Header Ads

पंढरीत उभा माझा सखा पांडुरंग Lyrics | Pandharit Ubha Majha Sakha Pandurang



नमस्कार या पोस्टमध्ये आपण पंढरीत उभा माझा सखा पांडुरंग Lyrics बघणार आहोत.

पंढरीत उभा माझा सखा पांडुरंग Lyrics | Marathi

कीर्तनात होऊ दंग गाऊनी अभंग
पंढरीत उभा माझा सखा पांडुरंग... || धृ ||

भक्ती तुझी करू साकार ध्यानाचा आधार
दर्शनाचा आलो तुझ्या तूच आम्हा तार
पांडुरंग लागली तुझी आम्हा आस
पंढरीत उभा माझा सखा पांडुरंग... || १ ||

चंद्रभागे तिरी तुझे हे मंदिर
स्नान करून आलो मंदिरी
द्यावे आम्हा दर्शन
पाहताच रूप तुझे झालो मी दंग
पंढरीत उभा माझा सखा पांडुरंग... || २ ||

वारकरी गातो अभंग मृदंगाचा नाद
सोबतीला सगे सोयरे टाळ
चिपळ्यांची साथ
दास म्हणे हेचि सुख लाभले आम्हास
पंढरीत उभा माझा सखा पांडुरंग... || ३ ||

* * * * * 



हे अभंग पण नक्की वाचा 👇👇👇


आज या पोस्टमध्ये आपण पंढरीत उभा माझा सखा पांडुरंग Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.