बायको खांद्यावरी निघाला पुंडलिक पंढरपुरी Lyrics | Bayko Khandyavari Nighala Pundalik
नमस्कार या पोस्टमध्ये आपण बायको खांद्यावरी निघाला पुंडलिक पंढरपुरी Lyrics बघणार आहोत.
बायको खांद्यावरी निघाला पुंडलिक पंढरपुरी Lyrics
आई बापाच्या गळ्यात दोरी
बायको खांद्यावरी...
बायको खांद्यावरी निघाला
पुंडलिक पंढरपुरी... || धृ ||
माय पिता ती जर्जर दोघे
पुंडलिक दंगे पत्नी संगे
बाईलवेडा होऊनी गेला
त्यांचे उपेक्षा करी..
बायको खांद्यावरी निघाला... || १ ||
धर्म पत्नीने बेतच केला
पाहून येऊ पंढरी मेळा
संगे बिचारी आई म्हातारी
बोचके घेऊनी शिरी
बायको खांद्यावरी निघाला... || २ ||
मध्ये भेटले कुकुर स्वामी
आई बापाच्या सेवेधारी
पाहुनी सेवा त्यांची
नामी आला भानावरी..
आला भानावरी निघाला
पुंडलिक पंढरपुरी...
बायको खांद्यावरी निघाला... || ३ ||
पाहुणे ममता स्वामीजींची
जाणीव झाली कर्तव्याची
सोडूनी भार्या आई बापाच्या
पडला चरणावरी...
पडला चरणावरी निघाला
पुंडलिक पंढरपुरी..
बायको खांद्यावरी निघाला... || ४ ||
सेवेत त्यांच्या मग्न तो झाला
हात पायही चेपित बसला
पाहुनी सेवा प्रसन्न झाले
भेटीस येता हरी..
भेटीस येता हरी निघाला
पुंडलिक पंढरपुरी..
बायको खांद्यावरी निघाला... || ५ ||
मने पुंडलिक थांबा देवा
माय पित्यांची करतो सेवा
उभे विटेवर आजवरी ते
रखूमा पती श्रीहरी...
रखूमा पती श्रीहरी निघाला
पुंडलिक पंढरपुरी...
बायको खांद्यावरी निघाला... || ६ ||
* * * * *
हि भक्तीगीते पण नक्की वाचा 👇👇👇
- हाक जरा जोमान हाक Lyrics
- सोन्याची पालखी घुंगरू लावा तिला हो Lyrics
- चालली दिंडी पंढरीला Lyrics
- विठ्ठल नामाची शाळा भरली Lyrics
तर आज या पोस्टमध्ये आपण बायको खांद्यावरी निघाला पुंडलिक पंढरपुरी Lyrics बघितले. अधिक भक्ती संबंधित लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पून्हा भेट द्यायला विसरू नका.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment