Header Ads

आली आषाढी एकादशी Lyrics | Ali Ashadhi Ekadashi



नमस्कार या पोस्टमध्ये आपण आली आषाढी एकादशी Lyrics बघणार आहोत.

आली आषाढी एकादशी Lyrics | Marathi

आली आषाढी एकादशी
दिंड्या चालल्या पंढरीसी
सखुबाई बोले विठ्ठलाशी
कशी येऊ सांगा.. सांगा पांडुरंगा || धृ ||

भीमा आणि चंद्रभागा
दोन्ही वाहत असे गंगा
आंघोळीला नाही जागा
कशी येऊ सांगा.. सांगा पांडुरंगा || १ ||

चंद्रभागेला आला पुर
कैसी जाऊ पैल तीरं
जीवा लागे हुरहूर
कशी येऊ सांगा.. सांगा पांडुरंगा || २ ||

सखुबाई बांधली खांबाशी
कुलूप लाविले दाराशी
देव आले सोडण्याशी
कशी येऊ सांगा.. सांगा पांडुरंगा || ३ ||

एकनाथाचा ऐकून गाथा
तुकोबा म्हणे धाव आता
विठ्ठल चरणी माझ्या नाथा
कशी येऊ सांगा.. सांगा पांडुरंगा || ४ ||

आली आषाढी एकादशी
दिंड्या चालल्या पंढरीसी
सखुबाई बोले विठ्ठलाशी
कशी येऊ सांगा.. सांगा पांडुरंगा || धृ ||

* * * * *




हि भक्तीगीते पण नक्की वाचा  👇👇👇👇



आज या पोस्टमध्ये आपण आली आषाढी एकादशी Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.