असा काय गुन्हा केला देवा मला सांग रे Lyrics | Asa Kay Gunha Kela Deva Mala Sang Re Lyrics
नमस्कार या पोस्टमध्ये आपण असा काय गुन्हा केला देवा मला सांग रे Lyrics बघणार आहोत.
असा काय गुन्हा केला देवा मला सांग रे Lyrics | Marathi
नको दुःख देऊ देवा,
सुखी जीवनात रे
असा काय गुन्हा केला,
देवा मला सांग रे || धृ ||
आई गेली बाबा गेले, कुणी ना कुणाचे
अपराधी जीवन माझे, वाली नाही त्याचे
कुणाकडे जाऊ देवा, तूच मार्ग दाव रे
असा काय गुन्हा केला,
देवा मला सांग रे || १ ||
असे वाटते मला पंढरीला जावे
संतांच्या मागे मागे भजन करावे
तुझ्या भजनाची गोडी तूच मला लाव रे
असा काय गुन्हा केला,
देवा मला सांग रे || २ ||
शिवदास सांगे संतांची वाणी
चंद्रभागा आई माझी
पिऊ तिचे पाणी अमृताचा घोट रे
घोटामृताचा देवा तू पाज रे
असा काय गुन्हा केला,
देवा मला सांग रे || ३ ||
* * * *
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- सावळ्या विठ्ठला तुझे रे मला वेड लागले
- आई नाही बाप नाही आधार दे ना कोणी
- जीवाला विसावा दुखी संसारातून
- पांडुरंगा विठ्ठला मायबापा विठ्ठला गीत
या पोस्टमध्ये आपण असा काय गुन्हा केला देवा मला सांग रे Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment