घागर घेऊन निघाली पाण्या गवळण Lyrics | Ghagar Gheun Nighali Pnaya Gavlan Lyrics
नमस्कार या पोस्टमध्ये आपण घागर घेऊन निघाली पाण्या गवळण Lyrics बघणार आहोत.
घागर घेऊन निघाली पाण्या गवळण Lyrics | Marathi
घागर घेऊन घागर घेऊन
घागर घेऊन निघाली
पाण्या गवळण
ठुमकत ठुमकत चालली डोलत
वाऱ्याच्या तोलान
वाऱ्याच्या ग तोलान || धृ ||
हसत खुदु खुदु, मोडीत डोळे
मनी आठवी कृष्णाचे चाळे
लगबगीने प्रभात काळी
आली नंद अंगणी
घागर घेऊन निघाली पाण्या गवळण ||१||
किती खोड्या करी श्रीहरी
जाईन मी लवलाई
सांगीन यशोदा माई
धरू नको बाबा पदर कन्हैया
घागर घेऊन निघाली पाण्या गवळण ||२||
आडवी बाई उभा शारंगधर
सोड सोड कान्हा जाऊ दे लवकर
एका जनार्दनी जानी
न कळे या गौळणी
घागर घेऊन निघाली पाण्या गवळण ||३||
ठुमकत ठुमकत चालली डोलत
वाऱ्याच्या तोलान
वाऱ्याच्या ग तोलान || धृ ||
* * * * *
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- Radha Ani To Murari Lyrics
- पायी पैंजण पैंजण वाजती गवळण Lyrics
- बघता बघता राधे तुला कसतरी होतय मला गवळण Lyrics
- खेळाचे भय वाटे गवळण Lyrics
आज या पोस्टमध्ये आपण घागर घेऊन निघाली पाण्या गवळण Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप !!!!!!
Post a Comment