पानामध्ये पान बहुमोलाचे Lyrics | Shiv Shankar Bhaktigeet
नमस्कार या पोस्टमध्ये आपण पानामध्ये पान बहुमोलाचे Lyrics बघणार आहोत.
_____________________________________
🌿पानामध्ये पान बहुमोलाचे Lyrics🌿
पानामध्ये पान बहुमोलाचं
शंकराला वाहिल मी पान बेलाच... || धृ ||
दही नको दूध नको नको त्याला तूप
गंगेच्या पाण्याचा करीन अभिषेक
मोगऱ्याच फुल शंभूच्या आवडीचं
शंकराला वाहिल मी पान बेलाच... || १ ||
अक्षता गुलाल नको नको त्याला गंध
भस्मांकित रूप त्याचे दिसे हो सुंदर
नंदी नंदेश्वर रूप शंभूचं
शंकराला वाहिल मी पान बेलाच... || २ ||
झोप नको तोप नको नको ते साधन
साधा भोळा महादेव होई रे पावन
श्रद्धा भावभक्तीने त्यासी पूजीन
शंकराला वाहिल मी पान बेलाच... || ३ ||
§ § § §
_____________________________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇
_____________________________________
📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!! 🙏🙏🙏🙏
_____________________________________
Post a Comment