Header Ads

Nathani Pahije Song Lyrics In Marathi | नथनी पाहिजे | Sonali Sonawane



नमस्कार या पोस्टमध्ये आपण Nathani Pahije Song Lyrics In Marathi बघणार आहोत. गाण्याचे बोल सर्वेश साबळे यांनी लिहिले आहेत. आणि गाणं सोनाली सोनावणे आणि केवल वालंज यांनी गायलेलं आहे.


सॉंग - नथनी पाहिजे
लिरिक्स - सर्वेश साबळे
सिंगर - सोनाली सोनवणे, केवल वालंज
म्युझिक - सर्वेश साबळे, रुपेश शिरोडे


Nathani Pahije Song Lyrics | Marathi

राजा माझा सोन्यावाणी
नाही नाही हिऱ्यावाणी
रूप त्याचं कोणा म्होरं दाऊ कसं ?
दिसतो कसा रूपवान
डोळ्याची मिटवी तहान...
सांग मला त्याच्या म्होरं जाऊ कसं ?

त्याची चाल पाहु मन धडधडतय
त्याच्या नुसत्या चाहूलीन
पापणी फडफडतय
माझ्या मनाचं पाखरू भिरभिरतय
त्याच्यापाशीच येऊन लुडबुडतय
तुझ्याविना काही कळत नाही
ना वळत नाही मला...

राजा नको मला ती नव्वारी
आणि नको बुलेटची सव्वारी
नको झुमका दे तुझी साथ खरी
फक्त नथनी मला पाहिजे...

राजा नको मला ती नव्वारी
आणि नको बुलेटची सव्वारी
नको झुमका दे तुझी साथ खरी
फक्त नथनी मला पाहिजे...

डोळे तुझे चंद्रावानी
नखरेवाली ही जवानी
करते कशी येड्यावानी काही सूचना
वळून तू एकदा पाहना
जीवाचिया झाली दैना
रातीला ग झोप येईना तुझ्या इना

तुझ्या आठवणीत या हे मन तडफडतंय
फक्त तुझच नाव हे गुणगुणतय
तुझ्या म्होरं हे काहीही बडबडतय
तुझ्या एका भेटीसाठी तळमळतय
तुझ्या विना जग हे सारा सुना वाटे मला

राणी देतो तुला मी नव्वारी
आणि देतो बुलेटची सव्वारी
देतो झुमका आणि साथ खरी
फक्त नथनीच का पाहिजे ?

राणी देतो तुला मी नव्वारी
आणि देतो बुलेटची सव्वारी
देतो झुमका आणि साथ खरी
फक्त नथनीच का पाहिजे ?

कुंकवाचं लेन आहे नथनी..
सौभाग्याचं दान आहे नथनी..
नात्याची कमान आहे नथनी
प्रेमाचं निशाण आहे नथनी

जिंदगी ही माझी सारी
कुर्बान तुझ्यावरी
तुझ्यासाठी येईन
राजा मांडवा दारी
लग्न घाट बांधून ही
नांदेन मी तुझ्या घरी
नवरदेव तू माझा मी नवरी

जन्मभर साथ तुझी देशील का ?
नवरा तू माझा होशील का ?
डोरलं हे गळ्यात घालशील का ?
नथनी मला सांग देशील का ?

राजा नको मला ती नव्वारी
आणि नको बुलेटची सव्वारी
नको झुमका दे तुझी साथ खरी
फक्त नथनी मला पाहिजे...

⚛ ⚛ ⚛ 



हे पण नक्की वाचा 👇👇👇


तर आज या पोस्टमध्ये आपण Nathani Pahije Song Lyrics In Marathi बघितले. अधिक मराठी गाण्यांचे लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खुप धन्यवाद !!!!!!!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.