गेला हरी कुण्या गावा Lyrics | Gela Hari Kunyaa Gava Gavlan Lyrics
नमस्कार या पोस्टमध्ये आपण गेला हरी कुण्या गावा Lyrics बघणार आहोत.
गेला हरी कुण्या गावा Lyrics
गेला हरी कुण्या गांवा
कुणाला नाही कसा ठावा
घुमेना गोकुळात पावा
ग उडतो डोळा, डोळा बाई डावा || धृ ||
रमती कुन्जवनी बाला
असावा तिथे नंदलाला
कुणी जा आना मुकुंदाला
जीवा हा वेडा पिसा झाला
हरिचा शोध कुणी लावा
ग उडतो डोळा, डोळा बाई डावा... || 1 ||
कुणाशी केला जरी दंगा
मला येऊन झनि सांगा
त्यास दाखवीन मी इंगा
नका पण लपवू श्रीरंगा
माझा श्याम मला दावा
ग उडतो डोळा डोळा बाई डावा || 2 ||
कधी न झाली आज वरती
ग नजरे आड कृष्ण मूर्ति
असता गोपी सदा भवति
कशी मग पडली भूल पुरती
हरी चा किती करू धावा
ग उडतो डोळा डोळा बाई डावा || 3 ||
राधा घरात जर नाही
कोणी जा संजयास पाहि
वडा खाली यमुने दोही
धरुनि आणा गे लवलाहि
त्याचा कढला कृष्ण कावा
उडतो डोळा बाई डावा || 4 ||
गेला हरी कुन्या गांवा
कुणाला नहीं कसा ठावा
घुमेना गोकुळात पावा
ग उडतो डोळा डोळा बाई डावा || ध्रु ||
☙ ☙ ☙ ☙
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- काय करावे या हरीला Lyrics
- रुतला पायी काटा गवळण Lyrics
- हरी बांगड्या विकायला आला गवळण
- आई ग आई नाही खाल्ली म्या माती
आज या पोस्टमध्ये आपण गेला हरी कुण्या गावा Lyrics बघितले. अधिक मराठी लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट दयायला विसरू नका.
पोस्ट शेवटपर्यंत वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद !!!!!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment