Header Ads

जीव माझा लागला पत्र लिहिते तुजला Lyrics | Jiv Majha Lagala Patra Pahije Tula



नमस्कार या पोस्टमध्ये आपण जीव माझा लागला पत्र लिहिते तुजला Lyrics बघणार आहोत.

जीव माझा लागला पत्र लिहिते तुजला Lyrics

जीव माझा लागला पत्र लिहिते तुजला
पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला
गाव तुझे माहित नाही रे...
तुला कुठे आठवू पत्र कुठे पाठवू
पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला
गाव तुझे माहित नाही रे... || धृ ||

मला वाटते एकदा तुजला पत्र लिहावे
माया मोह प्रपंचाचे सार कळवावे
तुला कुठे आठवू पत्र कुठे पाठवू... || १ ||

श्रुती बोलती देव आहे गीता भागवतात
साधू सांगती संत बोलती देव आहे पंढरपुरात
तुला कुठे आठवू पत्र कुठे पाठवू... || २ ||

भावार्थाचा कागद घेऊनी भक्तीची ही लेखणी
देहाचा तो दत्तरखाना मानाचा तो पोस्टमन
त्याच्या हाती पत्र धाडीते विठ्ठला
तुला कुठे आठवू पत्र कुठे पाठवू... || ३ ||

साष्टांग नमस्कार देवा तुमच्या चरणाशी
तसाच नमस्कार देवा तुमच्या कुटुंबाशी
माझे पत्र वाचून घ्यावे त्याचे उत्तर लवकर द्यावे
माझ्या कोमल दात्या रे.. विठ्ठला
तुला कुठे आठवू पत्र कुठे पाठवू... || ४ ||

जीव माझा लागला पत्र लिहिते तुजला
पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला
गाव तुझे माहित नाही रे...

* * * * * *



हि भक्तीगीते पण नक्की वाचा 👇👇👇👇



आज या पोस्टमध्ये आपण जीव माझा लागला पत्र लिहिते तुजला Lyrics बघणार आहोत.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.