Header Ads

वेडी झाली राधा ऐकून बासरी Lyrics | Vedi Jhali Radha Ekun Basari Gavlan



नमस्कार या पोस्टमध्ये आपण वेडी झाली राधा ऐकून बासरी Lyrics बघणार आहोत.

वेडी झाली राधा ऐकून बासरी Lyrics | Marathi

वाजवितो पावा तो कृष्ण मुरारी,
वेडी झाली राधा ऐकून बासरी || धृ||

धाकामधली मी नार गवळ्याच्या घरची
धडकी एकही उरात नित्य का सरती
तरी माया कमी होईना तुझ्यावरची
जादू काय ही म्हणावी त्या मनोहरची
भेटी नाचे मनात मयुरी
वेडी झाली राधा ऐकून बासरी || १||

झोप नयनाची गेली, हरपून गेले भान
तन मन ध्यान सारे घेतले मुकुंदान
यावरती उपाय बाई सांगेना कोण
जीव खाली वरती होतो या अशा भ्यान
त्याची ओढ लागे माझ्या या अंतरी
वेडी झाली राधा ऐकून बासरी || २ ||

टपोर चांदण्याची होती मध्यानी रात
पलंगावरती मी पहुडली होते निद्रेत 
असा चोरूनी जपूनी हळू आला आत
धपकन श्रीधराने धरला माझा हात
दचकले स्वप्नात मी झाले बावरी
वेडी झाली राधा ऐकून बासरी || ३ ||

विसरत विसरेना त्याची सावळी मूर्ती
आठवण सारखी छळते मजला एकांती
मन मंदिरी ज्याची दिगंत कीर्ती
त्याच्याच आहे ना उत्तम ही नटली धरती
छेडीते मजला गोकुळ नगरी
वेडी झाली राधा ऐकून बासरी || ४ ||

⚚ ⚚ ⚚ ⚚ 




हे पण नक्की वाचा 👇👇👇


आज या पोस्टमध्ये आपण वेडी झाली राधा ऐकून बासरी Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!! 🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.