फडफड करते भगवी पताका Lyrics | Vithal Bhaktigeet Marathi
नमस्कार या पोस्टमध्ये आपण फडफड करते भगवी पताका Lyrics बघणार आहोत.
फडफड करते भगवी पताका Lyrics
फडफड करते भगवी पताका
दुमदुमली पंढरी...
चंद्रभागेच्या तिरी नाचतो
पुंडलिकाचा हरी... || धृ ||
विठ्ठल माझी बहीण भाऊ
विठ्ठल माझी माय...
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा
दाखवी तुझे पाय
भक्त संकटी येता भावे
दीनांचा कैवारी...
चंद्रभागेच्या तिरी नाचतो ... || १ ||
चंद्रभागेमध्ये स्नान करिता
पाप ताप ही सरते
पंढरीचा ह्यो राजा बघता
तहान भूक हरते
सुखदुःखाच्या सुटती गाठी
पुण्यत जन्मांतरी...
चंद्रभागेच्या तिरी नाचतो ... || २ ||
दिन दुबळ्यांचा हा सखा
विठ्ठल लेकुरवाळा
एका तुका ज्ञाना नामा
संत झाले गोळा
हरिनामाचा झेंडा फडकला
दुमदुमली पंढरी
चंद्रभागेच्या तिरी नाचतो ... || ३ ||
* * * * *
ही भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇👇
- जीव माझा लागला पत्र लिहिते तुजला Lyrics
- विठ्ठल नामाची शाळा भरली Lyrics
- अशी पंढरी पंढरी विठुरायाची सोन्याची नगरी
- वारी चुकवायची नाही Lyrics
तर आज या पोस्टमध्ये आपण फडफड करते भगवी पताका Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!
Post a Comment