Header Ads

काळू नेसली पातळ नव्वार Lyrics | Kalubai Song Maratho



नमस्कार या पोस्टमध्ये आपण काळू नेसली पातळ नव्वार Lyrics बघणार आहोत. काळूबाई देवीच खूप सुंदर असं हे भक्तीगीत आहे.

________________________________

🌸काळू नेसली पातळ नव्वार Lyrics🌸

|| काळूबाईच्या नावानं चांगभलं
मांढरच्या काळू चा चांगभलं ||

दोन खणांची खन चोळी
त्याला लावली सोन्याची जर
काळू नेसली पातळ नव्वार
मिरी पडली शंभर.... || धृ ||

अंगणाच्या दारी पाट मांडीले नाना परी ग
चांदीचे गडवे चहुबाजूने उभारी ग
चंदनाची ऊटी अशी केशर कस्तुरी ग
मीठ मोहरी उतरून टाका
आईला लागल नजर....
काळू नेसली पातळ नव्वार... || १ ||

पुरणपोळी, भाजी, जिरे, वरण भात
मेवा मिठाई कशी साखर द्यात
शंभर पानाचा विडा ठेवला ताटात
जाई जुई वेणी लावली माईन केसात
पाच फळांची रास गोड भोजनाचा आहार
काळू नेसली पातळ नव्वार... || २ ||

जन्मोजन्मी फिरणार नाही
माझ्या काळुच रून
भाग्य कपाळी असाव लागतं
तिचं घेण्या दर्शन...
साधी भोळी सेवा प्रकाशाची घ्यावी मागून
बाळ आकाशन गायलं गुण तुझं आनंदान
त्या बाळू भाऊला तुझी कधी भेट ग घडणार
काळू नेसली पातळ नव्वार... || ३ ||

दोन खणांची खन चोळी
त्याला लावली सोन्याची जर
काळू नेसली पातळ नव्वार
मिरी पडली शंभर.... ||

________________________________


✅हि भक्तीगीत पण नक्की वाचा👇👇👇
________________________________


👀आज या पोस्टमध्ये काळू नेसली पातळ नव्वार Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद  ❤❤!!!!!!!!!! 🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.