Header Ads

विठ्ठलाचे रूप मंदिरी सुंदर Lyrics | Vithal Rup Mandiri Sundar Lyrics


नमस्कार या पोस्टमध्ये आपण विठ्ठलाचे रूप मंदिरी सुंदर Lyrics बघणार आहोत.

विठ्ठलाचे रूप मंदिरी सुंदर Lyrics | Marathi

विठ्ठलाचे रूप मंदिरी सुंदर
असे क्षेत्र आहे ते पंढरपूर.. || धृ ||

नित्य दरवळे हा भक्तीचा सुगंध
भाविकही होती भजनात धुंद
कानी येती गोड अभंगाची सुर
असे क्षेत्र आहे ते पंढरपूर.. || १ ||

असे भोवताली राऊळे अनेक
दिसे तेज त्यात सांगताती कैक
दर्शनासी होती भक्त ही आतुर
असे क्षेत्र आहे ते पंढरपूर.. || २ ||

जाहली पवित्र नदी चंद्रभागा
तुझ्या सहवासे प्रभू पांडुरंगा
पतीतांची पापे होती सर्व दूर
असे क्षेत्र आहे ते पंढरपूर.. || ३ ||

अशी आहे नगरी भक्ती रसाची
भासे भाविकांना खामी सोनियाची
मिळो दत्तालाही रस भरपूर
असे क्षेत्र आहे ते पंढरपूर.. || ४ ||

* * * * * *




ही भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇


आज या पोस्टमध्ये आपण विठ्ठलाचे रूप मंदिरी सुंदर Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!! 🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.