Header Ads

कुठे गेली राधा एवढ्या सकाळी सकाळी Lyrics In Marathi | Kuthe Geli Radha Gavlan


नमस्कार, आज या पोस्ट मधून आपण कुठे गेली राधा एवढ्या सकाळी सकाळी Lyrics बघणार आहोत. हे खूपच सुंदर आणि प्रसिद्ध अशी गवळण आहे.

कुठे गेली राधा एवढ्या सकाळी सकाळी Lyrics

चल चल चंद्रावरी, तू ग चाफेकळी
कुठे गेली राधा, शोधा सकाळी सकाळी
चला बाई चला बाई....
कुठे गेली राधा, शोधा सकाळी सकाळी
चल चल चल चल..
कुठे गेली राधा, शोधा सकाळी सकाळी..   || धृ ||

काय कुणी ग केला कावा
नाही कुणा ग कैसा ठावा
नंदाच्या हरीने खूण कैसी केली
कुठे गेली राधा, शोधा सकाळी सकाळी
चला बाई चला बाई..
कुठे गेली राधा, शोधा सकाळी सकाळी
चल चल चल चल...
कुठे गेली राधा, शोधा सकाळी सकाळी || १ ||

जमवून साऱ्या गोपिका नारी
शोध करिती नाना परे
त्याने जाऊन घरी, चौकशी ग केली
कुठे गेली राधा, शोधा सकाळी सकाळी
चला बाई चला बाई..
कुठे गेली राधा, शोधा सकाळी सकाळी
चल चल चल चल...
कुठे गेली राधा, शोधा सकाळी सकाळी. ||२ ||

पृही समजले पृथक सारे
बाजाराचे निमित्त पुकारे
गेल्या नंदा घरी शोधण्या वनमाळी
कुठे गेली राधा, शोधा सकाळी सकाळी
चला बाई चला बाई..
कुठे गेली राधा, शोधा सकाळी सकाळी
चल चल चल चल...
कुठे गेली राधा, शोधा सकाळी सकाळी.     || ३ ||

काही न बोलता गेली बाजाराला
काय करावे मेळा फुटला

एका जनार्दनी हरीला शरण गेली
कुठे गेली राधा, शोधा सकाळी सकाळी
चला बाई चला बाई..
कुठे गेली राधा, शोधा सकाळी सकाळी
चल चल चल चल...
कुठे गेली राधा, शोधा सकाळी सकाळी. ||४ ||

☘  ☘  ☘  ☘




हे पण नक्की वाचा 👇👇👇



तर आज आपण कुठे गेली राधा एवढ्या सकाळी सकाळी Lyrics बघितले. अधिक भक्ती संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics  ला पुन्हा भेट नक्की द्या.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!   🙏🙏🙏🙏



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.