हरी बांगड्या विकायला आला गवळण | Hari Bangadya Vikayala Ala Gavlan
नमस्कार, या पोस्टमध्ये आपण हरी बांगड्या विकायला आला गवळण बघणार आहोत.
हरी बांगड्या विकायला आला गवळण
रुप घेऊनी कासार झाला,
हरी बांगड्या विकाया आला
बाई खट्याळ हा नंदलाला
हरी बांगड्या विकाया आला ||धृ ||
नक्षीदार बांगड्या हिऱ्या मोत्या परी
रंगीबेरंगी त्या बांगड्यांच्या सरी ..
चुडा भरूनी घ्या पोरींनो म्हणाला ...
हरी बांगड्या विकाया आला
बाई खट्याळ हा नंदलाला
हरी बांगड्या विकाया आला. || १ ||
असा भरला मला हरीने चुडा
त्याच्या भक्तीमध्ये जीव झाला वेडा
कुठल्या किमतीत दाम मोजू त्याला
हरी बांगड्या विकाया आला
बाई खट्याळ हा नंदलाला
हरी बांगड्या विकाया आला. || २ ||
कधी उजव्या हाती, कधी डाव्या हाती
न्याहाळीले हरी त्या,
मी बांगड्या किती
मन मोहून उत्कंप केला
हरी बांगड्या विकाया आला
बाई खट्याळ हा नंदलाला
हरी बांगड्या विकाया आला. || ३ ||
☘ ☘ ☘
हे पण वाचा 👇👇👇
- अरे अरे नको नको गवळण Lyrics
- सांगते देवा तुला याच घडीला गवळण Lyrics
- गौळण मराठी लिरिक्स
- Kanha Vajavi Bansuri Lyrics Marathi
तर आज आपण हरी बांगड्या विकायला आला गवळण बघितले. अन्य मराठी लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला भेट देत रहा.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!! 🙏🙏🙏
Post a Comment