Kanhavin Radha Gavlan Song Lyrics | Sakshi Kokate | कान्हावीण राधा गवळण
नमस्कार या पोस्टमध्ये आपण Kanhavin Radha Gavlan Song Lyrics बघणार आहोत. आनंद शिंदे यांनी हे गीत गायलेल आहे.
Kanhavin Radha Gavlan Song Lyrics | Marathi
तुझी आठवण छळते मोहना
सांग रे कान्हा काय घडला गुन्हा
कर भेटीचा नवा बहाणा
कान्हावीण राधा अन्
राधेवीण कान्हा कोण करील कल्पना...|| ध्रु ||
तुझ्यासाठी आतुर मी
भावनांचा मोर पिसारा ...
साद घाली प्रेमाची कालिंदिचा
रम्य किनारा... नित्य नेहमी वाट पाही
वृंदेचा रानवारा ..
सावराया ये रे माझ्या
आयुष्याचाहा पसारा ..
भुलले तुला मी..
भाळले तुला मी..
तुझ्या माझ्या प्रेमाचे
मृगजल न्हवते ना ?
कान्हावीण राधा अन्
राधेवीण कान्हा कोण करील कल्पना...|| 1 ||
विसरून गेलास परवा
शेला नदीकाठी..
भेटीची ती खूण होती का रे
माझ्यासाठी ..
नाद वेणूचा अलवार देई
चैतन्याची मिठी ..
सारथी तू माझा असता
उरली कुणाची ना भीती..
जाणते तुला मी
मानते तूला मी..
उमलूनी येती
अशा माझ्या प्रेम भावना
कान्हावीण राधा अन्
राधेवीण कान्हा कोण करील कल्पना..|| २ ||
* * * * *
या गवळणी पण नक्की वाचा 👇👇👇
आज या पोस्टमध्ये आपण Kanhavin Radha Gavlan Song Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment