देखण्या रुपाची राधा आहे गवळ्याची गवळण Lyrics | Marathi Gavlan Lyrics
नमस्कार या पोस्टमध्ये आपण देखण्या रुपाची राधा आहे गवळ्याची गवळण Lyrics बघणार आहोत.
देखण्या रुपाची राधा आहे गवळ्याची गवळण Lyrics
देखण्या रूपाची राधा आहे गवळ्याची
माठ घेऊन ही जाते डोईवर
सांग येशील का माझ्याबरोबर राधीके
सांग ना येशील का माझ्याबरोबर || धृ ||
गोड गालामध्ये हसते ही मला पाहताना
तिला बघताच जीव माझा होतो खाली वर
अशी जाऊ नको ग दूरवर
सांग येशील का माझ्याबरोबर || १ ||
तुझी न माझी भेट राधे युगायुगाची
साथ दिली राधिका जन्मा जन्माची
तुला बघताच जीव होतो माझा खाली वर
अशी जाऊ नको ग दूरवर
सांग येशील का माझ्याबरोबर || २ ||
तुझ्याविना मला करमत नाही
देतात लोक सारे गोकुळात ग्वाही
तुला बघताच जीव होतो माझा खाली वर
अशी जाऊ नको ग दूरवर
सांग येशील का माझ्याबरोबर || ३ ||
एका जनार्दनी तू ग गवळ्याची राधा
बघताच तुला माझा जीव गेला भरून
तुला बघताच जीव होतो माझा खालीवर
सांग येशील का माझ्याबरोबर || ४ ||
देखण्या रूपाची राधा आहे गवळ्याची
माठ घेऊन ही जाते डोईवर
सांग येशील का माझ्याबरोबर राधीके
सांग ना येशील का माझ्याबरोबर || धृ ||
* * * * *
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- गजऱ्यावर गजरा गवळणीच्या नजरा गवळण
- घागर घेऊन निघाली पाण्या गवळण Lyrics
- राधे तुला पुसतो घोंगडीवाला ग गवळण
- गवळण सांगती गवळणीला
आज या पोस्टमध्ये आपण देखण्या रुपाची राधा आहे गवळ्याची गवळण Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment