Header Ads

बघा पालखी सजली माऊली थाटात निघाली Lyrics



नमस्कार या पोस्टमध्ये आपण माऊली थाटात निघाली Lyrics बघणार आहोत.

माऊली थाटात निघाली Lyrics | Marathi

बघा पालखी सजली..
बघा पालखी सजली
माऊली थाटात निघाली.. || धृ ||

पांडुरंगाच्या वारीला हो
आले संत कोण कोण
श्री क्षेत्र आळंदीहून
झाले माऊलीचे आगमन
विठू नामाचा गजर
सारे वैष्णव आनंदली
पालखी सजली माऊली
थाटात निघाली.. || १ ||

पांडुरंगाच्या वारीला हो
आले संत कोण कोण
श्री क्षेत्र देहुहून
तुकोबाचे आगमन
ज्ञानोबा तुकाराम भजनात
सारी पंढरी दुमदुमली
पालखी सजली माऊली
थाटात निघाली.. || २ ||

पांडुरंगाच्या वारीला हो
आले संत कोण कोण
श्री क्षेत्र सासवडहून
माऊली बंधू सोपान
धन्य धन्य ती पंढरी
ब्रह्मानंदी तळी झाली
पालखी सजली माऊली
थाटात निघाली.. || ३ ||

* * * * *



हे अभंग पण नक्की वाचा 👇👇👇



आज या पोस्टमध्ये माऊली थाटात निघाली अभंग Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!! 🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.