चालली दिंडी पंढरीला Lyrics | Chalali Dindi Pandharila
नमस्कार या पोस्टमध्ये आपण चालली दिंडी पंढरीला Lyrics बघणार आहोत. प्रल्हाद शिंदे यांनी हे गीत गायलेल आहे.
चालली दिंडी पंढरीला Lyrics | Marathi
चालली दिंडी पंढरीला..
पंढरीला.. हो पंढरीला..
आषाढी एकादशीला
चला हो जाऊ पंढरीला.. || धृ ||
नाम घेता चला आता पंढरीची वाट
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
डोळ्याने पहावा चंद्रभागेचा तो घाट..
पंढरीची वाट...
नाम घेता चला आता पंढरीची वाट
चालली दिंडी पंढरीला..|| १ ||
ऋतू दर्शनाला सारे
रूप डोळा भरून पाहूया
दंग होऊनी भजनी रंगू या
भक्ती भावाने त्याला अळवूया
यात्रेसाठी भाविक येती
गर्दी होते दाट... पंढरीची वाट
नाम घेता चला आता.. पंढरीची वाट
चालली दिंडी पंढरीला..|| २ ||
पुंडलिक भक्त होऊनी गेला
आई-वडिलांच्या सेवेतच रमला
देव स्वर्गीचा भूवरी आणला
कटी कर ठेऊनी उभा राहिला
स्पर्श होता चरणांचा धन्य झाली रीत.. पंढरीची वाट
नाम घेता चला आता.. पंढरीची वाट
चालली दिंडी पंढरीला..|| ३ ||
अशी ही पुण्यभूमी संतांची
तुकया चोखा नामदेवाची
ओवी गाणाऱ्या त्या जनाईची
थोरवी आहे कान्होपात्रेची
अखंड नामाचा चाले गजर अगाध
पंढरीची वाट...
नाम घेता चला आता.. पंढरीची वाट
चालली दिंडी पंढरीला..|| ४ ||
डोळ्याने पहावा चंद्रभागेचा तो घाट..
पंढरीची वाट...
नाम घेता चला आता पंढरीची वाट
चालली दिंडी पंढरीला...
* * * * *
हे अभंग पण नक्की वाचा 👇👇👇
- विठ्ठल नामाची शाळा भरली Lyrics
- एक वाट जाई मंदिराकडे Lyrics
- सुख देवासी मागावे दुःख देवाला सांगावे Lyrics
- पांडुरंगा विठ्ठला मायबापा विठ्ठला गीत
आज या पोस्टमध्ये आपण चालली दिंडी पंढरीला Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment