Header Ads

कान्हा पदराला धरू नको सोड गवळण | Kanha Padrala Dharu Nako Sod Gavlan Lyrics



नमस्कार या पोस्टमध्ये आपण कान्हा पदराला धरू नको सोड गवळण बघणार आहोत.

कान्हा पदराला धरू नको सोड गवळण | Marathi

कान्हा रे माझ्या पदराला धरू नको सोड
पदराला धरू नको मस्करी करू नको
रस्ता माझा सोड
कान्हा रे माझ्या पदराला धरू नको सोड || धृ ||

गोकुळची मी गवळण राधा |
दह्या दुधाचा माझा धंदा ||
भर रस्त्यामध्ये मला आडवीशी |
वाईट तुझी खोड ||
कान्हा रे माझ्या ... ||१ ||

नाना परीचा हा शिनगार आमूचा |
सर्वा आगळा थाट राधेचा ||
टकमक पाहू नको, नजर लावू नको |
हात माझा सोड |
कान्हा रे माझ्या ... ||२ ||

मी तर गवळण भोळी भाळी |
पिवळी साडी पिवळी चोळी ||
खडे मारू नको, रंग उडवू नको ||
सवय तुझी सोड ||
कान्हा रे माझ्या ... ||३ ||

दास म्हणे हा राधिकेला |
गवळणी चा हा घेऊनी मेळा ||
मथुरेला जाऊ नको, बोरस नेऊ नको ||
कृष्णाशी नातं जोड |
कान्हा रे माझ्या ... || ४ ||

* * * *

कृष्णाच्या गवळणी lyrics


हे पण नक्की वाचा 👇👇👇



आज या पोस्टमध्ये आपण कान्हा पदराला धरू नको सोड गवळण बघणार आहोत.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!! 🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.