Header Ads

येते माघारी जरा थांब रे कान्हा गवळण Song Lyrics | Yete Maghari Jara Thamb



नमस्कार या पोस्टमध्ये आपण येते माघारी जरा थांब रे कान्हा गवळण Song Lyrics बघणार आहोत.


सॉंग - येते माघारी जरा थांब
लिरिक्स - संदीप मोहिते
सिंगर - राज कातकर, रिया बैकर
म्युझिक - सुयोग साळवी




येते माघारी जरा थांब रे कान्हा गवळण Song Lyrics | Marathi

येते माघारी जरा थांब रे कान्हा
येते माघारी जरा थांब..
येते माघारी येते माघारी
येते माघारी जरा थांब... || धृ ||

अशी जाऊ नको दूर तू येना समोर तू
जाऊ नको अशी तू लांब ग राधे
जाऊ नको अशी तू लांब

दही दूध लोणी घेऊनी निघाली
मथुरेच्या बाजारी चालली निघूनी
करिते विनवणी जाते बाजारी
अडवू नको रे माझी वाट... (*२)
येते माघारी जरा थांब रे कान्हा.... || १ ||

सोन्याची नथनी हरवून गेली
घामांच्या धारांनी न्हाहून गेली
नटखट भारी तू गिरीधारी
अडवू नको रे माझी वाट रे कान्हा
अडवू नको रे माझी वाट..
येते माघारी जरा थांब रे कान्हा.... || २ ||

हो तू राधा गोरी सावळा श्रीहरी
तुझी माझी जोडी दिसे साजिरी
प्रीतही आपली जन्मोजन्मीची
जाऊ नको ग राधे लांब.. ग राधे
जाऊ नको अशी लांब
येते माघारी जरा थांब रे कान्हा.... || ३ ||

* *  * * *



या गवळणी पण नक्की वाचा 👇👇👇




आज या पोस्टमध्ये आपण येते माघारी जरा थांब रे कान्हा गवळण Song Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!! 🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.