काशीच्या विश्वनाथा येरे धावून Lyrics | Kashichya Vishwanatha Yere Dhavun
नमस्कार या पोस्टमध्ये आपण काशीच्या विश्वनाथा येरे धावून Lyrics बघणार आहोत.
_____________________________________
🌸काशीच्या विश्वनाथा येरे धावून Lyrics🌸
काशीच्या विश्वनाथा येरे धावून
थकले शंभू रोज तुझी वाट पाहून || धृ ||
शिव शिव म्हणुनी मी मुखी गाईन
थकले शंभू रोज तुझी वाट पाहून || १ ||
बसलास का रे दूर गावा
किती केला मी तुझा धावा
घरोघरी लिंग तुझे केले स्थापन
थकले शंभू रोज तुझी वाट पाहून || २ ||
दही दूध आहे तुझ्या आंघोळीला
१०८ बेल वाहिन मी तुजला
ओम नमः शिवाय मी मंत्र गाइन
थकले शंभू रोज तुझी वाट पाहून || ३ ||
लिंग तुझे केले तुळशी वृंदावनी
ध्यानीमनी जपला शिव चक्रपाणी
आरती तुझी करून देवा दासी होईन
थकले शंभू रोज तुझी वाट पाहून || ४ ||
_____________________________
हे भक्ती गीत पण नक्की वाचा 👇👇👇
- विठ्ठल विठ्ठल टाळा संगे बोलू लागले टाळ Lyrics
- भजनात भक्तांच्या क्षणभर थांब रे Lyrics
- विठ्ठलाचे रूप मंदिरी सुंदर Lyrics
____________________________________
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment