पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग Lyrics | Pandurang Pandurang
नमस्कार या पोस्टमध्ये आपण पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग Lyrics बघणार आहोत.
पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग Lyrics
पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग |
बोलतो पाषाणही तोचि पांडुरंग ||
पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग || धृ ||
संसाराचे सार सांगे सुगरणीचा खोपा
निसर्गाशी नाते जपता मार्ग होई सोपा
मानवास कर्म शिकवी मुंग्यांची रांग
बोलतो पाषाणही तोचि पांडुरंग
पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग || १ ||
आव मोठा भाऊ खोटा जनात मनात
दूजा भाव कशासाठी तुझ्या माझ्यात
जनतेला घेऊनिया जातो संग संग
माणसात माणूस दिसता तोचि पांडुरंग
बोलतो पाषाणही तोचि पांडुरंग
पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग || २ ||
देवाजीची दौलत सारी आपणही त्यात
विकासात कर्म आपुले प्रकाशाची रात
करूनिया जनसेवा जाहलो अभंग
नीतीवंत नीतीवंत तोचि पांडुरंग
पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग || ३ ||
* * * * *
हे अभंग पण नक्की वाचा 👇👇👇
आज या पोस्टमध्ये आपण पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment