Header Ads

सोड ना रे कान्हा आता अबोला Lyrics | Sod Na Re Kanha Abola Gavlan Song



नमस्कार या पोस्टमध्ये आपण सोड ना रे कान्हा आता अबोला Lyrics बघणार आहोत.


सॉंग - सोड ना रे कान्हा
लिरिक्स - ओंकार भुवन
सिंगर - तृप्ती जाधव
म्युझिक - संदीप वसंत पालेकर


सोड ना रे कान्हा आता अबोला Lyrics

सोड ना रे कान्हा आता अबोला
वेड लावले तू माझ्या मनाला
एकदा भेटशील का ?
लाडक्या तुझ्या या राधेला... || धृ ||

भेट ही आपली कान्हा अशी वृंदावनी
गुंजता सूर मुरलीचे जाते हरवून
नटखट खट्याळ तू माझा रे कान्हा
नको तुझा कोणता बहाना पुन्हा
चल गोकुळात खेळूया रासलीला
एकदा भेटशील का ? .... || १ ||

कान्हा तुझ्या भेटीची आस मला लागली
युगे युगे मी मुकुंदा वाट तुझी पाहिली
हो नजरेच्या या खुणा जाते सारं खुणावूनी
वेडावले मन माझे कान्हा तुला पाहुनी
व्यथा ही मनाची सांगू मी कुणाला
एकदा भेटशील का ? .... || २ ||

सोड ना रे कान्हा आता अबोला
वेड लावले तू माझ्या मनाला
एकदा भेटशील का ?
लाडक्या तुझ्या या राधेला... ||

* * * * *




या गवळणी पण नक्की वाचा 👇👇👇




आज या पोस्टमध्ये आपण सोड ना रे कान्हा आता अबोला Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.