Header Ads

नेसली पैठणची साडी गवळण Lyrics | Nesali Paithanachi Sadi Gvalan



नमस्कार या पोस्टमध्ये आपण नेसली पैठणची साडी गवळण Lyrics बघणार आहोत.

नेसली पैठणची साडी गवळण Lyrics

दही दूध घेऊन विकण्या निघाली
गवळण मी वेडी नेसली पैठणी साडी.. || धृ ||

येता जाता रस्त्यावरती
फिरू नको तू आमूच्या भोवती
भर रस्त्यावर घेऊनी मजला
करू नको खोडी
नेसली पैठणची साडी ... || १ ||

माठावरती माठ दुधाचा
अवघड बाई घाट मथुरेचा
चढता चढता शिणले बाई
करू नको खोडी..
नेसली पैठणची साडी.. || २ ||

शिरजोरीने झटतो अंगा
चावट बाई तो श्रीरंगा
बर रस्त्यावर घेऊनी मजला
करू नको खोडी..
नेसली पैठणची साडी.. || ३ ||

दास अर्जुना विनवे हरीला
वेड लाविले तू गोकुळाला
माया तुझी कृष्ण कन्हैया ची
राहू दे थोडी..
नेसली पैठणची साडी.. || ४ ||

* * * * *



या गवळणी पण नक्की वाचा 👇👇👇


तर आज या पोस्टमध्ये आपण नेसली पैठणची साडी गवळण Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.