गातो वासुदेव मी ऐका | Gato Vasudev Mi Eka Abhang Lyrics
गातो वासुदेव मी ऐका | Marathi
गातो वासुदेव मी ऐका |
चित्त ठाई ठेवूनी भावे ऐका ||
डोळे झाकून रात्र करू नका |
काळ करीत बैसलासे लेखा गा || १ ||
राम राम स्मरा आधी |
लाहो करा गाठ घाला मूळ बंदी ||
सांडा वाहुनिया उपाधी |
लक्ष लावूनी राहा गोविंदी गा || २ ||
अल्प आयुष्य मानवी देह |
शतगणिती अर्ध रात्र खाय ||
मध्ये बालत्व पीडा रोगक्षय |
काय भजनासी उरले ते पाहे गा || ३ ||
क्षणभर नाही भरवसा |
व्हारे सावध तोडा माया आशा ||
काही न कळेल मग गळा पडेल फासा |
पुढे हुशार थोर आहे ओळसा गा || ४ ||
काही थोडा बहुत लाग पाठ |
करा भक्ती भाव धरा बळकट ||
तन मन ध्यान द्या लावूनीया नीट |
जरी असेल करने गोड शेवट गा || ५ ||
विनविते सकाळ जना |
कर जोडूनिया थोरा लहाना ||
दान इतूले द्या मज दिना |
म्हणे तूकया बंधू राम म्हणा गा || ६ ||
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- सांगड बांधा रे भक्तीची अभंग Lyrics
- विठ्ठला वारकरी आलाय भेटीला Lyrics
- उभी मुक्ताबाई माळावरी अभंग Lyrics
- ब्रह्म दिसे उघडे अभंग Lyrics
तर आज या पोस्टमध्ये आपण गातो वासुदेव मी ऐका अभंग बघितला.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!! 🙏🙏🙏
Post a Comment