Header Ads

माझी घागर गेली फुटून गवळण Lyrics | Majhi Ghagar Geli Futun Gavlan



नमस्कार आज या पोस्टमध्ये आपण माझी घागर गेली फुटून गवळण Lyrics बघणार आहोत.

माझी घागर गेली फुटून गवळण Lyrics | Marathi

कृष्णा माझ्याकडे पाहू नको रे
माझी घागर गेली फूटून
घागर गेली.. घागर गेली
घागर गेली फुटून...
कृष्णा माझ्याकडे पाहू नको रे
माझी घागर गेली फूटून.. || धृ ||

काचेचे न्हाने गुलाबाचं पाणी
न्हानीत न्हाते बसून
ओ.. न्हानीत न्हाते बसून
अरे कृष्णा माझ्याकडे पाहू नको रे.. || १ ||

भिंती आड चढूनी आला
माझ्या जवळी
वाकुनी पाहतो दडून
अरे कृष्णा माझ्याकडे पाहू नको रे.. || २ ||

एका जनार्दनी प्रीतीची राधा
हरिजनी चालली जपून
अरे कृष्णा माझ्याकडे पाहू नको रे.. || ३ ||

घागर गेली घागर गेली
घागर गेली फुटून...
कृष्णा माझ्याकडे पाहू नको रे
माझी घागर गेली फूटून.. ||




या गवळणी पण नक्की वाचा 👇👇👇👇



तर आज या पोस्टमध्ये आपण माझी घागर गेली फुटून गवळण Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!! 🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.