Header Ads

नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट म्हणजे काय? | Non-Creamy Layer Certificate In Marathi



मित्रांनो नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट बद्दल आपण नेहमी ऐकतो, पण तूम्हाला माहीत आहे का ? नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट म्हणजे नेमकं काय आहे. कशासाठी आपल्याला हे सर्टिफिकेट लागतं? तुम्हाला पण याबद्दल जाणून घ्यायचे असेल, तर काळजी करू नका नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट म्हणजे काय? ते आपण या लेखामध्ये सोप्या भाषेमध्ये जाणून घेणार आहोत.

नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटला "नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र" असेही म्हणतात. हे प्रमाणपत्र भारतातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील व्यक्तींना जारी केले जाते. पण त्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न एका वार्षिक 8 लाख रुपयांपेक्षा कमी असायला हवे.

हे प्रमाणपत्र सामान्यतः शासकीय नोकऱ्या, परदेशी शिक्षण, व्हिसा अर्ज, तसेच विविध महत्वाच्या वैध प्रक्रियांसाठी लागते. कोणासाठी हे आवश्यक असते आणि ते मिळवण्यासाठी काय करावे, त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत हे सर्व आपण आज बघणार आहोत. चला तर मग वळूया लेखाकडे -


नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट म्हणजे काय?

नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या विरोधात कोणताही गुन्हा नोंदवलेला गेला नाहीये, किंवा ती व्यक्ती कोणत्याही गुन्हेगारी कारवायांमध्ये सामील नाही, हे पोलीस खात्याकडून प्रमाणित करणारे हे अधिकृत दस्तऐवज असते. याला मराठीत "गुन्हेगारी स्वरूप नसल्याचे प्रमाणपत्र" किंवा "अपराधिक प्रवृत्ती नसल्याचे प्रमाणपत्र" (Non-Creamy Layer Certificate) असेही म्हणतात.

नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटचा उपयोग विशेषतः जेव्हा एखादी व्यक्ती शिक्षण, नोकरी किंवा स्थायिक होण्यासाठी परदेशात जात असते, तेव्हा केला जातो. याच्या सहाय्याने संबंधित देशाच्या अधिकाऱ्यांना खात्री मिळते की व्यक्तीचा आपराधिक इतिहास नाही. हे सर्टिफिकेट पोलिस विभाग किंवा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत दिले जाते. अर्जदाराने स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये अर्ज सादर करावा लागतो, जिथून त्याच्या पार्श्वभूमीची तपासणी केली जाते. पोलिस खात्याकडून संबंधित व्यक्तीच्या विरोधात कोणतीही तक्रार, गुन्हा किंवा तपास प्रलंबित नाही, हे सुनिश्चित केल्यानंतरच हे प्रमाणपत्र दिले जाते.


हे प्रमाणपत्र का आवश्यक असते?

नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटचा उपयोग आपल्याला खालील कारणांसाठी होतो:

1) परदेशी शिक्षणासाठी अर्ज करताना

2) परदेशात नोकरी मिळवण्यासाठी किंवा स्थायिक होण्यासाठी

3) काही शासकीय किंवा खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी

4) व्हिसा, ग्रीन कार्ड किंवा नागरिकत्व अर्ज करताना

5) काही शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी



सर्टिफिकेट मिळवण्याची प्रक्रिया  -


1. अर्ज: 
स्थानिक पोलिस ठाणे किंवा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात अर्ज करावा लागतो. अनेक राज्यांमध्ये ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने देखील उपलब्ध आहे. ऑनलाइन पद्धती बद्दल आपण खाली विस्ताराने बघू.

2. आवश्यक कागदपत्रे:

१.ओळखीचा पुरावा (उदा. आधार कार्ड, पासपोर्ट)

२. रहिवासी पुरावा

३. पासपोर्ट साइज फोटो

४. अर्ज पत्र


3. पार्श्वभूमी तपासणी: 
पोलिसांकडून विभाग संबंधित व्यक्तीच्या पार्श्वभूमीची चौकशी केली जाते. यामध्ये स्थानिक गुन्हेगारी रेकॉर्ड तपासले जातात.


4. प्रमाणपत्र निर्गम:
तपासणीनंतर जर कोणतीही गुन्हेगारी नोंद सापडली नाही, तर काही दिवसांत नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जारी केले जाते. आणि ते सर्टिफिकेट आपल्याला मिळते.



      नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटसाठी ऑफलाइन अर्ज करणे शक्य नसल्यास तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून देखील हे प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने मिळवू शकता. ऑनलाइन प्रक्रियेबद्दल माहिती आपण खाली बघू.

ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया :


1. संबंधित पोर्टलवर लॉगिन करा:

महाराष्ट्रासाठी: https://pcs.mahaonline.gov.in
केंद्र सरकारसाठी (पासपोर्ट/व्हिसा संबंधित): 

2. नवीन वापरकर्ता नोंदणी (Register) करा:

तुमचं नाव, ईमेल, मोबाईल नंबर व ओटीपी (OTP) टाकून खाते तयार करा.

3. लॉगिन करा:

युजरनेम व पासवर्डने लॉगिन करून पुढे जा.

4. 'Police Clearance Certificate' / 'Non-Criminal Certificate' निवडा:
उपलब्ध सेवांमधून योग्य सेवा निवडा.

5. अर्ज भरा:

तुमचे पूर्ण नाव, जन्मतारीख, सध्याचा व कायमचा पत्ता, पोलिस स्टेशनची माहिती इत्यादी माहिती तुम्हाला भरावी लागेल.

6. कागदपत्रे अपलोड करा:
  • आधार कार्ड
  • रहिवासी पुरावा
  • पासपोर्ट साइज फोटो
  • इतर आवश्यक कागदपत्रे (जसे की पासपोर्ट असल्यास त्याची झेरॉक्स)

7. शुल्क भरा:

काही सेवांसाठी ₹100 ते ₹500 दरम्यान ऑनलाइन फी असते. ती नेट बँकिंग / कार्डने भरावी लागते.

8. पावती डाउनलोड करा:

अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाची पावती किंवा संदर्भ क्रमांक मिळेल.

9. पार्श्वभूमी तपासणी:

स्थानिक पोलीस स्टेशनमधून तुमच्या पार्श्वभूमीची तपासणी केली जाईल. पोलिसकडून तुम्हाला फोन/संदेश येऊ शकतो.

10. प्रमाणपत्र प्राप्ती:

काही दिवसांत (साधारणतः 7 ते 15 दिवसांत) प्रमाणपत्र ईमेल / पोर्टलवरून डाउनलोड करता येते किंवा पोस्टाने मिळते.

या प्रमाणपत्राची आवश्यकता

हे प्रमाणपत्र संबंधित संस्थांना हे दर्शवण्यासाठी उपयोगी ठरते की अर्जदार हा कायद्याचे पालन करणारा, जबाबदार आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेला नागरिक आहे.

नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे फक्त एक कागदपत्र नाही, तर ते एखाद्या व्यक्तीच्या चारित्र्याची, जबाबदारीची आणि कायद्याबद्दल असलेल्या आदराची खात्री असते. आजच्या काळात अनेक संस्था आणि देश अर्जदाराच्या पार्श्वभूमीची खातरजमा करण्यासाठी हे प्रमाणपत्र अनिवार्य मानतात.



[ महत्त्वाची टीप  ↓↓↓
  • माहिती व सेवा राज्यनिहाय थोडी बदलू शकते. त्यामुळे आपल्या राज्याच्या अधिकृत पोर्टलवर किंवा पोलीस वेबसाईटवर अद्ययावत माहिती तपासा.
  • आवश्यक असल्यास स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये भेट देणे फायद्याचे ठरू शकते. ]


हे लेख पण जरूर वाचा 👇👇👇

निष्कर्ष -

आज या लेखामधून आपण बघितले कि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट म्हणजे काय? तर हे एक अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे, जे कोणत्याही व्यक्तीच्या गुन्हेगारीमुक्त वर्तनाची आणि सामाजिक जबाबदारीची साक्ष देते. त्यामुळे जे लोक परदेशात संधी शोधत आहेत किंवा शासकीय नोकऱ्यांच्या प्रयत्नात आहेत, त्यांनी वेळेत हे प्रमाणपत्र मिळवणे आवश्यक आहे. हे केवळ एक फॉर्मॅलिटी नसून, समाजात आपली स्वच्छ प्रतिमा दर्शवण्याचे साधन आहे.

तर लेख पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.