Header Ads

Padar Hari Re Asa Dharu Nako Lyrics | पदर हरी रे असा गवळण



नमस्कार या पोस्टमध्ये आपण Padar Hari Re Asa Dharu Nako Lyrics बघणार आहोत.

Padar Hari Re Asa Dharu Nako Lyrics

पदर हरी रे असा ओढू नको
भरला घडा माझा फोडू नको || धृ ||

जगा निराळा वाटे मजला खेळ तुझा श्रीरंगा
येता जाता झोकून बघतो घालीतोसी पिंगा
लाज जनाची तू सोडू नको
भरला घडा माझा फोडू नको || १ ||

बदनाम झाले मी तुझ्या संगे,प्रित तुझी ही न्यारी
तुझ्या न माझ्या प्रेमाची रे गोकुळी चर्चा झाली
कान्हा असे मज बोलू नको
भरला घडा माझा फोडू नको || २ ||

सुरज मुरलीचे ऐकून कानी,
करसी धुंद तू मजला
मी गवळ्याची सासरवाशीन
कळेना कसे तुजला
ठेव तू मुरली काढू नको
भरला घडा माझा फोडू नको || ३ ||

एका जनार्दनी गवळण राधा
दासी तुझ्या चरणाची
कशी कळेना माया माझी, माझ्या अंतकरणाची
मंजुळ मुरली छेडू नको
भरला घडा माझा फोडू नको || ४ ||

* * * * *

कृष्णाच्या गवळणी lyrics


हे पण नक्की वाचा 👇👇👇👇



आज या पोस्टमध्ये आपण Padar Hari Re Asa Dharu Nako Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.