Header Ads

Mothe Ukhane In Marathi | वाचा 20+ मोठे उखाणे मराठी मध्ये



मित्रानो , आपल्याकडे पूजा, सणसमारंभ, बारसे तसेच डोहाळे जेवण आणि इतर खास प्रसंगाच्या वेळी नाव घेण्याची पद्धत आहे. शब्दांची लयबद्ध रचणे मध्ये पतीचे किंवा पत्नीचे नाव टाकून काही ओळी बोलल्या जातात. त्यालाच नाव घेणे किंवा उखाणा असेही म्हणतात. शहरातल्या मुलींना जास्त उखाणे येत नाहीत. पण गावाकडच्या स्त्रियांना खूप उखाणे पाठ असत. आणि लांबलचक उखाणेही असतात काही तर ऐका पूर्ण पानाचे असतात. अशा उखाण्यांना जनपत म्हणतात. असेच Mothe Ukhane In Marathi आज आपण या पोस्ट मध्ये बघणार आहोत. इथे आपण २१ लांब असे उखाणे तुम्हाला वाचायला मिळतील.


Mothe Ukhane In Marathi
Mothe Ukhane In Marathi



Mothe Ukhane In Marathi


(( १ ))

नाकात नथ, पायात जोडवी, पैठणी नसते लक्ष्मीसारखी
हातात पाटल्या, बांगड्या मध्येच किणकिणती, वेणीत खोपा,
नऊवारी साडी, कापली चंद्रकोर, कोरलेली, भांगात कुंकू,
हातात तोडे, गळ्यात चंद्रहार, नामी शोभे साक्षात लक्ष्मी
लक्ष्मीचं स्वागत करते आणि ........... रावांचं नाव
घेऊन लक्ष्मी पूजन करते .


(( २ ))

आडगाव माझं संसार, जयपूर माझं महेर,
गावात घर घरसमोर आंगण, अंगणात मोठं प्रांगण
प्रांगणात तुळशीचे वृंदावन, वृन्दावनासमोर रांगोळी,
नेव्ही घेते हळदीच्या वेळी
नाव घ्या नाव घ्या नावात काय असत
लहानच मोठेपण मोठ्याचं थोरपण, थोरांचा मान
तोच आमचा स्वाभिमान ....... रावांचं नाव
घेऊन ठेवते सर्वांचा मान.


(( ३ ))

चौफेर वाड्याला सात खांब ,
दशरथाच्या घरी जन्मले राम,
राम गेले बंदरा रुपये आणले पंधरा ,
पंधरा रुपयांची घेतली साडी
माहेरी मोडली घडी, नेसली साडी ,
गेले सासरच्या घरी, कमरेला किल्ल्या
उघडली खोली, खोलीला भिंत,
भिंतीला कपाट, कपाटाला खाट,
खाटीवर गादी , गादीवर उशी, उशीवर परात
परातीत ताट, ताटात वाटी, वाटीत भात,
भातावर तूप , तुपासारखे रूप, रूपासारखा जोडा,
पंढरीला चंद्रभागेचा वेढा, चंद्रभागेच्या तीरी
बायका म्हणतात नाव घे पोरी, नाव कसले फुकाचं,
हळदी कुंकू मोलाचं, हळदी कुंकू ठेवायला
चांदीच तबक , त्यासोबत अत्तरदानी शोभे सुबक
बसायला चंदनाचा पाट , जेवायला सोन्याचं ताट
खायला मोत्याचा घास ...... रावांचं नाव घेते
तुमच्यासाठीच खास.


(( ४ ))

एक होती नागरी , नगरीत होत तळ ,
तळ्याजवळ होता कंदील, कंदिलाजवळ होता
शिपाई , शिपायाजवळ होता वाडा , वाडा होता पाडा,
पाड्याजवळ होता घोडा, तिथे होता चौक, चौकात
होत देऊळ महादेवाचं , तिथे होती खुंटी , खुंटीवर होत सोळ
डोळ्यावर होती चोळी ....... रावांची गंगुबाई भोळी.


(( ५ ))


Mothe Ukhane In Marathi 

जीवन आहे जगण्यासाठी , आकाश आहे धरणीसाठी ,
चांदणी आहे चंद्रासाठी , भ्रमर आहे फुलांसाठी ,
रंग आहेत स्वप्नांसाठी , गीत आहेत स्वरांसाठी अन मी
आहे ........ रावांसाठी आणि ....... राव माझ्यासाठी.


((६ ))

जोडवी, वीरोळ्या, मासोळ्या ,साखळ्या ,
कमरेला कमरपट्टा ,मेखला आणि अंगठी ,
पोथ, पाटल्या, बिलवर, गोठ, तोडे, वाकी,
बिंदी, पोहेहार, एकदाणी, घातली काठाची
साडी .......... रावांचं नाव घेते पण मणी
मंगळसूत्राची नाही कोठेच बरोबरी.


(( ७ ))

हंड्यावर हांडे सात ,त्यावर ठेवली परात ,
परातीत होते सातू , सातूचे केला भात ,
भातावर वरण ,वारणावर तुपाची धार ,
तुपासारखं रूप रूपासारखा जोडा ,
जोड्यात हलगाडी, हलगाडीत बैलगाडी
बैलगाडीत पिंजरा, पिंजऱ्यात रघु ,
राघूच्या तोंडी उंबर , ......... रावांचं नाव
ऐकलंत ना मग काढा रुपये शंभर.


(( ८ ))

येत होते जात होते , खिडकीवाटे पाहत होते
खिडकी लागली कानाला , खिडकीला तीन तारा ,
अडकिले घुंगर बारा ,पान खाते कराकरा, घाम येतो
दरा दरा , तिकडून आला व्यापारी , व्यापाऱ्याने
दिली सुपारी , सुपारी देते वाण्याला , हंडा घेते पाण्याला
पाणी आणते गंगेचं , वाडा बांधते भिंगाच , वाड्यात वाडे
सात वाडे , एका वाड्यात पलंग , पलंगावर गादी
गादीवर उशी , उशीवर होती कपबशी , कपबशी
दिली पाहुण्याला , त्यास्नी पाहिलं समोरच्या भिंतीला ,
भिंतीवर होत घड्याळ , घड्याळात वाजला एक
आणि ......... रावांचं नाव घेते ........ रावांची लेक.


(( ९ ))

रंगला सांग हवा दिशा धुंद करण्याचा,
गंधाला छंद हवा अनंत आकाशाचा,
स्वप्नातल्या सृष्टीला साज हवा सौख्याचा.
........ ना सुखी करायला आशीर्वाद
हवा आपण सर्वांचा.



(( १० ))

मोठे उखाणे
मोठे उखाणे

हंड्यावर हांडे सात, त्यावर ठेवली परात ,
परातीवर ठेवला भात , भातावर वाढले तूप ,
ते झाले खूप , म्हणूनच गेले पंढरपूरला ,
पांडुरंगाच्या दर्शनाला , येताना आणले खण ३ ,
आई म्हणे मला , नणंद म्हणे मला
........ राव म्हणे मी तुझ्यासाठी आणून
केला गुन्हा.


(( ११ ))

ऐका हो ऐका सुवासिनी बायका
पैशाला म्हणतात पैका माझा उखाणा ऐका
आला आला श्रावण श्रावणातली नागपंचमी ,
नागपंचमीच्या फुटली लाही ,कोकणचा करते व्याही
व्याधीने आणले नारळ सात , नारळी पौर्णिमेला
करते नराळभात ,नारळ आणलं कोकणच तूप आणलं चाकणच
भातावर वाढते तूप , तुपासारखं रूप , रूपासारखा आमचा जोडा ,
जोडण्यासाठी उपवास केला हरतालिकेच्या , नऊ दिवसांचं
नवरात्र , दसऱ्याचं राखते पावित्र्य , रोगाचं करते निर्मूलन ,
दसऱ्याचं करते सीमोल्लंघन , माहेरून तार आली ,
हवा पडली पावसाळी ,अधिवेशन झाले हिवाळी ,
मग आली दिवाळी , दिवाळीला भरते सांजोऱ्या. लाडूंची बशी ,
भाऊ आला भाऊबीजेच्या दिवशी ,ताट करते जेवणाचा ,
स्वयंपाक करते पुरणाचा , निरोप येत दादा वाहिनीचा कळला
महिमा लग्नाचा , वटपौर्णिमेला करते अनुष्ठान , दिव्याचं देते दान ,
संसार माझं जीव कि प्राण , मार्गशीष मसाला उत्सव भरतो शाकंभरीला ,
ववसानी यावं मकरसंक्रांतीला ,वेध लागले होळीचे सप्तरंगी नहायचे ,
रंग काढायला होळीचा हिशोब केला ताळमेळीचा , नववर्षाचा
शुभारंभ करतो बाई पाडवा , जीवनात माझ्या आलाय गोडवा ,
चैत्र मासाला पुजतो मंगळागौर , ताऱ्यांसंगे वाऱ्यासंगें
छंद छेडीत होते मनाची , .......... रावांसंगे वाट
चालते मी सहजीवनाची .



(( १२ ))

काळी डिचकी कंगोऱ्याची , आत भाजी लिंबोऱ्याची ,
इन मोठी ठोकऱ्याची , कुंकू लेती बारदानी , बारदाणीचा आरसा ,
आरसा मग परसा , परसात होती केलं , केळीला आल्या तीन कळ्या ,
तीन कळ्यांची बांधली माडी , माडीवर होती तुळस , तुळशीची करते सेवा
.......रावांचा अन माझा जोडा जन्माला यावा .



(( १३ ))

कैलास माडी काचेच्या पायऱ्या , आर लावा त्याला ,
हजाराची पैठणी मला , पाचशेचा मंदिल त्याला ,
जरीच्या चोळीला इस्तर दिला , नक्षीच्या धोतराला ,
चाटी गेला अमरावतीला , अमरावतीहून आणल्या पाटल्या ,
मी माझ्या मनगटी दाटल्या , आरलं कारलं सोन्याचं सरल ,
सर वजार्तीक सोनाराने गाठवली , माझ्या गळ्याला दाटली ,
अशी नार कशी सभेशी उभी ?? छत्तीसगावचा कारभारी ,
त्याची केली माती , मातीच केलं कसं , मला आलं हसू ,
हसली गालातल्या गालात , मला पुसती रंगमहालात ,
रंगमहालातून चालल्या नावा , ......... राव सर्वी काम सोडून मला
आधी आळंदी दाखवा .


(( १४ ))

मी होते सवाष्णीच्या मेळ्यात , नावरत्नांचा हार सासूबाईंच्या गळ्यात ,
आतीबाईंच्या पोटी जन्मला हिरा , मामंजींच्या मंदीली मोत्याचा तुरा ,
मी पुजली तुळस , मला सापडला कळस , असा कळस शोभेचा ,
वाडा बांधला ताडमाड , वर रामफळाचं झाड , ...... रावांचं नाव घेते
येऊ नका आड .



(( १५ ))

चांदीच घंगाळ अंघोळीला , जरीकाठी धोतर नेसायला ,
चंदनाचा पाट बसायला , सण (सहान ) येवल्याची , खोड
बडोद्याचा , केसरी गंध लेयाला , बारा मोसंब्या खायला ,
सोन्याचं ताट जेवायला , नाशिकचा गाढव पाणी प्यायला ,
असे जेवणाचे विलास , रांगोळ्यांचा थाट , उदबत्त्यांचा घमघमाट ,
जायपत्री जयपूरची , लवंग सातारची , कात बडोद्याचा , चुना लोनाळचा ,
पंपूड पुण्याचा , वेलदोडा मुंबईचा , खाल्ली पान , रंगली तोंड ,
भरगच्च गादी , रंगरंगान भरला कळस , ....... रावांच्या नावावर
मी करीत नाही कसलाच आळस .


(( १६ ))

नाव घ्या म्हणता जीव माझा नेणता , नेणत्याची कोवळी बुद्धी ,
ताक म्हणून वाढलं दूध , दुधावरची साय , तूप लावूनी केली चपाती मऊ ,
चपाती वारला भजा , आनंदानं जेवला राजा , निरिच्छ बघा थाट ब्रह्मदेवाची गांठ ,
गांठ सोडावी राहुनी उभा , कापली शोभा कुंकवाची बघा ,
बघा लल्लाटी खाली हळदीची दाटी ,हळदीचा पिवळा रंग ,
कंबरपट्ट्याची काडी , गरसुळी गाती , आयना डाव्या हाती ,
मुख न्याहाळीत होती , हातात सुवर्णाचा चुरा ,
....... रावांच्या मंदिलाला सोन्याचा तुरा .



(( १७))

झुन झुन झुण्यात एक पाऊल पुण्यात ,
पुण्याचा बाजार , म्हशी घेतल्या हजार ,
पावशेर दुधाचा केला खवा ,
...... राव तुम्ही दमण जेव्हा पण भाजी तोंडी लावा .


(( १८ ))

बाभूळ गाव शहर , तिथं भरती बाजार , वाघाची पिल केली
हजाराचा खिराज कमरेच्या शिरी , स्वामी उतरले परवरी ,
घेतला वऱ्हाडाचा छंद , तिथे घेतल्या पंचरंगी गाद्या , गाड्या लावल्या घरा ,
आपण मोठ्या शहरा , काळवतीनी घालतात वारा ,सराफाच्या
माड्या उघड्या , तिथे घेतल्या बुगड्या , बुगड्या टाकल्या खिशात ,
आपण कारंडे देशात तिथे बोलावली , उडी रंगाची पैठणी , पैठणीचा रंग फिक्का ,
बोलावली वाकडी नथ , वाकड्या नथीचा दुहेरी फासा , हजाराचे मोती दोन ,
ते लेनार कोण ...... रावांची पत्नी आणि ..........ची सून



(( १९ ))

देवळात होता खांब , त्याला आला घाम , उठा उठा ....... राव
बैल गेला लांब , पाऊस पडतो झिरीमिरी , प्रभारी चालल्या नानापरी ,
शेताला जाते हरकत ,राशीला माझ्या बरकत , अधोली माप ...... राव म्हणतात
......... माझी सखी न कोळ्यांनी टाकली हुकी


(( २० ))

त्रिमली गाव शहर , भावंतांनी वेशी चार , माडी बांधला चिरेबंदी पार ,
रुपये दिले नव्हते हजार , वर मोट्या पावल्या बाजार , जवार आलं पेट ,
लावा कुलुपासणी काट , जवार गेलं निघून , पण पुतळ्या बघून , 
वजरटीकिला गोंड चार , तोळबंदी भवरा अणीदार, मग म्होरं 
बांगड्या चार , बांगड्याला टिक , इरुद्या मासूळ्याची बोर टिक ,
इरुद्या मासूळ्याची बोट उघडी , मागती कानाची बुगडी ,
कानाच्या बुगडीला झुब ,
....... राव नित्य कचेरीला उभं .


(( २१))

..... तालुक्यात माझे ......... गाव ,
गावात होती माडी ,माडीवर नसते साडी ,
साडीला लावला चाप , ,..... माझा बाप ,
दारात होती जाई , ........माझी आई ,
पाण्याला गेली गवळण , ...... माझी माळवन ,
पाण्यात होती नाव , .......... माझा भाव ,
समुद्राच्या पाण्यात झळकतात मोती ,
........ राव माझे पती आणि मी त्यांची सौभाग्यवती




हे पण वाचा :


आज आपण Mothe Ukhane In Marathi बघितले. तर तुम्हाला हे कसे वाटले ते मला जरूर सांगा आणि तुमची अन्य कोणती प्रतिक्रिया असेल ते पण कंमेंट मध्ये नक्की सांगा. अन्य मराठी पोस्ट साठी True Marathi Lyrics  ला पुन्हा भेट नक्की भेट द्या.

धन्यवाद !!!!!!








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.