो बाळा जो जो रे जो || ५ ||
सहाव्या दिवशी हुकुमाप्रमाणे, गेले महालात दीर लक्ष्मण
सीता उठली दीर पाहून, सांगा भाऊजी लय दिवस येन
जो बाळा जो जो रे जो || ६ ||
सातवे दिवशी बोलता गुप्त, आज्ञा रामाची बस रथात
कंदमुळे खावी वनात, डोहाळे तुमचे पुरवावे तिथं
जो बाळा जो जो रे जो || ७ ||
आठवे दिवशी हुकूम होता, बसे रथात जाऊन सीता
रथ चालला पहाड पर्वता शोक आवरेना लक्ष्मण दूता
जो बाळा जो जो रे जो || ८ ||
नववे दिवशी रथ गेला दूर, आली लागली किर्रर्र डोंगर
सीता मनात झाली दिलगीर, हाक मारती बोलेना दीर
जो बाळा जो जो रे जो || ९ ||
दहावे दिवशी पाहून वनाला, भीती वाटे माझ्या मनाला
सांगा भाऊजी भेद का धरिला, दिवस बुडाला अंधार पडला
जो बाळा जो जो रे जो || १० ||
अकरावे दिवशी उभा केला रथ, लक्ष्मणाने जोडले हात
अश्रुधारा पाणी वाहे नेत्रात, राम आज्ञेचा आहे मी दूत
जो बाळा जो जो रे जो || ११ ||
बारावे दिवशी झाले वनवासी, भयभीत झाले मन उदासी
काय चुकले राम सेवेसी
जो बाळा जो जो रे जो || १२ ||
तेरावे दिवशी केला विचार, राम प्रभुनी केला निर्धार
राम मुखाचा पडला अंधार, गंगामाईला जोडले कर
जो बाळा जो जो रे जो || १३ ||
चौदावे दिवशी झाले बोलणे, निश्चय केला सीतामाईने
गंगामाईला देह केला अर्पण,
जो बाळा जो जो रे जो || १४ ||
पंधरावे दिवशी जन्मले बाळ, लवकुश फुले आणाया गेले बागेत
युद्ध करुनि जिंकी रामास
जो बाळा जो जो रे जो || १५ ||
सोळावे दिवशी झाले ब्रम्हादिक सीतामाईला लाभले दुःख
जाणे अंतरी ऋषी वाल्मिक, तुका म्हणे चुकेना लेख
जो बाळा जो जो रे जो || १६ ||
—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙—⁙
हे पण वाचा 👇👇👇
तर आज आपण डोहाळे जेवणाची गाणी lyrics बघितले. तुम्हाला हि गाणी कशी वाटली ते कंमेंट मध्ये सांगा. आणि अन्य मराठी लैरिक्स साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.
धन्यवाद 🙏🙏🙏
Post a Comment