तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला Lyrics | Tujhya Na Majhya Bhetisathi Gavlan
नमस्कार या पोस्टमध्ये आपण तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला Lyrics बघणार आहोत.
तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला Lyrics | Marathi
तुझ्या न माझ्या भेटीसाठी
सागर कुठे हरवला
कान्हा रे भेट देना मला || धृ ||
वाट तुझी पाहता, नयन माझ्या शिणले |
कुठे गेला माझा कान्हा विपरीत घडले ||
किती किती मी वाट पाहू |
जीव हा माझा दमला ||
कान्हा रे भेट देना मला || १ ||
डोईवर माझ्या दुधाचा माठ |
हळूहळू चढते मी मथुरेचा घाट ||
कुठे कुठे मी पाहू याला |
जीव हा झाला वेडा ||
कान्हा रे भेट देना मला || २ ||
एका जनार्दनी मी गवळ्याची राधा |
कृष्ण सख्याची जडली बाधा ||
किती किती वाट मी पाहू |
जीव हा माझा थकला ||
कान्हा रे भेट देना मला || ३ ||
तुझ्या न माझ्या भेटीसाठी
सागर कुठे हरवला
कान्हा रे भेट देना मला || धृ ||
* * * *
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- कसा ग तुला आवडला गोविंद गवळण Lyrics
- गेला हरी कुण्या गावा Lyrics
- वेडी झाली राधा ऐकून बासरी Lyrics
- गवळण सांगती गवळणीला Lyrics
या पोस्टमध्ये आपण तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला Lyrics बघितले.
Post a Comment