-->

Header Ads

वाजव ना तुझी मधुर बासरी Lyrics | Vajaw Na Tujhi Madhur Basuri Lyrics



नमस्कार या पोस्टमध्ये आपण वाजव ना तुझी मधुर बासरी Lyrics बघणार आहोत. आनंद शिंदे यांनी हे गीत गायलेल आहे.


सॉन्ग - वाजव ना तुझी मधुर बासरी
लिरिक्स - ओंकार भुवड
सिंगर - साक्षी कोकाटे
म्युझिक - डीजे शुभम के



वाजव ना तुझी मधुर बासरी Lyrics | Marathi

वेडावले मन माझे
ऐकू येईना सुर कानी
शोधते रे तुला मी वेडी होऊनी
ये समोर ना माझ्या श्रीहरी
वाजव ना तुझी मधुर बासरी
तुझीच मी रे राधा बावरी... (*२)

रंगूनी तुझ्यात मी हरवूनी जाते
पाहण्या तुला रे कान्हा आस ही लागते
येता समोर खुणवती स्पंदने
कळेना मला रे कान्हा शब्द होती मुके
तुझे नाव माझ्या येते ओठावरी
वाजव ना तुझी मधुर बासरी
तुझीच मी रे राधा बावरी... (*२)

जरी नाही झाले कान्हा मी तुझी
नित्य अंतरी जडली अशी प्रीत ही माझ
विरहाचा त्रास हा छळतो मनाला
माझ्या या भावना मुकुंदा सांगू मी कुणाला
तरी राहील कृष्णा प्रेम तुझ्यावरी
वाजव ना तुझी मधुर बासरी
तुझीच मी रे राधा बावरी... (*२)

* * * * * *




हे अभंग पण नक्की वाचा 👇👇👇



आज या पोस्टमध्ये आपण वाजव ना तुझी मधुर बासरी Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!! 🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.

📑 Table of Contents