Header Ads

मोक्का कायदा म्हणजे काय | Mokka Kayda Mhanje Kay In Marathi



नमस्कार या पोस्टमध्ये आपण मोक्का कायदा म्हणजे काय बघणार आहोत. मोक्का कायद्याबद्दल आपण नेहमी ऐकतो पण हा कायदा म्हणजे नक्की काय असतो ते बघणार आहोत.हा कायदा सामान्य गुन्हेगारांसाठी नसून तो मोठ्या गुन्हेगारी टोळी आणि गंभीर गुन्हेगारांसाठी बनवण्यात आलेला कायदा आहे.जसे - माफिया गँग, खंडणीखोर टोळ्या, किंवा दहशतवादी गट.
गुन्हेगारांना शोक्ष देण्यासाठी एक चांगला कायदा जरी हा असला तरी त्याचा काही ठिकाणी गैरवापर होताना हि बघायला मिळतो. या कायद्याबद्दल विस्तृतपणे आपण खाली जाणून घेऊ.


मोक्का कायदा म्हणजे काय ?

या शब्दातील मोक्का म्हणजे काय तर Maharashtra Control of Organised Crime Act (MOCCA Act) चे स्टार्टींग लेटर्स आहेत. म्हणजेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, 1999. महाराष्ट्र सरकारने 1999 मध्ये हा कायदा लागू केला होता. हा कायदा महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये लागू आहे.

➤➤ हा कायदा मुख्यतः संघटित गुन्हेगारीला किंवा ज्याला आपण गुन्हेगारी टोळ्या (गॅंगवॉर ) म्हणतो. त्यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी लागू करण्यात आला होता. मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या                     शहरात वाढणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर नियंत्रण ठेवणे हा त्यामागील मुख्य उद्देश होता.

  या कायद्याबद्दल मुख्य गोष्ट म्हणजे हा कायदा सामान्य गुन्हेगारीपेखा कडक आहे. यानुसार गुन्हेगाराला तुरुंगात ठेवण्याची मुदत जास्त असते आणि न्यायालयीन प्रक्रियांपूर्वीही अनेक                   अनेक मर्यादा लावल्या जातात. या कायद्याअंतर्गत आरोपींना सहज जामीन मिळत नाही.

➤ त्यासोबत आरोपीविरुद्ध गोपनीय माहिती, टेलीफोन टॅपिंग आणि इतर इलेक्ट्रॉनिक पुरावे न्यायालयात ग्राह्य धरले जाऊ शकतात.

➤ मोक्का कायद्याचा उद्देश फक्त एका व्यक्तीला शिक्षा देण्याचा नसून संपूर्ण टोळी, गँग किंवा संघटित गटाचा बीमोड करणे आहे. त्यामुळे या कायद्याचा उपयोग सामान्य गुन्ह्यांपेक्षा गंभीर आणि मोठ्या प्रमाणातील गुन्हेगारीसाठी केला जातो.

➤ मात्र, या कायद्याचा गैरवापर होण्याचीही भीती व्यक्त केली जाते. काही वेळा निष्पाप नागरिकांवरही मोक्का लावल्याचे उदाहरणे आढळून आली आहेत. त्यामुळे या कायद्याचा वापर करताना पुरावे, तपास आणि न्याय यामध्ये संतुलन ठेवणे आवश्यक आहे.


➤ साध्या शब्दात सांगायचं तर, जे गुन्हे गट करून, योजना आखून आणि वारंवार गंभीर गुन्हे करतात, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी मोक्का कायदा वापरला जातो.

➤ या कायद्याअंतर्गत  पोलिसांना:गुन्हेगाराला लवकर जामीन न देता तुरुंगात ठेवण्याचे अधिकार  मिळतात.

➤ फोन टॅपिंगसारख्या पद्धतीने पुरावे गोळा करता येतात. गुन्हेगारी गटाची साखळी तोडण्यासाठी कठोर कारवाई करता येते.


मोक्का कायद्याचे उपयोग (Uses):

  • गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई – गँग, माफिया किंवा टोळी एकत्र येऊन गुन्हे करत असल्यास, मोक्का लावून संपूर्ण गटावर कारवाई करता येते.
  • वारंवार गुन्हे करणाऱ्यांवर कठोर उपाय – एखादी व्यक्ती पुन्हा पुन्हा गुन्हे करत असेल तर, सामान्य कायद्यांपेक्षा कठोर शिक्षा देता येते.
  • खंडणी, दहशत, गैरव्यवहार यावर नियंत्रण – खंडणी मागणं, लोकांना धमकावणं, बेकायदेशीर व्यवसाय चालवणं यांसाठी मोक्का उपयुक्त ठरतो.
  • पोलिसांना अधिक तपासाचे अधिकार – पोलिसांना फोन टॅपिंग, गोपनीय माहिती गोळा करणं, आणि आरोपीला लवकर जामीन न देता चौकशी करणं शक्य होतं.
  • गुन्हा दाखल झाल्यावर 180 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल न झाल्यास आरोपीला जामीन मिळू शकतो.
  • आरोपी गेल्या 10 वर्षांत दोन किंवा त्यापेक्षा जास्त संघटित गुन्ह्यात सहभागी असल्यास, त्याच्यावर मोक्का लागू होऊ शकतो.


मोक्का कायद्याचे फायदे (Benefits):

  • अशा प्रकारच्या कायद्यांमुळे गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण होते.
  • संघटित गुन्हेगारी कमी होते.
  • सामान्य लोकांना सुरक्षित वाटते.
  • पोलिसांना गुन्ह्याचा मुळापर्यंत पोहोचता येतं.
  • गुन्हे करणाऱ्या टोळ्यांचा संपूर्ण नाश करता येतो.


समारोप -

तर आज या पोस्ट मध्ये आपण मोक्का कायदा म्हणजे काय बघितले आणि या कायद्याबद्दल सविस्तरपणे माहिती बघितली. थोडक्यात, मोक्का कायदा गुन्हेगारीचं जाळं तोडण्यासाठी एक प्रभावी आणि कठोर शस्त्र आहे असं म्हटलं तर ते चुकीचे ठरणार नाही. मला अशा आहे कि हा लेख वाचून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. असेच माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.

पोस्ट शेवटपर्यंत वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!!




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.